आता यानंतर वसिष्ठगण सांगतो - ते वसिष्ठ चार; १ वसिष्ठ, २ कुंडिन, ३ उपमन्यु, ४ पराशर याप्रमाणे चार आहेत. १ वसिष्ठ, वैतालकवि, रकि इत्यादिक साठांपेक्षा अधिक वसिष्ठ आहेत. यांचे प्रवर - वासिष्ठ, इंद्रप्रमद, आभरद्वसु याप्रमाणे तीन आहेत. अथवा वसिष्ठ असा एक प्रवर आहे. २ कुंडिन. लोहितायन, गुग्गुलि इत्यादिक पंचविसांपर्यंत कुंडिन आहेत. यांचे प्रवरवासिष्ठ, मैखावरुण, कौंडिण्य याप्रमाने तीन आहेत. ३ उपमन्यु, औदलि, मांडलेखि इत्यादिक सत्तरांपर्यंत उपमन्यु अ अहेत. यांचे प्रवर -वसिष्ठ, इंद्रप्रमद, आभरद्वसु असे तीन आहेत. 'आभरद्वसु' या स्थानी 'आभरद्वसव्य' असा दुसरा पाठ आहे. अथवा वासिष्ठ, आभरद्वसु, इंद्रप्रमद असे तीन प्रवर आहेत. अथवा वाद्यांचा व्यत्यय करावा. ४ पराशर, कांडुशय, वाजि इत्यादिक सत्तेचाळिसपर्यंत पराशर आहेत. यांचे प्रवर- वासिष्ठ, शाक्त्य, पराशर्य असे तीन प्रवर आहेत. हे जे चार वसिष्ठ सांगितले, यांचा परस्पर विवाह होत नाही. याप्रमाणे वसिष्ठगण सांगितला.