अज्ञातवासी - धडधडा झडे चौघडा, गडावर चढ...
मराठी शब्दसंपत्ति
धडधडा झडे चौघडा, गडावर चढे मर्द फांकडा
अवघड गड अस्मानी डोले
वरतीं बघतां फिरतिल डोळे
खालीं पाताळांतिल इमले
आसर्यास बाजुस कडा, गडावर चढे मर्द फांकडा १
अजुनि तांबडें नाहीं फुटलें
फटीफटींतुनि गवत कोंवळें
वार्याच्या झुळुकेनें हाले
शोभतो दंवाचा सडा, गडावर चढे मर्द फांकडा २
हातांतिल तल्वार ठिबकते
पाठीवर वाघीण नाहते
‘ करील कौतुक ती, ’ मन वदतें
चालला शिपाई खडा, गडावर चढे मर्द फांकडा ३
गडावरुन खिडकींतुन कोणी
एकसारखी टक लावोनी
बघे स्वारिला डोळे भरुनी
सरदार धन एवढा, गडावर चढे मर्द फांकडा. ४
N/A
References : N/A
Last Updated : January 22, 2018
TOP