पांडवप्रताप - अध्याय ९ वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
॥ श्री गणेशाय नमः ॥
भीष्मधृत राष्ट्रां प्रती ॥ कौरव पांडव आदरें सांगती ॥ विद्या समुद्र जैसा बृह स्पती ॥ धनुर्वेद जाणता ॥१॥
पूर्वी भार्गव कीं रघुवीर ॥ तैसाचि हा तिसरा धनुर्धर ॥ इटी मुद्रिका जेणें सत्वर ॥ कूपांतून काढिली ॥२॥
द्रोणाचार्य नाम तया ॥ सत्वर ॥ शिबिका पाठवू नियां ॥ मानें आणूनि आचार्या ॥ सर्वो पचारें तोष विजे ॥३॥
भीष्में पाठवो नियां वाहन ॥ द्रोण आणिला मानें करून ॥ श्रेष्ठा सनीं बैस वून ॥ वस्त्रा भरणीं पूजिला ॥४॥
भीष्म म्हणे आजि सुदिन ॥ जाहलें स्वामी तुमचें दर्शन ॥ कीर्ति ऐकोनि तृप्त श्रवण ॥ दर्शनें नेत्र आजि धाले ॥५॥
काय कार्यार्थ कल्पून ॥ स्वामींचें जाहलें आग मन ॥ मग बोले गुरु द्रोण ॥ ऐकें सुभटा सर्वज्ञा ॥६॥
पीडलों दरिद्रें करून ॥ पुत्र मागतां क्षीर पान ॥ पिष्टो दक शुभ्र करून ॥ पाजितां तृप्ति मानितो ॥७॥
चित्तासी वाटला खेद ॥ गुरु बंधु आमुचा द्रुपद ॥ पूर्व ओळख संबंध ॥ धरूनि गेलों त्या पाशीं ॥८॥
तेणें केला अपमान ॥ ह्रदयीं चेतला चिंताग्न ॥ तूं मेघ उदार कुरु भूषण ॥ म्हणोन आलों तव दर्शना ॥९॥
भीष्म बोले नेम वचन ॥ हें राज्य तनु मन धन ॥ तुज केलें समर्पण ॥ शिष्प जाण तुझे आम्ही ॥१०॥
तुज ऐसें निधान ॥ जोडलें पूर्व भाग्यें संपूर्ण ॥ शरीर सांडणें करुन ॥ तुज वरून ॥ टाकावें ॥११॥
तुं सर्वज्ञ गुरु मूर्ती ॥ मागणें हेंचि तुज प्रती ॥ आयुष्य सरे तोंवरी प्रीती ॥ संरक्षूनि असावें ॥१२॥
विशाल पाहोनि एक सदन ॥ सर्व संपत्ति आंत भरून ॥ धन धान्य वसनें पूर्ण ॥ दास दासी अपार ॥१३॥
अश्व शाला रथ कुंजर ॥ गाई म्हैशी खिल्लारें अपार ॥ रत्न जडित शिबिका सुंदर ॥ गुरु लागीं बैसा वया ॥१४॥
आपुले संपत्ती समान ॥ घर भरूनि दिधलें दान ॥ परम आनंदला द्रोण ॥ म्हणे धन्य धन्य कुरु वर्या ॥१५॥
कुटुंबी जाहले आनंद भरित ॥ वस्त्रा भरणीं मंडित ॥ पाहूनि भीष्में शुभ मुहूर्त ॥ राज कुमार आणिले ॥१६॥
पूजा करूनि विधियुक्त ॥ कौरव पांडव समस्त ॥ पायांवरी घालूनि गंगा सुत ॥ हातीं देत द्रोणाच्या ॥१७॥
सकळांसी सांगे द्रोण ॥ विद्या जाह लिया संपूर्ण ॥ जे एक इच्छी तसे मन ॥ कामना माझी पुरवा ते ॥१८॥
ऐसें बोले भर द्वाज कुमार ॥ दुर्योधनादि राज सुत समग्र ॥ खालीं पाहाती प्रत्युत्तर ॥ न देती ते कोणीही ॥१९॥
तों गर्जोनि बोले फाल्गुन ॥ जे शक्रासी दुर्घट कारण ॥ तें सिद्धीसी पाव वीन संपूर्ण ॥ चरण प्रतापें तुम चेनि ॥२०॥
ऐसें ऐकतां वचन ॥ द्रोणें ह्रदयीं धरिला अर्जुन ॥ म्हणे तुज हो अनंत कल्याण ॥ विजय नाम सफल हो ॥२१॥
अवघ्राणूनि मस्तक ॥ शिरीं ठेविला वरद हस्तक ॥ श्रेष्ठ पट्टशिष्य देख ॥ पार्थ करून ठेविला ॥२२॥
अश्वत्थाम्यासी सांगे द्रोण ॥ तुज हूनि मज प्रिय अर्जुन ॥ विद्या होईल यासी पूर्ण ॥ ऐक्यें स्त्रेहें वर्तत जा ॥२३॥
ऐसें बोलोनि द्रोण ॥ शस्त्रें अस्त्रें धनुष्य बाण ॥ करूनि त्यांचें पूजन ॥ आरंभ केला सांगा वया ॥२४॥
धनुर्वेद अन्न सन्न ॥ भारद्वाजें घातलें पवित्र ॥ देशो देशींचे राज पुत्र ॥ विद्यार्थी क्षुधित पातले ॥२५॥
सूर्याची अपर प्रतिमा दुसरी ॥ तो कर्ण उदार अभ्यास करी ॥ पार्थ जिंका वया समरीं ॥ कौरवांसीं मित्रत्व करीतसे ॥२६॥
शस्त्रास्त्रा विद्या भ्यासरत ॥ अव घेचि जाहले पारंगत ॥ परी अवघ्यांत आगळा पार्थ ॥ शस्त्रास्त्र विद्ये माझारी ॥२७॥
समस्तांसी सांगे द्रोण ॥ अंधारीं न करावें भोजन ॥ अवश्य म्हणे अर्जुन ॥ आज्ञा प्रमाण स्वामींची ॥२८॥
एकदां रात्रौ करितां भोजन ॥ दीप गेला वारा लागोन ॥ अर्जुनें अग्नि मंत्र स्मसेन ॥ दीप तत्काळ लाविला ॥२९॥
एकदां गुरु आज्ञा करीत ॥ कीं अंधारांत जेवा समस्त ॥ पात्रीं वाढूनि नाना पदार्थ ॥ पुढें आणून ठेविले ॥३०॥
अवघीं आवरिले हस्त ॥ अर्जुन निःशंक जेवीत ॥ पदार्थावरी हस्त पडत ॥ वक्र नोहे सर्वथा ॥३१॥
दीप आणिला जो तेथ ॥ तों जेवूनि बैसलासे पार्थ ॥ म्हणे हा लक्ष्य न चुके यथार्थ ॥ अचूक हस्त निश्चियें ॥३२॥
वरकडांसी पात्रें पाहत ॥ तों ते उगेचि बैसले तटस्थ ॥ कोणीं विदारिले पदार्थ ॥ एकांत एक मेळविले ॥३३॥
गंगेंत स्त्रान करूनि द्रोण ॥ वेगें परतला शिष्य घेऊन ॥ वटवृक्षा खालीं य़ेऊन ॥ उभाठा कला नावेक ॥३४॥
म्हणे अग्रोदक आणीं झडकरी ॥ अर्जु नाचे करीं देत झारी ॥ येरू आला गंगा तारीं ॥ तों मागें काय वर्तलें ॥३५॥
द्रोणासी म्हणे दुर्योधन ॥ एके बाणें समस्त शिरें जाण ॥ छेदावीं हें पार्थासी न कळतां पूर्ण ॥ मज लागिं शिकवावें ॥३६॥
अवश्य म्हणे द्रोण ॥ मांड विलें त्या हातीं ठाण ॥ म्हणे देंठ राखूनि पर्णें संपूर्ण ॥ वटाचीं या छेदीं कां ॥३७॥
दुर्यो धनें सोडिला बाण ॥ किंचित पर्णों गेलीं झदोन ॥ गुरु म्हणे न साधे संधान ॥ व्यर्थ श्रम करूं नको ॥३८॥
गुरु पुढें गेला तेथून ॥ तों वटा खालीं आला अर्जुन ॥ देखिलें गुरूचें ठाण ॥ पर्णें विलो कून वर पाहे ॥३९॥
तो कोठें म्हणे वट पत्रें ॥ झडलीं दिसती अणु मात्रें ॥ म्हणे हें संधान शरें ॥ भेदूनि पाहों कैसें पां ॥४०॥
बाणावरी ठेवूनि झारी ॥ ऊर्ध्व पाठविली अंबरी ॥ देंठ राखोनि पर्णें धरित्रीं ॥ छेदूनि पाडिलीं एक सरें ॥४१॥
तों धांव पुरोनि परतली झारी ॥ अर्जुनें झेलिली वरिच्या वरी ॥ मग पुढें जाऊनि झड करी ॥ दिधली करीं गुरूच्या ॥४२॥
म्हणे कां उशीर लागला ॥ येरें वर्तला वृत्तान्त कथिला ॥ दोण वटा खालीं आला ॥ आश्चर्य करी मानसीं ॥४३॥
अर्जु नासी म्हणे अग्रो दक झारी ॥ तुवां कैशी ठेविली भूमीवरी ॥ येरू म्हणे धाडिली अंबरीं ॥ इतुक्यांत पत्रें पाडिलीं ॥४४॥
मागुती झारी भरून ॥ पूर्व वत करीं म्हणे द्रोण ॥ देंठ अवघे छेदून ॥ पाडीं आतां धरे वरी ॥४५॥
झारी धाडिली अंबरांत ॥ तों देंठ तोडूनि समस्त ॥ झारी झेलूनि ठेवीत ॥ मस्तक गुरु पदाब्जीं ॥४६॥
गुरूनें ह्र्दयीं धरिला अर्जुन ॥ अश्रुधारा स्त्रवती नयन ॥ सव्यसाचीवरी अभिषेचन ॥ प्रेमोदकें गुरु करी ॥४७॥
बाप बाप वीर पार्थ ॥ म्हणोनि पाठी थापटीत ॥ पदक कंठीचें घालीत ॥ अर्जुनाचे गळां तेधवां ॥४८॥
अर्जुन भांडारीं विद्या धन ॥ अवधें माझें सांठवीन ॥ दुर्यों धन दुःशासन ॥ अधोवदनें पाहती ॥४९॥
म्हणे या लोकत्रयांत ॥ समर्थ एक वीर पार्थ ॥ ऐसें करीन यथार्थ ॥ तरीच द्रोण नाम माझें ॥५०॥
रथ कुंजर अश्वयनीं ॥ बैसोनि कैसें फिरावें समरां गणीं ॥ तें समस्तांसी फेरूनी ॥ अश्वत्थामा शिकवीत ॥५१॥
सिंह व्याघ्र रीस गज ॥ वृक नक्र उरग सतेज ॥ शरम वानरांशीं सहज ॥ युद्ध करूं शिकवीत ॥५२॥
झोट धरणी युद्ध करणें ॥ जलांत अंतरिक्षीं झुंजणें ॥ वज्रठाण न हालणें ॥ रणांगणीं सर्वथा ॥५३॥
अस्त्रें शस्त्रें नानाविध ॥ मल्लमेषवृष भयुद्ध ॥ महिष सूकरमुसंडी सुबद्ध ॥ चुकवूनि युद्ध करावें तें ॥५४॥
शूल तोमर गदा शक्ती ॥ चक्र लहुडी पाशगती ॥ असिलता मुद्नल पाशुपत गती ॥ विद्या सांगती गुरु तेव्हां ॥५५॥
लक्ष्य भेदूनि शर ॥ परतोनि यावा सत्वर ॥ दल सिंधूचें पैलतीर ॥ भेदूनि मागुती परतावें ॥५६॥
उदार धनिक द्वारीं येऊन ॥ मिळती जैसे याचक जन ॥ तैसे देशो देशींचे राज नंदन ॥ द्रोणा पाशीं सर्वदा ॥५७॥
हिरण्यधन्वि याचा सुत ॥ एक लव्य नामें किरात ॥ विद्या शिका वया अद्भुत ॥ गुरू जवळी पातला ॥५८॥
राज कुमार म्हणत ॥ आम्हां क्षत्रियांत किरात ॥ योग्य नव्हे यथार्थ ॥ म्हणो नियां दवडिला ॥५९॥
तेणें वंदूनि गुरु चरण ॥ ह्रदयीं रेखिलें तेंचि ध्यान ॥ महावनीं प्रवे शोन ॥ मूर्ति केली द्रोणाची ॥६०॥
सरोवरतीरीं उद्यान ॥ वंशजाळी परिघ घालून ॥ मृत्तिकेची गुरु प्रतिमा निर्मून ॥ भावें करून विद्या शिके ॥६१॥
धन्य कोळियाचा भाव ॥ विद्या साधली त्यासी सर्व ॥ अर्जुनाहूनि विशेष वैभव ॥ विद्येचें त्यास लाधलें ॥६२॥
पूर्ण विद्या व्हावया प्राप्त ॥ मुख्य भांडवल भावार्थ ॥ तयावीण सर्व व्यर्थ ॥ साधन संभार कासया ॥६३॥
एक लव्य पारधीसी ॥ एकदां गेला महावनासी ॥ तों द्रोण शिष्य भारेंसीं ॥ त्याचि वना पातला ॥६४॥
एक करिती अचूक संधान ॥ श्वापदें पाडिती विंधोन ॥ एकाचे चुकती बाण ॥ हांसती एक तयातें ॥६५॥
इकदे किरात फिरूनि वनीं ॥ येत आश्रमाला गूनी ॥ तों सारमेय वदन पसरूनी ॥ पुढें धांवत त्वरेनें ॥६६॥
एक लव्यें सोडूनि बाण ॥ सारमेयाचें खिळिलें वदन ॥ माघारें येत परतोन ॥ कौरव पांडवीं देखिलें ॥६७॥
म्हणती कोण्या वीराचें संधान ॥ खिळिलें ग्राम सिंहाचें वदन ॥ मुखा माजी भरले बाण ॥ अंगास ढका न लागतां ॥६८॥
अर्जुन चकित पहात ॥ तों पुढें देखिला किरात ॥ त्यासी अर्जुन पुसत ॥ गुरु तुझा कोण असे ॥६९॥
येरू म्हणे माझा गुरु द्रोण ॥ मग अर्जुन माघारा परतोन ॥ जात नरयानीं बैसोन ॥ तों भारद्वाज तेथें पातला ॥७०॥
पार्थ म्हणे मज हूनि विशेष ॥ विद्या दिधली किरातास ॥ गुरु म्हणे चल वनास ॥ दावीं आम्हांस किरात तो ॥७१॥
आले तयाच्या आश्रमा ॥ तों गुरु देखे आपुली प्रतिमा ॥ एक लव्या नावरे प्रेमा ॥ लोटां गणीं येतसे ॥७२॥
घालू नियां तृणा सन ॥ प्रेमें करी चरण क्षालन ॥ फलें पुष्पें आणून ॥ गुर्वर्चन करीतसे ॥७३॥
गुरु म्हणे तूं माझा शिष्य जाण ॥ दे दक्षिणा अंगुष्ठ छेदून ॥ येरें न करितां अनुमान ॥ उतरून पुढें ठेविला ॥७४॥
ते आज्ञा अजूनि चालत ॥ जितुके पृथ्वींत किरात ॥ ते सर्व बोटींच ओढिती शित ॥ अंगुष्ठ न लाविती सह साही ॥७५॥
संतोषला गुरु द्रोण ॥ एकल व्यासी वनीं स्थापून ॥ एवं विशेष केला अर्जुन ॥ कोळियाहून जाणिजे ॥७६॥
असो अवघे राज नंदन ॥ जाहले धनुर्वेद निपुण ॥ गदा युद्धीं सुजाण ॥ दुर्यो धन भीम पैं ॥७७॥
धनु र्विद्ये विषयीं कर्ण ॥ अर्जु नासी तोरा दावी पूर्ण ॥ शकुनी खङ्ग धरून ॥ सह देवासीं ईर्ष्या करी ॥७८॥
नकुळासीं युद्ध अद्भुत ॥ करूं इच्छी शकुनि सुत ॥ रथारोहणीं धर्म समर्थ ॥ शल्य भावी त्याशीं भिडाया ॥७९॥
असो परीक्षा पहावयास ॥ वटवृक्षीं उभवूनि वंश ॥ त्यावरी काष्ठकीर विशेष ॥ सुरंग करून स्थापिला ॥८०॥
शिष्यांसी सांगे द्रोण ॥ कीर पाडा रे विंधोन ॥ तों पंडूचा ज्येष्ठ नंदन ॥ धर्म राज ऊठिला ॥८१॥
गुरु म्हणे पाहें न्याहाळून ॥ परि काय दिसतें सांग खूण ॥ येरू म्हणे वंशीं कीर पूर्ण ॥ द्दष्टी माजी भासतसे ॥८२॥
गुरु म्हणेन साधे संधान ॥ ठेवीं खालीं धनुष्यबाण ॥ दुर्योधनादि राज नंदन ॥ ऐसेंचि करून पाहती ॥८३॥
मग उठिला अर्जुन ॥ चापास वेगें लाविला बाण ॥ मग म्हणे गुरु द्रोण ॥ काय दिसतें सांग पां ॥८४॥
येरू म्हणे करीराचे कंठीं ॥ तीन रेषा दिसती द्दष्टीं ॥ आज्ञा द्यावी मज श्रेष्ठीं ॥ मध्यरेषा भेदितों ॥८५॥
हूं म्हणतांचि गुरुवर ॥ अर्जुनें तत्काल सोडिला शर ॥ मध्यरेषा भेदूनि कीर ॥ धरणीवरी पाडिला ॥८६॥
संधानीं बैसला हस्त ॥ देखोनि गुरु आलिंगीत ॥ भला रे भला वीर पार्थ ॥ पाठ थापटी संतोषें ॥८७॥
गंगेंत स्त्रान करितां गुरु द्रोण ॥ महा जल चरें धरिले चरण ॥ कंठा पर्यंत गिळिला जाण ॥ सर्वांगाला गून गुरु सांगे ॥८८॥
म्हणे हा मगर मारूनि येधवां ॥ पुत्र हो मज सोडवा ॥ ऐसें समस्त ऐकतई तेधवां ॥ परी जलीं न प्रवेशे कोणीही ॥८९॥
एक कौरव आड लपती ॥ एक तेथेंचि शस्त्रें सांडिती ॥ मग हांक मारी गुरु मूर्ती ॥ धांवें अर्जुना सोडवीं मज ॥९०॥
घेऊनियां धनुष्य बाण ॥ लग बगें धांविन्नला अर्जुन ॥ उदकांत बुडी देऊन ॥ शिशुमार तो छेदिला ॥९१॥
गुरुसी ढका न लागतां पूर्ण ॥ त्यासीच भेदिले पांच बाण ॥ पृष्ठीं घेऊन गुरु द्रोण ॥ जला बाहेर आणिला ॥९२॥
गुरु म्हणे धन्य कुंती माउली ॥ तुजचि एका प्रसवली ॥ गजें द्रास सोडवी वनमाली ॥ केली तैसी ख्याति तुवां ॥९३॥
प्रसन्न जाहला गुरु द्रोण ॥ ब्रह्म शिर जया अभिधान ॥ सबीज मंत्र सांगोन ॥ अस्त्र दिधलें अर्जुना ॥९४॥
ज्याचें प्रताप तेज अद्भुत ॥ साहूं न शके कृतान्त ॥ ब्रह्मांत ग्रासील समस्त ॥ क्षणमात्र न लागतां ॥९५॥
द्रोण म्हणे ते क्षणीं ॥ वीरचक्रचूडामणी ॥ हें अस्त्र रक्षीं बहु प्रयत्नीं ॥ सोम वंश विजय ध्वजा ॥९६॥
मग पार्थास करीं धरून ॥ सभेस आला गुरु द्रोण ॥ भीष्म धृत राष्ट्रां लागून ॥ आज्ञा पीत ते धवां ॥९७॥
विद्या कुमारांसी जाहली पूर्ण ॥ त्यांची परीक्षा पहा बैसोन ॥ रंगागार एक निर्मून ॥ समस्त मिळा एकदा ॥९८॥
मग प्रधा नासी सांगूनि गंगा कुमार ॥ बोला वूनि चतुर सूत्र धार ॥ रंग धाम निर्मिलें सुंदर ॥ विद्या परीक्षा पहा वया ॥९९॥
पुढील वृक्ष गुल्में तोडून ॥ भूमिका केली अवघी समान ॥ भूमिदैवतें शांत वून ॥ बलिदानें समर्पिलीं ॥१००॥
रथ गज तुरंग सबळ ॥ फिरावया स्थळ केलें विशाळ ॥ विद्युल्लते सारिखे चपळ ॥ तळपती वीर ते ठायीं ॥१०१॥
चंदन कर्पूरकस्तूरी चूर्ण ॥ मृत्तिकेमाजी मिश्र करून ॥ सुवा सिक केली संपूर्ण ॥ बाहूंसी लावून पिटावया ॥१०२॥
नवरत्न मंडित मंडप गुणी ॥ उंच निर्मिला शत खणी ॥ ऋषि राजे प्रजा येऊनी ॥ पहावयासी बैसले ॥१०३॥
सोमकांत सूर्यकांत पाषाणीं ॥ सभा रचिली तये क्षणीं ॥ स्फटिकांच्या श्रेणी ॥ झळ कती सूर्या सारिख्या ॥१०४॥
सुवर्णाचे तुळवट ॥ हिर्यांचे खांब सदट ॥ गुरुड पाचूंचे दांडे नीट ॥ किलचा तेथें माणिकांच्या ॥१०५॥
असो दिव्या स्तरणें घालून ॥ सुमुहूर्तें बैसले येऊन ॥ प्रज्ञाचक्षु गंगा नंदन ॥ कृपाचार्य शिष्यांसीं ॥१०६॥
बाल्हीक आणि विदुर ॥ व्यास वैशंपायन शुकेंद्र ॥ जैमिनी संजय ब्रह्म पुत्र ॥ नारद स्वामी बैसले ॥१०७॥
तों अकस्मात घनश्याम वर्ण ॥ शुभ्र यज्ञोपवीत शुभ्र वसन ॥ श्वेत पुष्प माला घालून ॥ शुभ्र चंदन चर्चिला ॥१०८॥
शुभ्र हिर्यांचें पदक ॥ मुक्तामाला रुळती देख ॥ शिष्यां सहित सुरेख ॥ द्रोणा चार्य पातला ॥१०९॥
धृत राष्ट्र गंगा नंदन ॥ उठोनि देती अभ्युत्थान ॥ श्रेष्ठा सनीं बैस वून ॥ केलें पुजन तेधवां ॥११०॥
कुंती गांधारी असंख्य स्त्रिया ॥ सभेसी पाहूं पात लिया ॥ जेथें लाविल्या मुक्त जाळिया ॥ आड बैसती पहावया ॥१११॥
गज पुरींच्या प्रजा बहुत ॥ नारी नर पातलें तेथ ॥ देशोदेशींचे नृप धांवत ॥ परिवारांसी पहावया ॥११२॥
बहुत ऋषीचें संभार ॥ एके पंक्ती बैसती समग्र ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ चार्ही वर्ण पाहती ॥११३॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ लागले वाद्यांचे गरज ॥ पातले महावीरांचे भार ॥ शस्त्रास्त्रीं सिद्ध होऊनी ॥११४॥
कडाडिल्या महाशक्ती ॥ तडक यंत्रांचे ध्वनि गाजती ॥ म्हावीर हांका देती ॥ बाहु पिटिती सत्राणें ॥११५॥
बळें ठोकिल्या राज भेरी ॥ तो नाद न मावे अंबरीं ॥ उर्वी मंडल थरारी ॥ धाके अंतरीं भोगींद्र ॥११६॥
मग नमूनियां गुरु द्रोण ॥ शस्त्रें पूजिलीं संपूर्ण आरक्त पुष्प माला घालून ॥ रक्त चंदन चर्चिला ॥११७॥
आचार्यांची आज्ञा घेऊन ॥ दाविती शस्त्र विद्या संधान ॥ आवेशें करिती वीर गर्जन ॥ नाद गगनीं न समावें ॥११८॥
अचूक वीरांचें संधान ॥ संकेतें पाडिती विंधोन ॥ एक झांको नियां नयन ॥ मग लक्ष्य भेदिती ॥११९॥
एक पाठमोरे विंधीत ॥ लक्ष्य भेदीत नेमस्त ॥ शस्त्रमंत्रांच्या समस्त ॥ विद्या दाविती खेळोनी ॥१२०॥
यम दंष्ट्रा अति तीक्ष्ण ॥ भाले काठिया गुप्तिया जाण ॥ कातिका शक्ति दारुण ॥ खङ्ग बाण ॥ सूरिया ॥१२१॥
दशघ्नी शातघ्नी तिधारें पाशुपत ॥ परशु पट्टिश दुधारें तळपत ॥ पाश लहुडी वज्र तोमर झळकत ॥ चक्रें चेंडु मुद्नुल गदा ॥१२२॥
अर्गला सान खंडें भिंडिमाला ॥ हस्त पाषाण लोह श्रृंखला ॥ लोह वृश्चिक कंटकमाला ॥ उल्हाट यंत्रें अचूक ॥१२३॥
अस्त्रें सोडूनि आवरिती ॥ जें अस्त्र धरिलें हातीं ॥ त्याचि अभिमानें तेचि तळपती ॥ गति दाविती विशेष ॥१२४॥
रहंवरीं कुंजरीं बैसती रथीं ॥ अलात चक्रवत फिर विती ॥ एक चरणीं चमकती ॥ गति दाविती अनेक ॥१२५॥
एक जेठी अनिवार ॥ करीं कदा न धरिती अस्त्र ॥ शस्त्रा सहित कर ॥ मोडिती अकस्मात येऊनी ॥१२६॥
पक्ष्या सारिखे येऊनी ॥ अंगें टाकिती मोडूनी ॥ शस्त्रें न्यावीं हिरोनी ॥ मण गटें त्वरें मोडू नियां ॥१२७॥
महाराज आचार्य द्रोणें ॥ शिकविलीं नाना शस्त्र साधनें ॥ वीररस माजला तेणें ॥ दिवस रजनी आठवेना ॥१२८॥
तों हांक वाजली अत्यद्भुत ॥ वाटे ह्र्दयीं दचके कृतान्त ॥ सभा जाहली भयभीत ॥ हांके सरसी तयांच्या ॥१२९॥
कीं दोघे आले ऐरावती ॥ कीं सिंहचि दोघे गर्जती ॥ आरोळी ऐको नियां चितीं ॥ महावीर त्रासले ॥१३०॥
तों भीम आणि दुर्योधन ॥ प्रचंड गदा हातीं घेऊन ॥ विचित्र मंडलें दावून ॥ बळें परजिती ह्स्त कीं ॥१३१॥
मुखें गर्जना करून ॥ महीवरी पिटिती चरण ॥ हुंकारें उफाळती पंचानन ॥ तैसे दोघे अनिवार ॥१३२॥
दशनीं चाविती अधर ॥ आरक्तवर्ण जाहले नेत्र ॥ श्मश्रु पिळुनि सत्वर ॥ पदें पुढारां टाकिती ॥१३३॥
एक एकाचे प्राण ॥ घ्यावया सिद्ध गदा उचलून ॥ तों हाहाकार जाहला पूर्ण ॥ महावीर गजबजले ॥१३४॥
एक वर्णिती दुर्योधन ॥ एक म्हणती धन्य भीम सेन ॥ कृतान्तही येऊन ॥ उभा न राहे यां पुढें ॥१३५॥
द्रोणें सांगितलें स्वपुत्रा लागून ॥ दोहीं करीं धरून ॥ आचार्य पदाची आण घालून ॥ युद्ध त्यांचें वारावें ॥१३६॥
विद्या परीक्षा पहावया लागून ॥ समारंभ केला कौतुकें जाण ॥ तों तुम्हीं मांडिलें निर्वाण ॥ प्राण घेऊं इच्छितां ॥१३७॥
चातुर्या वीण विद्या सकल ॥ क्षणांत होऊनि जाय विकल ॥ समय पाहूनि भूपाल ॥ कार्य आपुलें साधिती ॥१३८॥
जेवीं एका मंत्रें करून ॥ दोन भुजंग आकळिजे दारुण ॥ तैसे सुयोधन भीम सेन ॥ आचार्य सुतें वारिलें ॥१३९॥
तों त्या रंगांत अकस्मात ॥ जडित मुकुट शिरीं तळपत ॥ जडित कुंडलें ओप देत ॥ विद्युल्लते सारिखीं ॥१४०॥
रत्न मंडित आभरणें ॥ कटिमेख लेवरी दिव्य रत्नें ॥ कन कवर्ण दिव्य वसनें ॥ उजेड पडे सभेवरी ॥१४१॥
रत्न जडित धनुष्य परिकर ॥ शरें दाटले रत्न जडित तूणीर ॥ आंगीं कवच तेज अपार ॥ प्रलय चपले सारिखें ॥१४२॥
अकस्मात उगवे सहस्त्र किरण ॥ तैसा आला वीर अर्जुन ॥ करीत आवेशें गर्जन ॥ ऐकतां वीर खवळले ॥१४३॥
धड कती वाद्यांचे कल्लोळ ॥ संपूर्ण भरला ब्रह्म गोळ ॥ पार्थाचें प्रतपा बळ ॥ भाट वर्णिती गर्जोनि ॥१४४॥
धृत राष्ट्र पुसे विदुरा लागून ॥ गर्जत जैसा पंचानन ॥ वाटे डळमळिलें त्रिभुवन ॥ वीर हा कोण सांग पां ॥१४५॥
विदुर म्हणे तुझा नंदन ॥ कुंती बाल धनंजय जाण ॥ येरू म्हणे वंश शूषण ॥ भीमार्जुन धन्य हे ॥१४६॥
यानंतरें वीर पार्थ ॥ शस्त्रास्त्र विद्या दावांत ॥ अग्न्यस्त्र त्वरें सोडीत ॥ शांतवीत पर्जन्यास्त्रें ॥१४७॥
वरुणास्त्रें जललोट ॥ वातास्त्रें प्रभंजन धुंधाट ॥ भौमास्त्रें भूमीचें पोट ॥ रथाशीं जावें भेदूनि ॥१४८॥
काळे रात्रीं अंधार विशेष ॥ सूर्यास्त्रें पाडी प्रकाश ॥ सर्पास्त्रावरी खगेश ॥ सोडूनि निवटी प्रतापें ॥१४९॥
त्रिविक्रमतुल्य दिसे अर्जुन ॥ सवेंचि होय जेवीं वामन ॥ सवेंचि दिसे सर्षप प्रमाण ॥ अगोचर होय क्षणांत ॥१५०॥
पाताळा जाय क्षणांत ॥ सवेंचि भूमंडळीं उमटत ॥ क्षणांत रथावरी बैसत ॥ तुरंगीं चढत न कळे केव्हां ॥१५१॥
केव्हां बैसला कुंजरीं ॥ द्दष्टी न ये झडकरी ॥ अलातचक्र चियेपरी ॥ कोणे दिशे ठेला न कळे तो ॥१५२॥
लोहस्तं भावरी वराह फिरत ॥ दंतांत जिव्हा लळलळित ॥ खालीं पाहोनि अकस्मात ॥ जिव्हा छेदीत पार्थ पैं ॥१५३॥
पुढें पाहोनि मागें विंधी ॥ खालीं निर खूनि वरी भेदी ॥ शिंगावरी ठेवूनि गुंज छेदी ॥ ओंवी वेगीं बाण मुद्रेंतून ॥१५४॥
वाम सव्य उभय हस्तकें ॥ संधान चाले समान सारिखें ॥ अंधारीं जेथें ॥ शब्द ऐके ॥ शर मारी तेचि ठायीं ॥१५५॥
एके बाणें करून ॥ वटपत्रें पाडी छेदून ॥ कार्य साधूनि बाण ॥ परतोन आणी माघारां ॥१५६॥
सेवक धुंडिती जैसे तस्कर ॥ तेवीं शत्रु शोधिती शर ॥ असो विधीनें निर्मिले अस्त्र मंत्र ॥ अर्जुनें तितु केही पर्णिले ॥१५७॥
ऐसें अर्जु नाचें संधान ॥ तटस्थ पाहती सभाजन ॥ तों कृतान्तकिंकाळी समान ॥ हांक बाहेर गाजली ॥१५८॥
डळमळलें भूमंडल ॥ वाटे तड कला कन काचल ॥ किंवा आटलें समुद्र जल ॥ मेघ दचके अंतरीं ॥१५९॥
उर्वी डळमळे क्षणो क्षणीं ॥ उभा राहों न शके कोणी ॥ महावीर शस्त्रा पाणी ॥ एकावरी एक पडियेले ॥१६०॥
तों महा धाकड उन्मत्त ॥ रंगीं येऊनि लोळत ॥ दोर्दंड पिटितां लोक भावीत ॥ वीज आली सभेवरी ॥१६१॥
बंधूंसमवेत सुयो धन ॥ सामोरा जात उठोन ॥ जैसा माध्यान्हीं चंड किरण ॥ तैसा कर्ण सभेसी दिसे ॥१६२॥
सूर्य पुत्र कर्ण उदार ॥ ज्याशीं स्वरूपें उणा पंचशर ॥ किरीट कुंडलें तेजा कार ॥ वदन चंद्र न वर्णवे ॥१६३॥
सौंदर्य सिंधु हेला वला पूर्ण ॥ तैसा रणां गणीं उभा कर्ण ॥ कृपाचार्य द्रोण चरण ॥ वंदूनि उभा राहिला ॥१६४॥
सभारंग पुनः दाटत ॥ जैसा मेघ ओसरोनि वर्षत ॥ तैसा पार्था पाठीं अद्भुत ॥ कर्णें रंग भरियेला ॥१६५॥
कर्ण म्हणे ते वेळां ॥ रे रे अर्जुना कुंती बाळा ॥ तुवां विद्या दाविल्या सकळा ॥ त्यांचे चौदा गुणें दावीन मी ॥१६६॥
श्लाघ्यता धरूं नको अंतरीं ॥ गर्व सांडीं ये अवसरीं ॥ अभिमानें तव शिर निर्धारीं ॥ पायांतळीं माझिया ॥१६७॥
अर्जुनें विद्या दाविली ॥ त्या हूनि कर्णें विशेष केली ॥ सुयो धनाचा आनंद ते काळीं ॥ गगन मंडळीं न समावे ॥१६८॥
तेव्हां कर्णा चिये कंठीं ॥ दुर्योधन घाली मिठी ॥ म्हणे प्राण सखया गोष्टी ॥ आज्ञापीं मज आवडे ते ॥१६९॥
येरू म्हणे वाटतें मनीं ॥ पार्थाशीं भिडावें समरां गणीं ॥ सुयो धन म्हणे कालें करून ॥ इच्छा पूर्ण होईल ॥१७०॥
करूनि राज्याचा अर्ध भाग समान ॥ तुज म्यां दिधला प्रीती करून ॥ सुह्रदांच्या माथां पाय देऊन ॥ भोग भोगीं मज ऐसे ॥१७१॥
तंव क्रोधें बोलत अर्जुन ॥ तो पुरुष शत मूर्ख पूर्ण ॥ जो ईर्ष्या वाढवी कार्या वीण ॥ धरूनि अभिमान बोले जो ॥१७२॥
पंचा नना सन्मुख हस्ती ॥ कुंभ स्थळींचीं मुक्तें दाविती ॥ कस्तुरी सुवास मिरा विती ॥ व्याघ्रा पुढें हरिण जैसे ॥१७३॥
कीं मद्यपी शस्त्रें झाडीत ॥ आपुलें अंग आपण छेदीत ॥ तैसे अहंकारें उन्मत्त ॥ क्षीण तुम्हीच व्हाल पैं ॥१७४॥
आम्हां वरी गोष्टी घालून ॥ कपटें बोलतां तीक्ष्ण ॥ परी क्षणांत मस्तकें छेदून ॥ धरातळीं पाडीन मी ॥१७५॥
ऐसें बोलतां अर्जुन ॥ युद्धासी उभा ठाकला कर्ण ॥ तों पांडव पांचही जण ॥ सिद्ध झाले झूंजा वया ॥१७६॥
दुर्यो धन बंधूं सहित ॥ कर्णाचे पाठीं उभा ठाकत ॥ द्रोण कृपा चार्य गंगा सुत ॥ पांडवांकडे जाहले ॥१७७॥
सभा दोन भाग होत ॥ तों भास्कर आणि पुरुहूत ॥ अंतरिक्षीं कौतुक विलो कीत ॥ निज पुत्रांचें तेधवां ॥१७८॥
युद्धासी कर्ण अर्जुन ॥ उभे ठाकले जाणून ॥ कुंती ह्र्दयीं चिंताग्न ॥ परम दारुण पेटला ॥१७९॥
मन जाहलें व्या कुळ ॥ नेत्रीं वाहे अश्रु जळ ॥ मूर्च्छना येत तत्काळ ॥ विदुर तेव्हां सांवरी ॥१८०॥
म्हणे चिंता नसे कांहीं ॥ स्वस्थ होऊनि कौतुक पाहीं ॥ इकडे कृपाचार्य ते समयीं ॥ काय गर्जोनि बोलत ॥१८१॥
सोमवंश शमुकुटा वतंस ॥ पंडुनृपति विख्यात निर्दोष ॥ त्याचा पुत्र अर्जुन विशेष ॥ सर्व लक्षणीं परिपूर्ण ॥१८२॥
कुंती माता वसु देव भगिनी ॥ आत म्हणे चक्र पाणी ॥ तैसीं कर्णाचीं कुलें उच्चारा दोनी ॥ ऐकती कर्णीं समस्त ॥१८३॥
सम समान योग्यता बळ ॥ अर्जु नाशीं मांडावें सकळ ॥ ऐकतां कर्ण तत्काळ ॥ ते जहीन जाहला ॥१८४॥
मग बोले सुयो धन ॥ शौर्य बळेम आगळा कर्ण ॥ काय कुलाशीं कारण ॥ विद्या भूषण थोर असे ॥१८५॥
सुकुलीन परी विद्या हीन ॥ काय व्यर्थ तो वांचोन ॥ कृपाचार्या विपरीत वचन ॥ वडील होऊन बोलसी ॥१८६॥
राजा नोहे हा कर्ण ॥ जरी म्हणत असेल अर्जुन ॥ तरी अंग देशाचा संपूर्ण ॥ राजा करीन हा आतां ॥१८७॥
सकल सामुग्री आणून ॥ कर्णासी रत्न पीठीं बैस वून ॥ समस्त राज चिन्हें देऊन ॥ अभिषेक केला तेधवां ॥१८८॥
मांडलिक रायांसी म्हणे सुयो धन ॥ मज समान मानूनि कर्ण ॥ मेदिनी हातें स्पर्शोन ॥ करा नमन उठा आतां ॥१८९॥
समस्त करिती नमन ॥ मग बोले उदार कर्ण ॥ सुयो धना माग मज लागून ॥ कांहीं तरी ये वेळे ॥१९०॥
दुर्यो धन म्हणे राजोत्तमा ॥ जोंवरी आयुष्य आहे तुम्हां आम्हां ॥ तोंवरी मैत्री स्त्रेह प्रेमा ॥ दिवसें दिवस वाढ विंजे ॥१९१॥
अवश्य म्हणोनि कर्ण ॥ सव्य हस्त उचलून ॥ दे द्दढ भाष दान ॥ तों राधार मण पातला ॥१९२॥
राज्य आलें पुत्रासी ॥ म्हणोनि पातला वेगेंसीं ॥ कर्णें उठोनि त्यासी ॥ नमस्कारिलें तेधवां ॥१९३॥
मग मस्तक अवघ्राणून ॥ पुत्रासी दिधलें आलिंगन ॥ तों उगा न राहे भीम सेन ॥ काय गर्जोन बोलत ॥१९४॥
म्हणे रथ सारथी किरात ॥ त्याचा तूं केवळ कर्ण सुत ॥ आजि कळलें निश्चित ॥ उभय कुलीं शुद्ध तूं ॥१९५॥
तुवांही रथ सारथ्य करावें ॥ क्षत्रिय धर्मी कासया व्हावें ॥ अर्जुनाशीं द्वंद्वयुद्ध करावें ॥ मनीं धरिशी मति मंदा ॥१९६॥
राजहंसाशीं काग देख ॥ कीं श्रोत्रिया संमुख हिंसक ॥ कीं महिषा पुढें मशक ॥ अर्जुना पुढें तैसा तूं ॥१९७॥
तुज काय राज्या सन ॥ योग्य नव्हेसी अवर्ण ॥ नट संन्यासी जाहला एक क्षण ॥ परी तया कोण वंदीना ॥१९८॥
ऐसें बोलतां भीम सेन ॥ करकरां दांत खाय कर्ण ॥ अवलोकूनि चंडकिरण ॥ कुंतीकडे पाहातसे ॥१९९॥
म्हणे सभेंत बैसून ॥ कोणासी काय बोलावें वचन ॥ हें ज्यासी न कळे पूर्ण ॥ मनुष्य कोण म्हणे तया ॥२००॥
ऋषि नदी नृप शूर ॥ यांचा शोध न कीजे समग्र ॥ मुखें निंदा करीतो निर्धार ॥ महा कंटक जाणावा ॥२०१॥
वृक्ष मूलीं द्दष्टि न घालून ॥ फलीं ठेविजे चित्त पूर्ण ॥ मिलिंद कर्दम सोडून ॥ सुवास घेती कमलांचा ॥२०२॥
कैसरी जन्मेल अजेचे पोटीं ॥ हे कालत्रयीं न घडे गोष्टी ॥ हनु मंत केवळ धूर्जटी ॥ तो काय वानर म्हणावा ॥२०३॥
मुंगी चिया विवरांत ॥ कैसा समावेला ऐरावत ॥ तैसा नीचक्षेत्रीं मी सूर्य सुत ॥ निप जेन कैसा नेणा तुम्ही ॥२०४॥
समुद्र वलायां कित धरणी ॥ ओंवाळावी नखा वरूनी ॥ तेथें अंगराज्यासी कोण गणी ॥ नेणा मनीं मूर्ख हो ॥२०५॥
ऐसें बोलतां वीर कर्ण ॥ गदा सांवरी भीम सेन ॥ तों सभा खखबळली संपूर्ण ॥ हाहाकार जाहला ॥२०६॥
अर्जुनाचे भयें करूनी ॥ कौरव उभे कर्णासी वेष्टूनी ॥ तों वरूण दिग्व धूचे सदनीं ॥ सहस्त्रकिरण प्रवेशला ॥२०७॥
संध्याकाल जाणून ॥ ते संधींत उठला गुरु द्रोण ॥ कर्ण आणि भीम सेन ॥ दोघे वारिले दों पक्षीं ॥२०८॥
प्रलयीं जैसा फुटे समुद्र ॥ तैसी सभा उठिली समग्र ॥ आपुलाल्या स्थला सत्वर ॥ नर नारी जाती तेव्हां ॥२०९॥
एक वर्णिती दुर्यो धन कर्ण ॥ एक म्हणती धन्य भीमार्जुन ॥ एक म्हणती कलह दारुण ॥ होत होतां वारला ॥२१०॥
कुंतीसी आनंद जाहला पूर्ण ॥ कलह वारला म्हणोन ॥ वंदी विदुराचे चरण ॥ म्हणे धन्य धन्य ज्ञानी तूं ॥२११॥
गुरूसी गुरु दक्षिणा यथार्थ ॥ देईल आतां वीर पार्थ ॥ धरूनि आणील नृपनाथ द्रुपद पांचाल देशींचा ॥२१२॥
तें पंडित चतुर जन ॥ ब्रह्मा नंदें करोत श्रवण ॥ श्रीधर संतांचा दीन ॥ चातुर्य साहित्य नेणेवि ॥२१३॥
परी दयालु ब्रह्मा नंद सत्य ॥ तेणें मस्तकीं ठेविला हस्त ॥ त्या वर प्रसादें श्री धर बोलत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२१४॥
सुरस पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ नव माध्यायीं कथियेला ॥२१५॥
स्वस्ति श्रीपांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्री धर कृत ॥ विद्या परीक्षा समस्त ॥ कर्ण भिषेचन कथियेलें ॥२१६॥
इति श्री पांडवप्रतापे नवमाध्यायः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP