प्रसंग अठरावा - कलियुगधर्म
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
राजे सांडितील परमार्थ धर्म नीति । पर्जन्य उष्ण काळीं पिकें सांडवेल क्षिती । आचार भ्रष्टोन आठरापगड जाती । एकवट जेविती परियेसा ॥२५८॥
पुत्र मातेचा होईल भ्रतार । लेकीं पित्याच्यानें होतील गरोदर । ब्राह्मणी निघतील अनामिकांचे घर । आचार सांडोनियां ॥२५९॥
पापें करिती शिवालयाभीतर । विप्र भक्षिती गोमांस सार । एक नाम सांडोनि ककरिती दुष्टा आहार । योगी म्हणवूनियां ॥२६०॥
आतां येथून कलि मातेल । पांचा वरुषांची कन्या भ्रतार मागेल । सातां वरुषा गर्भ समावेल । आठवें वर्षी कोन होईल ॥२६१॥
पुरुष पुरुषांसी रमण करी । त्या पापें कांपतसे धरित्री । अनेक पापें पृथ्वीवरी प्रबळ होतील ॥२६२॥
कोणी न धरिती कोणाची शंका वृत्ति । येरून येरांचें प्रियेशी रमती । परी कोणी कोणाचा कुसुर न मानिती । कलियुग पेटल्या ॥२६३॥
पतिव्रता लज्जा सांडोन निःशक होती । एक बीज दोन जावळी जन्मती । मायलेकी सवती होती । आजा होईल नातीरमणा ॥२६४॥
बारा गांवामाजी एक गांव वसती । नगरें भंगोनि गोठणें होती । राजे इमान सांडोन मति द्रव्य घेती । बंद धरूनियां ॥२६५॥
कर्मचांडाळाची होईल मान्यता । हरिभक्तांस देखों न शकती तत्त्वतां । श्रवणीं नाइकती पवित्र वार्ता । साधुजनाची ॥२६६॥
ऐशा सांगतां अधर्म कीर्ति । ग्रंथ वाढेल इलम वृत्ती । म्हणऊनि अळुमाळ मती । आटोपिलें ॥२६७॥
पंचमहाभूतांस प्रळय होईल थोर । तैं आटतील सप्तहि सागर । भंगतील मेरू आणि मांदार । अष्ट गिरीवर मोडिती ॥२६८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP