मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश

दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश

दशमस्कंध उत्तरार्धात अध्याय ४१, मूळ श्लोक १९३३, त्यांवरील अभंग ४६०

जरासंधाची मथुरेवर स्वारी, त्याचा प्रचंड सैन्यासह राम-कृष्णांनी केलेला पराभव व मथुरेंत विजयोत्सव. कालयवनाची
मथुरेवर स्वारी, श्रीकृष्णाचें पलायन, मुचकुंदकथा, कालयवन मृत्यु.
रुक्मिणी-स्वयंवरवृत्त, प्रद्युम्नजन्म , शंबराचा वध, स्यमंतक मण्याचें अद‍भुत वृत्त, सत्यभामाविवाह, स्यमंतकाचें पुढील वृत्त,
कालिंदी, मित्रविंदा इत्यादीचा परिणय, भौमासुरवध, पारिजातवृत्त, सोळा सहस्त्र एकशें वधूंचा स्वीकार, रुक्मिणीशी प्रेमकलह,
श्रीकृष्णाचा संसार, बाणासुराचें अद्‍भुत रम्य आख्यान, अनिरुध्द - उषा यांचा विवाह, नृग राजाचें वृत्त व त्याची शापमुक्ति.
बळिरामाचे गोकुळांत गमन व यमुनेचें आकर्षण, पौंड्रकाचें उद्धट वर्तन व त्याचा आणि काशिराजाचा वध, द्विविद
वानराच्या चेष्टा व त्याचा वध.
सांबाचें बंधन व त्याचा लक्ष्मणेशी विवाह, श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम, त्याची दिनचर्या, राजसूय यज्ञास इंद्रप्रस्थीं गमन,
जरासंधाचा भीमाकरवीं वध, श्रीकृष्णास अग्रपूजेचा मान, शिशुपालवध, अवमृथ समारंभ, दुर्योधनाचा मानभंग, शाल्वाची
विमान प्राप्ति व त्याचा वध, दंतवक्रादीचा वध, बलरामाची तीर्थयात्रा, सुदामदेवाची प्रेमळ कथा, सूर्यग्रहणानिमित्त
कुरुक्षेत्री गमन, गोपींची भेट, स्यमंतपंचकांत वसुदेवास ऋषींचा उपदेश, सुभद्राहरण, श्रीकृष्णादींचा मिथिलानगरींत सत्कार,
श्रीकृष्णकृत उपदेश.
परिक्षिताची, ब्रह्मस्वरुपाबद्दल शब्द कसें कर्णन करुं शकतील ? अशी शंका. शुकमहामुनींनीं नारद व नारायणऋषि यांच्या
संवादरुपानें या शंकेचें केलेलें निरसन. या संवादांत प्रलयकालीं परमात्म्यानें स्वत:चें ठिकाणी सर्व ब्रह्मांडाचा उपसंहार केला असता साक्षात्‍ श्रुति त्याच्या स्तवनानें त्याला पुन: जागृत करीत आहेत, तो त्यांनी केलेला स्तुरिपाठ वेदस्तुनि या नांवानें विश्रुत आहे. परमात्म्याचें सामर्थ्य, त्याचें सर्वातर्यामित्व, भक्तीची आवश्यकता, मीमांसाआदींचें खंडन, विश्वमिथ्यात्वसिध्दि, भक्तिविना ज्ञानाची व्यर्थता, ईश्वर, जीव, जीवोपाधि, मनोनिग्रहाचे उपाय, इत्यादि अत्यंत महत्वाचे विषय ’ वेदस्तुतींत ’ उत्तम रीतीनें निवेदिलेले आहेत.
यानंतर निरनिराळया भक्तांस मिळणारें फल, वृकासुरवृत्त, कृष्णार्जुनांस भूमीदर्शन, कृष्णाची क्रीडा, त्याच्या स्त्रियांचे उद्नार
आणि यदुवंशवर्णन, इत्यादि विषय या उत्तरार्धात आलेले आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : December 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP