मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
गिरीश

गिरीश

मराठी शब्दसंपत्ति


भलsर, भलsर
भलरी दादा ! भल गडि दादा ! ॥ ध्रु०॥
तांबडं फुटलं झुंजूं मुंजूं
सुकीर चांदनि लागली इझूं
थंड वात करतुया कुजूंबुजूं
म्होरं हात चालिव जोसांत मर्दा
भलरी दादा ! भल गडि दादा ! ॥१॥
कापुर वढ्याचं झुळझुळ पानी
पांखरासंग गाउन्श्यानी
रंजविल गड्या खेळयावानी
न्हिरीचा खाउन चल भाकर कांदा
भलरी दादा ! भल गडि दादा ! ॥२॥
बाच्या किरतीची सुमरून आन
लुटायला जावूं मोत्याची खान
उपटून काढूं कणसाळलं रान
चला राव भिडवुन खांद्यास खांदा
भलरि दादा ! भल गडि दादा ! ॥३॥
शिवारिं जित्राप नागावानी
सळसळ आवाज, डुलती फनी
डुइवर धरल मोत्याच मनी
कवळुन आनुं या वर्साचा सौदा
भलरि दादा ! भल गडि दादा !  ॥४॥
कडूसा पड्तां संपल पाळी
ढवळी व्हईल मोकळी काळी
इर्जीकीला मिळेल नळी
काळ्या रातीला फुलवित चांदा
भलरि दादा ! भल गडि दादा ! ॥५॥
इरबाळ ठिपकाल डुईचं पानी
शिगल खळं डोंगरावानी
भरत्याल् कनगी गंजी, रानीं
खात्याल् सम्दी प्वाटभर मलिदा
भलरि दादा ! भल गडि दादा !      

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP