प्रसंग अठरावा - मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
मन मन बोलिलें उत्तर । ज्यांनीं मज साधिलें साचार । त्यांस मी घडों नेदी अनाचार । मज वोळखोन साधु जाले ॥१५॥
ज्यांस नाहीं माझें दरुशन । त्यांस मी अरिष्ट रचीन व्याहान । उन्मत्ता चेतविन मदन । पांकुळला लावीन त्याचें पाठीं ॥१६॥
मना तुझें वर्म ठाउकें जालें । सद्गुरुकृपेनें हातासी आलें । तुंवा मज स्वरूपी बोधविलें । मना तुझा आभार मानूं किती ॥१७॥
मना तूं श्र्वेत फुटिक (स्फटिक) ज्वालावर्ण । एके ठायीं नाहीं समाधान । कंठियलें बहुत काळालागुन । सवेग उफराटीं विंदानें तुझीं ॥१८॥
शेख महंमद बोलिले खुण । आधीं मन करावें जतन । लाधेल परब्रह्म निधान । मन फिरविल्याविण योग नव्हे ॥१९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 06, 2015
TOP