आचमन करून
"भूःपुनातुभुवःपुनातुस्वःपुनातुभुर्भुवःस्वःपुनातु"
इत्यादि मंत्रांनी शुद्धि करून
"अपवित्रः पवित्रो वा०"
इत्यादि मंत्रांनी विष्णूचे स्मरण करावे. आसनादि विधि करून दोनदा आचमन करून प्राणायाम केल्यावर पूर्वीप्रमाणे संकल्प करावा व गायत्रीचे आवाहन करावे."
"गायत्रीत्र्यक्षरांबालांसाक्षसूत्रकमण्डलुम । रक्तवस्त्रांचतुर्वक्त्रांहंसवाहनसंस्थिताम १ ब्रह्माणींब्रह्मदैवत्यांब्रह्मलोकनिवासिनीम । आवाहयाम्यहंदेवीमायातीसूर्यमण्डलात २ आगच्छवरदेदेवित्र्यक्षरेब्रह्मवादिनि । गायत्रीछन्दसांमातर्ब्रह्मयोनेनमोस्तुते"
या मंत्रांनी गायत्री देवीचे आवाहन केल्यानंतर पूर्वीप्रमाणे
"आपोहिष्ठा०"
या तीन ऋचांनी मार्जन करावे.
"सूर्यश्चेतिमंत्रस्यनारायणऋषिःसूर्योदेवताअनुष्तुपछन्दःआचमनेविनियोगः सूर्यश्च०"
हे मंत्र म्हणून उदक प्राशन केल्यावर आचमन करावे.
"आपोहिष्ठा०"
इत्यादि नऊ ऋचांनी मार्जन करावे असे कोणी ग्रंथकार म्हणतात. बहुत ग्रंथकार, संकल्प केल्यानंतर
"सूर्यश्चेति०"
या मंत्राने आचमन करून
"आपोहिष्ठा०"
या तीन ऋचांनी प्रत्येक पादाचे शेवटी मार्जन करून अघमर्षण करावे. दोन मार्जने करू नयेत, असे म्हणतात.
"सुमित्र्यादुर्मित्र्याइतिद्वयोःप्रजापतिऋषिः आपोदेवतायजुश्छंदःअदानप्रक्षेपेवि० सुमित्र्यान आपओषधयःसन्तु"
या मंत्राने उदक घेऊन
"दुर्मित्र्यास्तस्मै सन्तु योस्मान्द्वेष्टि यं च वयं द्विष्मः"
या मंत्राने वामभागी टाकावे. त्यानंतर
"ऋतं च०"
या तीन ऋचांनी अथवा
"द्रुपद०" ही ऋचा तीन वेळा म्हणून पूर्वीप्रमाणे अघमर्षण करावे. सकाळी व सायंकाळी पूर्ववत तीन वेळा पुष्पयुक्त उदकाने अर्घ्य द्यावे, मध्याह्नकाली एकदाच द्यावे. गायत्री मंत्राने सभोवार उदक सिंचन करीत प्रदक्षिण फिरावे. यानंतर उपस्थान करावे-
"उद्वयमुदुत्यमितिद्वयोःप्रस्कण्वःसूर्योनुष्टुपगायत्र्यौ चित्रंदेवानामाङ्गिरसःकुत्सःसूर्यस्त्रिष्तुप तच्चक्षुर्दध्यङगाथर्वणःसूर्यःपुरउष्णिक उपस्थाने० उद्वयंतमस० १ उदुत्यंजा० १ चित्रंदे० १ तच्चक्षुर्देवहितं०"
या ऋचा ऊर्ध्वाबाहू करून सूर्याकडे पहात आपापल्या शाखेनुसार पठन कराव्या. नंतर प्राणायाम वगैरे करावा. न्यास, मुद्रा, तर्पण इत्यादि विधि कृताकृत आहे.
"तेजोसीतिपरमेष्ठीप्रजापतिराज्यंयजुः आवाहने विनियोगः । तेजोसिशुक्रमस्यमृतमसिधामनामासिप्रियंदेवानामनाधृष्टंदेवयजनमसि परोरजसइतिविमलःपरमात्मानुष्टुप गायत्र्युपस्था० गायत्र्यस्येकपदीद्विपदीत्रिपदीचतुष्पद्यपदसिनहिपद्यसेनमस्तेतुरीयायदर्शनायपदायपरोरजसेसावदोम"
या मंत्रानी उपस्थान करून पुर्ववत गायत्री जपापर्यंत कर्म करावे. नंतर सामर्थ्य असेल त्याप्रमाणे
"विभ्राट०"
हा अनुवाक अथवा पुरुषमुक्त अथवा शिवसंकल्प अथवा मण्डल ब्राह्मण म्हणून उपस्थान करावे. या ठिकाणी ऋक्शाखीयांप्रमाणे कोणी दिशांना वंदन करतात. नंतर
"उत्तमे शिखरे०"
"देवा गातु विदो गातुम०"
या मंत्रांनी संध्येचे विसर्जन करावे. भूमीला नमस्कार वगैरे पूर्वीप्रमाणे करावे. याप्रमाणे कात्यायनशाखीयांचा संध्याविधि सांगितला.