श्राद्ध, यज्ञ, जप, होम, वैश्वदेव, देवतार्चन यांचे ठिकाणी भस्माचा त्रिपुंड्र लावणारा मानव मृत्युला जिंकतो. भस्म घेऊन
"अग्निरिति भस्म वायुरिति भस्म जलमिति भस्म स्थलमिति भस्म व्योमेति भस्म सर्वहवा इदं भस्म मन एतानि चक्षूंषि भस्म"
या मंत्राने अभिमंत्रित करून त्यात उदक मिश्रित करावे व नंतर मधल्या तीन अंगुलींनी घेऊन ललाट, ह्रदय, नाभि, कंथ, स्कंध, बाहुसंधि, पृष्ठ आणि शिर या ठिकाणी शिवमंत्राने अथवा नारायणाच्या अष्टाक्षर मंत्राने अथवा गायत्रीमंत्राने अथवा प्रणवमंत्राने त्रिपुंड्र करावे.