श्री स्वामी समर्थ - आरती स्वामी समर्थांची
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
सद्गुरू दत्तांची, आरती स्वामी समर्थांची
सद्गुणरूप पाहण्या जाहली दाटी भक्तांची
आरती स्वामी समर्थांची
भवतारक तू भक्तवत्सला
मोक्ष सुखाचा मार्ग दाविला
संकटनाशन नाम तुझे, तू माता सकलांची
आरती स्वामी समर्थांची
त्रिगुणात्मक श्रीदत्त दयेचा
कृपानिधी हा चैतन्याचा
पावन तुमचे रूप गुरवरा, ठेव अंतरीची
आरती स्वामी समर्थांची
अनाथनाथा तू जगदीश्वर
निज भक्तांवर घालिशी पाखर
अविरत सेवा घडो जीवनी श्री गुरु चरणांची
आरती स्वामी समर्थांची
सद्गुरू दत्तांची, आरती स्वामी समर्थांची
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP