मार्गशीर्षपौर्णमास्यांदत्तात्रेयोत्पत्तिः तदुक्तंस्कांदेसह्याद्रिखंडे मार्गशीर्षेतथामासिदशमेऽह्निसुनिर्मले मृगशीर्षयुतेपौर्णमास्यांज्ञस्यचवासरे जनयामासदेदीप्यमानंपुत्रंसतीशुभम् तंविष्णुमागतंज्ञात्वाअत्रिर्नामाकरोत्स्वयम् दत्तवान् स्वस्यपुत्रत्वाद्दत्तात्रेय इतीश्वर इति इयंप्रदोषव्यापिनीग्राह्येतिवृद्धाः ।
मार्गशीर्षपौर्णिमेचे ठायीं दत्तात्रेयाचा अवतार झाला, तें सांगतो स्कांदांत सह्याद्रिखंडांत - “ गर्भधारणापासून दहाव्या मार्गशीर्षमासांत पौर्णिमेस मृगशीर्षनक्षत्रानें युक्त पुण्यकारक दिवशीं बुधवारीं देदीप्यमान अशा कल्याणकारक पुत्रास अत्रिऋषीची पत्नी अनुसूया प्रसवती झाली. अत्रिऋषीनें तो प्रत्यक्ष विष्णू जन्माला आला आहे, असें जाणून त्याचें नामकरण केलें, तें असें - ईश्वर स्वतः आपणातें देता झाला म्हणून तो दत्त; आणि स्वय ( अत्रीचा ) पुत्र असल्यामुळें आत्रेय मिळून दत्तात्रेय होय. ही पौर्णिमा प्रदोषव्यापिनी घ्यावी, असें वृद्ध सांगतात.