आता यानंतर आगस्त्यगण सांगतो - आगस्त्य दहा - १ इध्मवाह, २ सांभवाह, ३ सोमवाह, ४ यज्ञवाह, ५ दर्भवाह, ६ सारवाह, ७ अगस्ति, ८ पूर्णमास, ९ हिमोदक, १० पाणि; याप्रमाणे दहा आगस्त्यगण आहेत. १ इध्मवाह, विशालाद्य, स्फालायन इत्यादिक पन्नासांपेक्षा अधिक इध्मवाह आहेत. यांचे प्रवर- आगस्त्य, दार्ढ्यच्युत; इध्मवाह याप्रमाणे तीन आहेत; अथवा आगस्त्य हा एक प्रवर आहे. २ सांभवाह यांचे प्रवर - आगस्त्य, दार्ढ्यच्युत सांभवाह याप्रमाणे तीन आहेत. ३ सोमवाह यांचे प्रवर - आगस्त्य, दार्ढ्यच्युत, सोमवाह असे तीन आहेत. ४ यज्ञवाह, यांचे प्रवर - आगस्त्य, दार्ढ्यच्युत, यज्ञवाह याप्रमाणे तीन होत. ५ दर्भवाह यांचे प्रवर - आगस्त्य, दार्ढ्यच्युत, दर्भवाह याप्रमाणे तीन होत. ६ सारवाह यांचे प्रवर - आगस्त्य, दार्ढ्यच्युत, सारवाह असे तीन होत. ७ अगस्ति यांचे प्रवर -आगस्त्य, माहेंद्र, मायोभव असे तीन प्रवर. ८ पूर्णमांस यांचे प्रवर - आगस्त्य पौर्णमास, पारण असे तीन. ९ हिमोदक यांचे प्रवर - आगस्त्य, हैमवर्चि, हैमोदक याप्रमाणे तीन जाणावे. १० पाणिक यांचे प्रवर - आगस्त्य, पैनायक, पाणिक असे तीन जाणावे. याप्रमाणे दहा जे अगस्तिगण सांगितले, या सर्वांचा परस्पर विवाह होत नाही; कारण, हे सर्व अगस्ति यांचे गोत्र व प्रवरहि सर्वांचे एकसारखे आहेत. याप्रमाणे अगस्तिगण सांगितला.