मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
कन्यादानाचे पुण्य

धर्मसिंधु - कन्यादानाचे पुण्य

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


यथाशक्ति भूषणांनी अलंकृत करून कन्येचे दान करणारा, अश्वमेध यज्ञ करणारा आणि संकटातून दुसर्‍याचे प्राण रक्षण करणारा हे तिघे सारखे पुण्यवान होत. "आपल्या वंशातील पुरुषाने कन्येचे दान केले हे ऐकून पितामहादि सर्व पितर सर्व पापांपासून मुक्त होत्साते ब्रह्मलोकाला जातात." याप्रमाणे कन्यादानप्रशंसा सांगितली, जामात हा विष्णु आहे असे समजावे व त्याच्यावर क्रोध करू नये. कन्येला अपत्य झाले नाही तोपर्यंत जावयाच्या घरी कन्येचा पिता व माता यांनी भोजन करू नये. याप्रमाणे कन्येचे घरी पिता व माता यांचे भोजनाचा निषेध सांगितला. विवाहामध्ये स्त्रीसह भोजन केले असता दोष नाही. इतर प्रसंगी स्त्रीसह भोजन केले असता चांद्रायण प्रायःश्चित्त करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP