मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
तया माझा नमस्कार

श्री स्वामी समर्थ - तया माझा नमस्कार

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


भक्तिचिया गावा जावे
स्वामी समर्था पहावे
समाधिस्त विश्वंभर
तया माझा नमस्कार

जाई अनाथांच्या घरी
खाई कोरडी भाकरी
स्वामी कृपेचा सागर
तया माझा नमस्कार!

स्वामी थोर ध्न्वंतरी
व्याधी दु:ख दूर करी
धन्य अश्विनीकुमार
तया माझा नमस्कार!

स्वामी भजनी रंगतो
उभा कीर्तनी नाचतो
तोचि भक्तांचा आधार
तया माझा नमस्कार!

दीनानाथ दीनबंधू
स्वामी सखा कृपासिंधू
पंचभूतांचा आधार
तया माझा नमस्कार!

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP