श्री स्वामी समर्थ - स्वामी समर्थांच्या चरणी
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
स्वामि समर्थांच्या चरणी
नतमस्तक होऊ
कृपासिंधु दत्तप्रभुंना
भावफुले वाहू
भक्तीच्या माहेरी या
नसे भेदभाव
सावलीत वात्सल्याच्या
सुखावती जीव
विश्वरूप संसाराचा
भव्य तव पसारा
तुम्हां पदी आत्मसुखाचा
लाभला निवारा
भयशंकित होता जीव
सगुण रूप घ्यावे
निरांजने ओवाळोनी
तुम्हा आळवावे
रहा इथे भक्तांसाठी
युगे युगे देवा
आशीर्वच लाभो तुमचा
जन्म धन्य व्हावा
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023

TOP