|
स्त्री. १ बारिक माती ; धूलि . २ ( ल . ) गोंधळ ; भांबावलेली स्थिति . ३ दुर्दशा ; नाश ; विध्वंस ; परजय ; मोड ( सैन्याचा ). ४ ( सामा . ) र्हास ; नाश ; नष्टप्राय स्थिति . [ सं . धूलि ] ०उडणे ( शेत , गांव , मुलूख , घर यामध्ये ) ओसाड पडणे . ०चारणे ( धुळीस तोंड लावणे ) एखाद्यास चीत करणे ; पराभव करणे ; मानभंग करणे . ०फुंकणे ( कमी चारा असलेल्या जमिनीत गुरे करतात त्याप्रमाणे ) अन्नान्न दशेप्रत जाणे ; पोटाला बेअब्रूने दुस्थितीत भिक्षा मागत फिरणे . धुळीचे दिवे लाव्णे दुर्लौकिकाने प्रसिद्धीस येणे ; वाईट कृत्य करुन पुढे येणे . धुळीस मिळणे समूळ नाश होणे . धुळीस मिळविणे नायनाट करणे ; रसातळास नेणे . मराठेशाही मी पार धुळीला मिळविली . आतां मी खराखुरा सम्राट झालो . - स्वप १३४ . धुळींत रत्न सांपडणे मिळणे अनपेक्षित लाभ होणे ; अचानक एखादी चांगली गोष्ट लाभणे . सामाशब्द - ०अक्षर न. धुळाक्षर पहा . ०कोट पु. ( धुळीचा , मातीचा कोट ) बाहेरील तटबंडी ; मातीचा कोट ९ किल्ल्याभोंवतालचा ) ०दर्शन न. १ हातपाय धुवून तयारीने देवदर्शन करण्यापूर्वी प्रथम दुरुनच - रस्त्यातूनच देवाचे दर्शन घेणे ; देवाला केलेला नमस्कार . २ मोठ्या माणसाची भेट . ३ उभ्याउभ्या , जातांजातां भेट ; ओझरते दर्शन , भेट . माझे वृत्त समजून न घेता धूळदर्शनीच शिव्या देऊं लागला . ०दशा धमासा धाण धाणी , धूळपट पट्टी स्त्रीपु . १ पराजय ; पराभव ; दाणादाण ( सैन्याची ). परी यवनसत्तेची जो करी धूळधाणी । - विक ७ . २ गोंधळ ; फजिती ; नाचक्की ; ( भांडकुदळ , लचांडखोर माणसाची ). ३ नाश ; भंग ; बिघाड ( बेत , योजना यांत ). ४ उध्वस्तपणा ; र्हास ; पडझड ( शहर देश यांची ). ५ अव्यवस्था ; धुळीस मिळणे ; दुर्दशा . पोरापाशी सावकारीस हजार रुपये दिले होते त्यांचा त्याने धूळधमासा करुन टाकिला . ०धमाया स्त्री. ( दादर ) यंवत्यंव ; दगडधोंडे , फालतू गोष्टी . फुशारकी . ०पट्टी पट - स्त्री . खडसावणी ; खरडपट्टी ; तासडणी . ( क्रि० काढणे ; उडविणे ; मांडणे ; करणे ). [ धूळ + पट्टी ] ०पाटी स्त्री. धुळाक्षरे शिकणार्यासाठी वर धूळ पसरलेली लांकडाची फळी . दगडी पाट्या निघण्यापूर्वी या पाट्या प्रचारांत असत . ०पेरणी स्त्री. पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी . - कृषि २२३ . ०भेट धूळदर्शन पहा . लाटसाहेबांच्या धूळभेटीचा प्रसंग म्हणजे देशी संस्थानिकांना मोठा आनंदोत्सवाचा वाटतो . - केसरी . ०वाफ स्त्री. ( धुळीत पेरणी ) १ पाउस पडण्याच्या सुमारास अथवा पावसाची पहिली सर पडल्यावर व धूळ पूर्णपणे बसण्यापूर्वी केलेली पेरणी . २ अशा रीतीने पेरलेला भात इ० . [ धूळ + वाफ ]
|