श्री स्वामी समर्थ - धावा
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
तूच माय मी लेकरु
तूच गाय मी वासरू
तूच वृक्ष मी पाखरू
दत्ता येई बा सावरू
मन झाले कासाविशी
ध्यान उडाले आकाशी
भग्न जीवनाच्या वेशी
दत्ता रहा रे पाठीशी
तूच मेघ मी तृषार्त
आता पाहू नको अंत
धाव घेई माझे आई
ठाव चरणांशी देई
कसे दु:खाला आवरू
नको कृपाळा अव्हेरु
तूच माझा कल्पतरु
स्वामी समर्थ दातारू
आज धावा मी मांडिला
देह चरणी वाहिला
नाही त्राता तूजवीण
भव अपार दारुण
अंती जाहला प्रसन्न
दत्तराज दयाघन
आता आनंदले मन
झालो भजनी तल्लीन
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP