मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
मना धरी छंद

श्री स्वामी समर्थ - मना धरी छंद

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


मना धरि छंद, तुटतील भवाचे बंध

भक्तीचा हा मार्ग नेटका
सहजसाध्य तो तुला भाविका
कशास धरिशी, उगाच हेका
आत्मानंद, तुटतील भवाचे बंध

दैव असे का कोठून येते
भविष्य घडते, अपुल्या हाती
सत्कर्माचे फळ त्या मिळते
पूर्णानंद, तुटतील भवाचे बंध

उपचारांची अनेक रुपे
उपाय एकच औषध सोपे
नामस्मरणे वीरतिल पापे
सहजानंद, तुटतील भावाचे बंध

दीप भक्तिचा लाव अंतरी
हव्या कासया मुक्ती चारी
समर्थ वसातिल हृदय मंदिरी
भज गोविंद, तुटतील भावाचे बंध

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP