मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
करवंदीच्या जाळींत घोस लो...

श्री. बा. रानडे - करवंदीच्या जाळींत घोस लो...

मराठी शब्दसंपत्ति


करवंदीच्या जाळींत
घोस लोंबती रसरसले
कांटे चुकवुनि
अलग झेलुनी
मधुर रसा लुटवील अशी
जादू कोठें मिळे कशी !     १
अस्फुट नलिनीकलिकेंत
पराग झोपेंतच हंसले
सुमदल  विकसुनि
सुगंध विखरुनि
परागकण वर उधळि अशी
जादू कोठें मिळे कशी !      २
खोल मनाच्या तिजोरिंत
रत्न प्रीतिचें दडवीलें
कुलुप तोडुनी
प्रभा फांकुनी
रमनमानसा रिझवि अशी
जादू कोठें मिळे कशी ?      ३
ओष्टपुटांच्या खिंडींत
शब्द बावरे अडखळले
कपोल फुलवुनि
लाज पळवुनी
नादें अवनी भरिल अशी
जादू कोठें मिळे कशी !     ४


N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP