मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
हृदयींच्या अंधारांत लाविय...

आत्माराम रावजी देशपांडे - हृदयींच्या अंधारांत लाविय...

मराठी शब्दसंपत्ति


हृदयींच्या अंधारांत लावियेली फुलवात !
तुवां आपुलिये हातीं उजळिली दिव्य ज्योती !
कोनाकोनीं खुले कांती सरे जीवनाची भ्रांति !
तेज पसरे प्रशांत हृदयींच्या मंदिरांत !

+   +   +   +
अनंताचें द्वार खुलें सांतामधूनिया झालें !
तमांतूनि ये प्रकाश व्यापी हृदय - आकाश !
मूर्तिमधूनी प्रचीती अमूर्ताची होई चित्तीं !
फुटे शब्द नि:शब्दाला हृदयींच्या जिव्हाळ्याला !
हृदयींच्या अंधारांत लावियेली फुलवात !

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP