श्री स्वामी समर्थ - या भवनदीतुन
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
या भवनदीतुन पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !
श्री गंगेचा वास मस्तकी
शशिबिंबाचे भूषण रे
जटाजूट शिरि पायि खडावा
अनसूयात येई रे
या भवनदीतुन पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !
सामगायने करिती मुनिजन
प्रसन्न तुजला नरहरि रे
भक्तांसाठी येशी धावत
वत्सल तू तर माता रे
या भवनदीतुन पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !
तीन शिरे, कर सहा शोभती
प्रसन्न वदनी दत्ता रे
येई धावत शिणले अंतर
नाही तुझविण त्राता रे
या भवनदीतुन पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !
N/A
References : N/A
Last Updated : May 23, 2023

TOP