मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
कोठें गेले थोर पृथ्वीपती ...

वि. मो. महाजनी - कोठें गेले थोर पृथ्वीपती ...

मराठी शब्दसंपत्ति


कोठें गेले थोर पृथ्वीपती ते । सांगा गेले शूर कोण्या गतीतें ॥
झाले गेले मृत्युपंथेंचि सारे । कां देखा ना सर्व कीं हें असारें ॥१॥
त्यांची ती रणकीर्ति शत्रुहननीं उद्दम तें वर्तन ।
त्यांचे ते मुसलापरी भुज, जयां भ्याले अरींचे गण ॥
त्यांचा तो घनघोर शब्द चढवी आंगीं रणाची रती ।
तीं आरक्त विलोचनें, सकलही झालीं कथामात्र तीं ! ॥३॥
तिमिर झांकितां गगनमंडला । तुटुनि अंबरीं क्षण झळाळला ॥
केतु दीपवी जनाविलोचना । तों गिळी तया तम, विरोचना ॥४॥
नर हा किती दुर्लंभ पाहे । क्षणभंगुर जीवित आहे ।
नरदृष्टि असे किती कोती । किती तो भ्रमला गणगोतीं ॥५॥
किति गर्वभरें तो मनिं फ़ुगला । क्षण एक असे बुद्बुद तगला ॥
चिरकीर्ति म्हणे मी मिळविन ती । रविचंद्र नभीं जोंवरि तपती ॥६॥
मोठालीं देउळें तों धन वितरुनियां बांधिसी, आस ही कीं ।
राहो माझी सदाही अभिनवरुचिरा कीर्ति सार्‍या त्रिलोकीं ॥
रे मूढा कीर्ति कैशी अमर विलसते, मर्त्य तूं नाशवंत ।
कोटींचीं कोटिं वर्षें क्षणसम गमती काल आहे अनंत ॥७॥
पाहे हा भूमिभागीं उलथुनि पडला स्तंभ मोठा जयाचा ।
चौं बाजूंनीं जयाच्या विलिखित दिसतो लेख चारी लिपींचा ॥
सांगे तूं अर्थ याचा नृपति कवण तो, कोरिला हा जयानें ? ।
भाषावेदी विवादा करिति म्हणति “ हा अर्थ ’’ ऐसें हटानें. ॥८॥
गेला तो नृपती, तदन्वय तसा, सामंत कोठें अतां ।
त्याची ती नगरी सुरम्य वनिता शालाहि वाताहता ! ॥
गेलें वैभव ये फ़िरूनि कसचें ? तो काल गालीं हंसे ।
कालाचा महिमा अगाध समजे तद्भक्ष्य सारें असें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP