मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
मनमंदिर

श्री स्वामी समर्थ - मनमंदिर

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


दत्ताच्या देशी जावे
त्रिगुणात्मक रूप पहावे
स्वामींच्या गावा जावे
दत्तात्रय नित्य भजावे

स्वामींच्या गावा जावे
कीर्तनात रंगुन जावे
दत्ताच्या मार्गी जावे
उपकारा जीवन द्यावे

प्रज्ञापुर क्षेत्री जावे
वटवृक्षातळी बसावे
स्वामींचे चरण धरावे
नतमस्तक तेथे व्हावे

भेदभाव विसरून जावे
विमल चित्त होऊन यावे
स्वामींचे ध्यान करावे
भवसागर पार तरावे

प्रेमाच्या गावा जावे
स्वामींचे चरित स्मरावे
अवधूत समोरी यावे
मनमंदिरी उजळुन जावे

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP