मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
दिगंबरा, जय दिगंबरा

श्री स्वामी समर्थ - दिगंबरा, जय दिगंबरा

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


दिगंबरा, जय दिगंबरा
स्वामि समर्था दिगंबरा
नाम स्मरणी दंग होऊनि
आत्मसुखाते वरा

दत्तरूप हे समर्थ असती
वीश्वात्मक हे योगी दिसती
मायबाप सर्वांचे असती
शरणागत मग होता चरणी
सुखवैभव ये घरा
दिगंबरा, जय दिगंबरा

मुनिवर हा परमेश सुखाचा
दाता, प्रेम, दया, शांतीचा
मंत्रघोष तारक समतेचा
अनंत कोटी ब्रम्हांडाचा
नायक हृदयी धरा
दिगंबरा, जय दिगंबरा

अपत्यांवरी करितो माया
दीन अनाथांची ही छाया
भवपाशाते चुकवी सदया
संकटनाशन दत्त प्रभूला
अखंड तुम्ही स्मरा
दिगंबरा, जय दिगंबरा
स्वामि समर्था दिगंबरा

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP