श्री स्वामी समर्थ - प्रज्ञानगरी आले स्वामी
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आले
दाहिदिशांचे भाग्य उजळले, मंगलमय झाले
चिरंजीव हे दिगंत योगी
भस्म विभूषित शिव वैरागी
अवचित आले अपुल्या गेही, तनमन आनंदले
प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आले
कुठून आले कुणास ठावे
जगपालक त्या अनंत नावे
सर्वांभूती समर्थस्वामी एकरूप जाहले
प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आले
स्वयंप्रकाशी तेज तयांचे
विशाल मन हे दयाघनांचे
दर्शन घडता समचरणांचे, अंतर ओलावले
प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आले
उदंड माया त्यांची मिळता
मनीमानसी नुरते चिंता
स्वामी सामर्था, तुमच्या चरणी माझी भावफुले
प्रज्ञानगरी आले स्वामी, दत्तात्रय आले
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP