मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ७९ वा

स्कंध १० वा - अध्याय ७९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८६६॥
प्रति पौर्णिमेसी, बल्वल येऊनि । क्रौर्ये यज्ञभूमि भ्रष्ट करी ॥१॥
यास्तव प्रतीक्षा करी राम त्याची । तोचि पौर्णिमेसी सुटला वायु ॥२॥
वर्षाव धुळीचा पुवाची दुर्गंधी । अमंगल वृष्ठि यज्ञस्थानीं ॥३॥
शूल घेऊनियां वल्वलही येई । पर्वत कज्जलिचाचि भासे ॥४॥
तप्तशुल्बासम आरक्त ते केश । मिशाही तैशाच उग्ररुप ॥५॥
नांगर, मुसळ स्मरुनि तैं राम । घेई दैत्यप्राण मुशलाघातें ॥६॥
वासुदेव म्हणे विप्रआशीर्वाद । लाभले सहज रामाप्रति ॥७॥

॥८६७॥
वृत्रासुरासी वधितां । अभिषेक जैं देवेंद्रा ॥१॥
अभिषेक तेंवी मुनि । करिती रामासी तोषूनि ॥२॥
दिव्य वस्त्रें अलंकार । अर्पिताती थोर थोर ॥३॥
कंठी वैजयंतीमाला । प्रेमें अर्पिती तयाला ॥४॥
वासुदेव म्हणे राम । जाई तीर्थासी निघून ॥५॥

॥८६८॥
विप्रही बहुत होते तयासवें । कौशिकीसी केलें स्नान-दान ॥१॥
सरयूउगमीं जाऊनि पुढती । तेथूनि प्रयागीं गमन करी ॥२॥
हरिद्वार तेंवी गोमती, गंडकी । विपाशा पुढती शोणनदा ॥३॥
स्नानें या नद्यांचीं करुनि गयेसी । भोजन विप्रांसी घाली राम ॥४॥
जीवत्पितृकत्वें श्राध्द न करितां । पुढती गंगामुखाजवळी येई ॥५॥
महेंद्रपर्वतीं भेटे परशुरामा । सप्तगोदा, वेणा पुढती पाही ॥६॥
वासुदेव म्हणे पंपा, भीमरथी । सरितातीरांसी करी स्नान ॥७॥

॥८६९॥
कार्तिकस्वामीचें घेऊनि दर्शन । श्रीशैल पाहून पुढती जाई ॥१॥
यंकटाद्रिवरी द्रविड देशांत । कामकोष्णीपात्र पुढती याही ॥२॥
पाहूनियां कांची, कावेरीचें स्नान । श्रीरंगपटटण पुढती गांठी ॥३॥
ऋषगपर्वत, दक्षिण मथुरा । पुढती सिंधुतीरा सेतुबंधी ॥४॥
धेनुनाद तेथें करी बळिभद्र । कृतमाला, ताम्रपर्णीस्नान ॥५॥
कुलाचलीं घेई अगस्तिदर्शन । कन्येचें दर्शन दक्षिणेसी ॥६॥
वासुदेव म्हणे पंचाप्सरतीरीं । धेनुदान करी बलराम ॥७॥

॥८७०॥
केरल, त्रिगर्त लंघूनि गोकर्ण । क्षेत्रास जाऊन धन्य होई ॥१॥
शूर्पारकक्षेत्रीं पातला पुढती । तापी, पयोष्णी ती निर्विध्याही ॥२॥
दंडकवनातें जाऊनि नर्मदा । तीरावरी तदा येई राम ॥३॥
महिष्मतीपुरीतूनि मनुतीर्थ । गांठूनि प्रभास पुनरपि ॥४॥
कौरव-पांडव युध्दवार्ता तेथें । कळली तयातें दु:खदाई ॥५॥
वासुदेव म्हणे भूभारहरण । निजकार्य पूर्ण मानी राम ॥६॥

॥८७१॥
भीम-दुर्योधन गदायुध होई । ऐकूनिया येई कुरुक्षेत्रीं ॥१॥
कृष्णासवें धर्म तदा त्या सन्मानी । वीरांसी पाहूनि राम म्हणे ॥२॥
भीमा, तव बल निश्चयें बहुत । परी गदायुध्दज्ञान अल्प ॥३॥
दुर्योधना, गदायुध्दीं तूं प्रवीण । परी बल न्यून तुजलागीं ॥४॥
ऐसें तुम्हीं सम, विजय संदिग्ध । पुरे करा युध्द यास्तवचि ॥५॥
परी रामवाक्य कोणीचि न मानी । दैव म्हणे मनि राम त्यांचे ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती बळिभद्र । येई द्वारकेस त्यजूनि स्थान ॥७॥

॥८७२॥
उग्रसेनादिक तया सन्मानिती । होई पापमुक्ति करितां यात्रा ॥१॥
नैमिषारण्यांत पुनरपि राम । जाऊनियां यज्ञ करी बहु ॥२॥
रेवतीसहित अवभृथस्नान । करुनि, धारण करी वस्त्रें ॥३॥
मुनीसीं तै रामें कथूनियां ज्ञान । दिधला करुन ब्रह्मबोध ॥४॥
शेषभगवानचरित्रया परी । स्मरेल त्यावरी प्रभुकृपा ॥५॥
वासुदेव म्हणे ईश्वरावतार । जनांसी आधार तेचि होती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 13, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP