मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
दमनारोपणविधि

द्वितीय परिच्छेद - दमनारोपणविधि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


आतां आगमोक्त दीक्षा ज्यास आहे त्यानें कर्तव्य दमनारोपणविधि सांगतो.

अथागमोक्तदीक्षावतोदमनारोपणविधिः रामार्चनचंद्रिकायां तत्रैकादश्यां क्रियालोपविघातार्थं यत्त्वयाविहितंप्रभो नमेविघ्नोभवेदत्रकुरुनाथदयांमयि सर्वथासर्वदाविष्णोममत्वंपरमागतिः उपवासेनत्वांदेवतोषयामिजगत्पते कामक्रोधादयोप्येतेनमेस्युर्व्रतघातकाः अद्यप्रभृतिदेवेशयावद्वैशेषिकंदिनम् तावद्रक्षात्वया कार्यासर्वस्यास्यजगत्पते इतिदेवंप्रार्थ्यदमनमादायपंचगव्येनप्रोक्ष्यवारिणाप्रक्षाल्याशोकमूलेदेवाग्रेवा अशोकायनमस्तुभ्यंकामस्त्रीशोकनाशन शोकार्तिंहरमेनित्यमानंदंजनयस्वमे इत्यशोकं त्रुट्यादिकालपर्यंतः कालरुपोमहाबलः कलतेचैवयः सर्वंतस्मैकालात्मनेनमइतिकालं वसंतायनमस्तुभ्यंवृक्षगुल्मलताश्रय सहस्त्रमुखसंवासकामरुपनमोस्तुतइतिवसंतं कामभस्मसमुद्भूतरतिबाष्पपरिप्लुत ऋषिगंधर्वदेवादिविमोहकन मोस्तुतइतिदमनंचसंपूज्य नमोस्तुपंचबाणायजगदाह्लादकारिणे मन्मथायजगन्नेत्रेरतिप्रीतिप्रियायते इति दमनमुपस्थाय ॐ कामायनम इतिसंपूज्यनिशायांदेवताग्रेपंचवर्णैः चंदनेनवाअष्टदलंकृत्वाबहिश्चतुरस्रंतद्बहिर्वतुलत्रयंतद्बहिर्वृत्तंचतुरस्रंचकृत्वातत्रकुंभंसंस्थाप्योपरिदमनंपूजयित्वा पूजार्थंदेवदेवस्यविष्णोलक्ष्मीपतेप्रभो मदनत्वमिहागच्छसांनिध्यंकुरुतेनमः ॐ क्लींकामदेवायनमः ॐ ह्नींरत्यैनम इत्यावाह्य दिक्षुपूर्वादितः स्मरशरीरायनमः अनंगाय० मन्मथाय० कामाय० क्लींवसंतसखाय० स्मराय० इक्षुचापाय० पुष्पास्त्रायनम
इति पूजयित्वा ॐ तत्स्वरुपायविद्महेकामदेवायधीमहि तन्नोऽनंगः प्रचोदयात् इत्यष्टोत्तरशतंसंमंत्र्यपूजयित्वा ह्नींनमइतिपुष्पांजलिंदत्वा नमोस्तुपुष्पबाणायजगदाह्लादकारिणे मन्मथायजगन्नेत्रेरतिप्रीतिप्रियायतेइतिनत्वा
आमंत्रितोसिदेवेशपुराणपुरुषोत्तम प्रातस्त्वांपूजयिष्यामिसान्निध्यंकुरुकेशव क्षीरोदधिंमहानागशय्यावस्थितविग्रह प्रातस्त्वांपूजयिष्यामिसन्निधौभवतेनमः निवेदयाम्यहंतुभ्यंप्रातर्दमनकंशुभं सर्वदासर्वथाविष्णोनमस्तेस्तुप्रसीदमेइतिदेवंसंप्रार्थ्यपुष्पांजलिंदत्वा अस्त्रेणचक्रमंत्रेणवारक्षांकुर्यात्‍ ततः प्रातर्नित्यपूजांकृत्वापुनर्देवंसंपूज्यगंधदूर्वाक्षतयुक्तंदमनमादायमूलमंत्रंपठित्वा देवदेवजगन्नाथवांछितार्थप्रदायक ह्रदिस्थान्  पूरयेः कामान् ममकामेश्वरीप्रिय इदंदमनकंदेवगृहाणमदनुग्रहात् इमांसांवत्सरींपूजांभगवन्परिपूरयइतिमंत्रांतेपुनर्मूलमंत्रेणदेवेसमर्पयेत् ततः अंगदेवताभ्यः स्वस्वमंत्रेणदत्वाप्रार्थयेत् मणिविद्रूममालाभिर्मंदारकुसुमादिभिः इयंसावत्सरीपूजातवास्तुगरुडध्वज वनमालांयथाविष्णोकौस्तुभंसततंह्रदि तद्वद्दामनकींमालांपूजांचह्रदयेवह जानताजानतावापिनकृतंयत्तवार्चनम्‍ तत्सर्वंपूर्णतांयातुत्वत्प्रसादाद्रमापते जितंतेपुंडरीकाक्षनमस्तेविश्वभावन नमस्तेस्तुह्रषीकेशमहापुरुषपूर्वज मंत्रहीनमितिचसंप्रार्थ्य पंचोपचारैः पुनः संपूज्यनीराज्यप्रार्थयेदिति ।


रामार्चनचंद्रिकेंत - एकादशीचे ठायीं “ क्रियालोपविघातार्थं यत्त्वया विहितं प्रभो । नमोविघ्नोभवेदत्र कुरु नाथ दयां मयि ॥ सर्वथा सर्वदा विष्णो मम त्वं परमा गतिः । उपवासेन त्वां देव तोषयामि जगत्पते ॥ कामक्रोधादयोप्येते न मे स्युर्व्रतघातकाः । अद्यप्रभृति देवेश यावद्वैशेषिकं दिनं ॥ ताव दक्षा त्वया कार्या सर्वस्यास्य जगत्पते ॥ ” अशी देवाची प्रार्थना करुन दमनक ( दवणा ) आणून पंचगव्यानें प्रोक्षण करुन उदकानें धुवावा. नंतर अशोकवृक्षाचे मूलीं किंवा देवाचे अग्रभागीं पूजा करावी, ती अशी - पूजामंत्र - “ अशोकाय नमस्तुभ्यं कामस्त्रीशोकनाशन । शोकार्तिं हर मे नित्यमानंदं जनयस्व मे ॥ ” यानें अशोकाची पूजा करावी. “ त्रुट्यादिकलपर्यंतः कालरुपो महाबलः । कलते चैव यः सर्वे तस्मै कालात्मने नमः ॥ ” यानें
कालाची पूजा करावी. “ वसंताय नमस्तुभ्यं वृक्षगुल्मलताश्रय । सहस्त्रमुखसंवास कामरुप नमोस्तुते ॥ ” यानें वसंताची पूजा करावी. “ कामभस्मसमुद्भूत रतिबाष्पपरिप्लुत । ऋषिगंधर्वदेवादिविमोहकनमोस्तुते ॥ ” यानें दवण्याची पूजा करावी. नंतर “ नमोस्तु पंचबाणाय जगदाह्लादकारिणे । मन्मथाय जगन्नेत्रे रतिप्रीतिप्रियाय ते ॥ ” या मंत्रानें दमनकाचें उपस्थान करुन “ ॐ कामाय नमः ” ह्या नाममंत्रानें पूजन करुन रात्रीं देवाचे पुढें पांच रंगांनीं किंवा चंदनानें अष्टदल करुन त्याचे बाहेर चतुरस्त्र, त्याचे बाहेर तीन वर्तुलें, त्याचे बाहेर वृत्त व चतुरस्त्र असे मंडल करुन त्यावर कलश स्थापन करुन त्या कलशावर दमनाची पूजा करावी. ती अशी - “ पूजार्थे देवदेवस्य विष्णो लक्ष्मीपते प्रभो । दमनत्वमिहागच्छ सान्निध्यं कुरु ते नमः ॐक्लीं कामदेवाय नमः । ह्नीं रत्यै नमः ” या मंत्रानें आवाहन करुन पूर्वादि अष्ट दिशांचे ठायीं - “ भस्मशरीराय नमः अनंगाय० मन्मथाय० कामाय० क्लीं वसंतसखा० स्मराय० इक्षुचापाय० पुष्पास्त्राय नमः ” या नाम मंत्रांनीं अष्टदिशांचे ठायीं पूजन करुन ॐतत्स्वरुपाय विद्महे कामदेवाय धीमहि ॥ तन्नोऽनंगः प्रचोदयात्‍ ॥ ह्या मंत्रानें एकशें आठवेळ दमनक मंत्रून “ ह्नींनमः ” ह्या मंत्रानें पुष्पांजलि देऊन “ नमोस्तु पुष्पबाणाय० ” या पूर्वोक्तमंत्रानें नमस्कार करुन “ आमंत्रितोसि देवेश पुराणपुरुषोत्तम । प्रातस्त्वां पूजयिष्यामि सान्निध्यं कुरुकेशव ॥ क्षीरोदधिमहानागशय्यावस्थितविग्रह । प्रातस्त्वां पूजयिष्यामि सन्निधौ भव ते नमः ॥ निवेदयाम्यहं तुभ्यं प्रातर्दमनकं शुभम्‍ । सर्वदा सर्वथा विष्णो नमस्तेस्तु प्रसीद मे ॥ ” ह्या मंत्रांनीं देवाची प्रार्थना करुन पुष्पांजलि द्यावी. अस्त्रानें किंवा चक्रमंत्रानें रक्षा करावी. नंतर प्रातःकाळीं नित्यपूजा करुन पुनः देवाची पूजा करुन गंध, दूर्वा, अक्षता यांनीं युक्त दमनक घेऊन मूलमंत्र पठन करुन, “ देवदेव जगन्नाथ वांछितार्थप्रदायक । ह्रदिस्थान्‍ पूरयेःकामान्‍ मम कामेश्वरीप्रिय ॥ इदं दमनकं देव गृहाण मदनुग्रहात्‍ । इमां सांवत्सरीं पूजां भगवन्परिपूरय ॥ ” याप्रमाणें मंत्र म्हणून पुनः मूलमंत्रानें देवास दवणा अर्पण करावा. नंतर अंगदेवतांस त्यांच्या नाममंत्रानें दवणा अर्पण करुन प्रार्थना करावी. प्रार्थनेचे मंत्र - “ मणिविद्रुममालाभिर्मदारकुसुमादिभिः ॥ इयं सांवत्सरी पूजा तवास्तु गरुडध्वज ॥ वनमालां यथाविष्णो कौस्तुभं सततं ह्रदि ॥ तद्वद्दामनकीं मालां पूजां च ह्र्दये वह ॥ जानताजानता वापि न कृतं यत्तवार्चनम्‍ ॥ तत्सर्वं पूर्णतां यातु त्वत्प्रसादाद्रमापते ॥ जितं ते पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावन ॥ नमस्तेऽस्तु ह्र्षीकेश महापुरुषपूर्वज ॥ मंत्रहीनं क्रियाहीनं० ” या मंत्रांनीं प्रार्थना करुन पुनः पंचोपचारांनीं पूजा करुन आरती करुन पारणा करावी.

दीक्षारहितानांतुनाम्नैवसमर्पणं अत्रचद्वादशीमतंत्रीकृत्यपारणाहोग्राह्यं पारणाहेनलभ्येतद्वादशीघटिकापिचेत्‍ तदात्रयोदशीग्राह्यापवित्रदमनार्पण इतितत्रैवोक्तेः गौणोपिकाल उक्तस्तत्रैव हरौनदमनारोपः स्यान्मधौविघ्नतोयदि वैशाखेश्रावणेवापितत्तिथौस्यात्तदर्पणम् श्रावणावधिशुक्रास्तेकर्तव्यमितिनारदः इति पाठांतरं इदंचमलमासेनकार्यं उपाकर्मोत्सर्जनंचपवित्रदमनार्पणमितिकालादर्शेमलमासवर्ज्येषुपरिगणनात् उपाकर्मचहव्यंचकव्यंपर्वोत्सवंतथा उत्तरेनियतंकुर्यात्पूर्वेतन्निष्फलंभवेदितिमाधवीये प्रजापतिवचनाच्च शुक्रास्तादौतुकार्यमेव पूर्वोक्तवचनात्‍ उपाकर्मोत्सर्जनंचपवित्रदमनार्पणम् ईशानस्यबलिंविष्णोः शयनंपरिवर्तनम् कुर्याच्छुक्रस्यचगुरोर्मौढ्येऽपीतिविनिश्चय इतिज्योतिर्निबंधेवृद्धगार्ग्यवचनाच्च इतिदमनारोपः ।

मंत्रदीक्षा ज्यांला नसेल त्यांनीं नाममंत्रानेंच दवणा समर्पण करावा. येथें द्वादशी मुख्य न धरतां एकादशीव्रताचा पारणादिवस घ्यावा; कारण, ‘‘ पारणादिवशीं एक घटिकाही द्वादशी नसेल तर पवित्रारोपण व दमनार्पण यांविषयीं त्रयोदशी घ्यावी. ” असें रामार्चनचंद्रिकेंतच सांगितलें आहे. दमनारोपणाविषयीं गौणकालही तेथेंच सांगितला आहे, तो असा “ चैत्रमासीं कांहीं विघ्नानें हरीचें दमनारोपण न झालें तर वैशाख, श्रावण यांतहीं त्या तिथीस ( द्वादशीस ) करावें ” , “ वैशाखे श्रावणे० ’ ह्या अर्धाच्या स्थानीं ‘ श्रावणावधिशुक्रास्ते कर्तव्यमिति नारदः ’ असा दुसरा पाठ आहे. अर्थ - श्रावणापर्यंत शुक्रास्त असलें तरी दमनारोपण करावें, असें नारद सांगतो. हें मलमासांत करुं नये; कारण, ‘ उपाकर्म, उत्सर्जन, पवित्रारोपण व दमनारोपण हीं मलमासांत वर्ज्य होत ” असें कालादर्शांत मलमासवर्ज्यांमध्यें सांगितलें आहे. आणि “ उपाकर्म, हव्य, कव्य, पर्वोत्सव हीं कर्मैं पुढील ( शुद्ध ) मासीं निश्चयें करावीं, पूर्वमासीं ( अधिकमासीं ) केलीं तर निष्फल होतात. ” असें माधवीयांत प्रजापतिवचन आहे. शुक्राचें अस्तादिक असलें तथापि करावेंच; कारण, ‘ श्रावणावधि० ’ असें वचन उक्त आहे. आणि “ उपाकर्म, उत्सर्जन, पवित्रारोपण, ईशानबलि, विष्णूचें शयन व परिवर्तन हीं शुक्र व गुरु यांचे अस्तादिकांतही निश्चयानें करावीं. ” असें ज्योतिर्निबंधांत वृद्धगार्ग्यवचनही आहे.  

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP