मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
अवघाची आनंद

श्री स्वामी समर्थ - अवघाची आनंद

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


श्री याचक तू दाता
मी बालक तू माता
करुणासागर म्हणती तुजला
कृपा करी श्री दत्ता

तुझे आठवू रुप
सरे व्याप संताप
घनअंधारी मार्ग दवितो
भक्तीचा हा दीप

भक्तांचा तू देव
निर्मळ भोळा भाव
संत सज्जनी दंग कीर्तनी
रंगून जाई जीव

सगुण रूप तव दिसत
मोद होतसे चित्ता
अंतर्यामी तुला साठवू
स्वामी श्री अवधूता

उच्च नीच ना भेद
अवघाची आनंद
धन्य जाहला जीव आजला
स्मरता गोविंद

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP