मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
ओंकाराचा नाद

श्री स्वामी समर्थ - ओंकाराचा नाद

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


ओंकाराचा नाद उमटला
दत्त समाधीतुनी
आत्मानंदे घेत विसावा
त्रैलोक्याचा धनी

काशीक्षेत्री वास करितसे
कधी गाणगापुरी
औदुंबर, वाडीस राहिला
श्री कृष्णेच्या तिरी

प्रज्ञापुरि हा आला स्वामी
क्षेत्र पंढरीतुनी
आत्मानंदे घेत विसावा
समाधिस्त हा मुनी

ब्रम्ह सनातन विष्णु रूप हे
महेश गिरिजावर
भक्तांसाठी नित्य उभा हा
त्रिकाल परमेश्वर

नरनारायण स्वामी समर्था
तुम्हीच चिंतामणी
ओंकाराचा नाद घुमू दे
भक्तांच्या मन्मनी

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP