यानंतर कन्यादानाची अंगभूत अशी जी गाय इत्यादि दाने त्याचे मंत्र सांगतो- गोदानाचा मंत्र
"यज्ञसाधनभूताया विश्वस्याघौघनाशिनी । विश्वरूपधरो देवः प्रीयतामनया गवा ॥"
अंगठी इत्यादिकांचा मंत्र
’हिरण्यगर्भसंभूत सौवर्ण चांगुलीयकम । सर्वप्रदं प्रयच्छामि प्रीनातु कमलापतिः ॥"
कुंडलाचा मंत्र
"क्षिरोदमथने पूर्वमुद्धृतं कुंडलद्वयम । श्रिया सह समुद्भूतं ददे श्रीः प्रीयतामिति ॥
कडी, तोडे इत्यादिकांचा मंत्र
"कांचन हस्तवलयं रूपकान्ति सुखप्रदम । विभूषणं प्रदास्यामि विभूषयतु मे सदा ॥
तांब्याची उदकपात्रे इत्यादिकांचा मंत्र
"परापवाद पैशून्यादभक्ष्यस्य च भक्षणात ।
उत्पन्नपापं दानेन ताम्रपात्रस्य नश्यतु ॥
भोजनाकरिता कास्यपात्र दान करावयाचे त्याचा मंत्र
"यानि पापानि काम्यानि काम्योत्थानि कृतानि च ।
कांस्यपात्रप्रदानेन तानि नश्यन्तु मे सदा ॥"
पाणी पिण्याकरिता व भोजनाकरिता रुप्याची पात्रे दान करावयाची त्याचा मंत्र
"अगम्यागमनं चैव परदाराभिमर्शनम ।
रौप्यपात्रप्रदानेन तानि नश्यन्तु मे सदा ॥
तांबूलाचा मंत्र
"पूरितं पूगपूगेन नागवल्लीदलान्वितम ।
पूर्णेन चूर्णपात्रेण कर्पूरपिष्टकेन च ।
सुपूगखंडनं दिव्यं गंधर्वाप्सरसां प्रियम । ददे देव निरातङ्कं त्वत्प्रसादात्कुरुष्व माम ॥"
याप्रमाणे दासी, म्हैस, गज, अश्व, भूमि, सुवर्णपात्रे, पुस्तके, शय्या, गृह, रुपे, वृषभ, इत्यादिकांचे दानांचे मंत्र कौस्तुभामध्ये पहावे.