मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
कन्यादान करण्याविषयी असमर्थता

धर्मसिंधु - कन्यादान करण्याविषयी असमर्थता

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कन्यादान करण्याविषयी असमर्थ असणाराने "तू माझ्या कन्येचे दान कर" अशा प्रकारे प्रार्थिलेला जो त्या कन्येचे दान करनारा असेल त्याने, अथवा जो दुसर्‍याची कन्या सुवर्ण देऊन आपली करतो त्याने, अथवा जो दुसर्‍याची कन्या अनाथ जाणून तिचे दान करू इच्छितो त्याने, देखील संस्कार्य कन्येचा पिता इत्यादिकांचा उच्चार नान्दीश्राद्धामध्ये करावा. कन्येचा पिता जिवंत असेल तर कन्येचे मातृपार्वण व मातामहपार्वण अशी दोनच पार्वणे करावी. कन्येच्या तीन वर्गाचे पहिले जिवंत असतील तर पित्याचा पिता इत्यादिकांचा जसा संभव असेल तसा उच्चार करावा. याप्रमाणे पित्याखेरीज इतर नान्दीश्राद्ध करणारा असेल तर त्याविषयी प्रयोग सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP