|
पु. एकी ; एकमत ; ऐक्य ; संगनमत ; जूट ; सख्य ; मिलाफ . ग्रामस्थांचा चक असल्यावर सरकारचा जोरा चालत नाहीं . [ सं . चक्र ; प्रा . चक्क ] पु. ( सरकारी नोकरांत रूढ ) ताकीद ; ठपका ; कानउघाडणी . ( क्रि० येणें ; ठेवणें , घालणें ). [ इं . चेक ] पु. १ वचक ; धाक ; जरब ; वजन ; पगडा ( सत्ता , अधिकार यांचा ); अप्रत्यक्ष अधिकारमान्यता . मामलतदार नवा होता परंतु एका अपराध्याचें शासन होतांच सर्वांवर चक बसला . २ कायदा ; नियम ; कानू ; शासन ; ठरलेली पध्दत . नित्य नवें सांगूं नका एक चक बांधून द्या त्याप्रमाणें मी वर्तेन . ३ जुनी , नेहमीची पध्दति , रीत , वहिवाट . त्या मंडळीचा प्रात : स्नान करण्याविषयीं बारा वर्षे एकसारखा चक चालला आहे . ४ हक्काची रक्कम ; दस्तुरी ; कर ; फी . माझा दोन रुपये चक येणें आहे . [ शक ? तुल० सं . चक्र ] चक्क पहा . दिले जरी पोषाख स्वामीला चक . दौलतरायानें । - सला ५२ . पु. ( सातारा ) गुळाचा लहान रवा . पु. १ अधिकारांतील , मालकीची , वांटयास आलेली जमीन ; नंबर ; क्षेत्र . २ लागवड करावयास घेतलेली सलग , मोठी , लांबलचक जमीन ; मोठें जमीनीचें क्षेत्र . ३ विभागलेल्या जमिनीचा एक भाग ; तुकडा ; जुन्या जमाबंदी दफ्तरांतून याचा अर्थ गांवकर्यांकडून घेऊन तिर्हाइतांस लागवडीकरितां दिलेली जमीन असा आहे . जमीन मोजणींत याचा अर्थ एका नंबरांतील दुसरें शेत ( शेतांतलें शेत ) असा आहे . - विल्सनकोश . [ हिं . चक ; ते . चेकु = तुकडा ] पु. तंबाखूच्या आख्यावरचें आच्छादन , झांकण . [ तुल० गु . चक = पडदा ]
|