कार्तिकशुक्लप्रतिपदिगोक्रीडनमुक्तंनिर्णयामृते अस्यामेवरात्रौबलेः पूजोक्ताहेमाद्रौभविष्ये कृत्वैतत्सर्वमेवेहरात्रौदैत्यपतेर्बलेः पूजांकुर्यान्नृपः साक्षाद्भूमौमंडलकेशुभे बलिमालिख्यदैत्येंद्रंवर्णकैः पंचरंगकैः गृहस्यमध्येशालायांविशालायांततोऽर्चयेत् लोकैश्चापिगृहस्यांतः शय्यायांशुक्लतंदुलैः संस्थाप्यबलिराजानंफलैः पुष्पैश्चपूजयेत् मंत्रस्तुपाद्मे बलिराजनमस्तुभ्यंदैत्यदानववंदित इंद्रशत्रोऽमरारातेविष्णुसान्निध्यदोभवेति तथा बलिमुद्दिश्यदीयंतेदानानिकुरुनंदन यानितान्यक्षयाण्याहुर्मयैवंसंप्रदर्शितमिति तदेतत्पूर्वविद्धप्रतिपदिकर्तव्यम् पूर्वविद्धाप्रकर्तव्याशिवरात्रिर्बलेर्दिनमितिहेमाद्रौपाद्मोक्तेः माधवोपि बल्युत्सवंचपूर्वेद्युरुपवासवदाचरेदिति निर्णयामृतेपि याकुहूः प्रतिपन्मिश्रातत्रगाः पूजयेन्नृप पूजनात्र्त्रीणिवर्धंतेप्रजागावोमहीपतिरिति तथा भद्रायांगोकुलक्रीडासदेशोवैविनश्यति भद्रायांद्वितीयायाम् तथा प्रतिपद्यग्निकरणंद्वितीयायांतुगोर्चनम् छत्रच्छेदंकरिष्येतेवित्तनाशंकुलक्षयमिति तथा प्रतिपद्दर्शसंयोगेक्रीडनंतुगवांमतम् परविद्धेषुयः कुर्यात्पुत्रदारधनक्षय इतिदेवलवचनाच्च एतेचविधिप्रतिषेधाः पूर्वदिनेप्रतिपदः सायाह्नव्यापित्वेद्वितीयदिनेचंद्रदर्शनसंभवेचज्ञेयाः गवांक्रीडादिनेयत्ररात्रौदृश्येतचंद्रमाः सोमोराजापशून् हंतिसुरभेः पूजकांस्तथेति पुराणसमुच्चयात् दिनद्वयेसायाह्नव्यापित्वेतुपरैवग्राह्या वर्धमानतिथौनंदायदासार्धत्रियामिका द्वितीयावृद्धिगामित्वादुत्तरातत्रचोच्यत इति तथा त्रियामगादर्शतिथिर्भवेच्चेत्सार्धत्रियामाप्रतिपद्विवृद्धौ दीपोत्सवेतेमुनिभिः प्रदिष्टेअतोन्यथापूर्वयुतेविधेय इतिपुराणसमुच्चयादितिनिर्णयामृतकारः सार्धत्रियामिकेत्यनेनचंद्रदर्शनाभाव उक्तः द्वितीयायाः पंचधाविभक्तदिनचतुर्थांशरुपापराह्णव्याप्तावेवचंद्रदर्शनसंभवात् वयंत्वेतद्वचनद्वयंपूर्वविद्धासंभवेवेदितव्यमितिब्रूमः दिनद्वयेप्रतिपदः सायाह्नव्याप्त्यभावेतुपूर्वैव रात्रौबलिपूजाविधानेनकर्मकालव्यापित्वात् परदिनेचंद्रोदयेतन्निषेधादितिदिक् ।
कार्तिक शुक्ल प्रतिपदेस गोक्रीडन निर्णयामृतांत सांगितलें आहे . ह्याच प्रतिपदेस रात्रौ बलिपूजा सांगतो हेमाद्रींत भविष्यांत - " ह्या प्रतिपदेस हें पूर्वोक्त सारें कृत्य करुन रात्रीचे ठायीं दैत्यांचा पति जो बलिराजा त्याची पूजा , भूमीचे ठायीं मंडलावर स्वतां राजानें करावी . गृहामध्यें मोठ्या विस्तृत शालेचे ठायीं पांच रंगांच्या वर्णांनीं दैत्यांचा राजा बलि काढून पूजा करावी . लोकांनींही गृहामध्यें शय्येचे ठायीं श्वेत तंदुलांनीं बलिराजाला स्थापून फलपुष्पांनीं पूजन करावें . " पूजेचा मंत्र पद्मपुराणांतः - " बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववंदित ॥ इंद्रशत्रोऽमराराते विष्णुसान्नि ध्यदो भव " तसेंच " बलीच्या उद्देशानें जीं दानें देतात तीं अक्षय होतात असें सांगतात . कृष्ण म्हणतात धर्मा ! हें मी तुला दाखविलें आहे . " हें कृत्य पूर्वविद्ध ( अमावास्याविद्ध ) प्रतिपदेचे ठायीं करावें . कारण , " शिवरात्रि व बलिप्रति पदा ही पूर्वविद्धा करावी . " असें हेमाद्रींत पाद्मवचन आहे . माधवही " बलीचा उत्सव उपवासासारखा पूर्व दिवशीं करावा . " निर्णयामृतांतही " अमावास्यायुक्त प्रतिपदेचे ठायीं गाईचें पूजन करावें . त्या पूजनानें प्रजा , गाई , राजा हीं तीन वृद्धिंगत होतात . " तसेंच - " ज्या देशांत द्वितीयेचे ठायीं गोकुलक्रीडा होते , तो देश नष्ट होतो . " तसेंच - " प्रतिपदेचे ठायीं होलिका पेटविणें व द्वितीयेचे ठायीं गोपूजन , हीं झालीं असतां छत्रच्छेद , वित्तनाश व कुलक्षय करतात . " तसेंच - प्रतिपदा व अमावास्या यांच्या योगाचे ठायीं गोक्रीडन मान्य आहे . तें द्वितीयाविद्ध प्रतिपदेचे ठायीं जे करील त्याचा पुत्र , स्त्री , धन यांचा नाश होईल . " असें देवलवचनही आहे . ह्या वरील वचनांनीं अमावास्यायुक्त प्रतिपदेस गोक्रीडनाचा विधि व द्वितीयायुक्त प्रतिपदेस निषेध केला तो पूर्व दिवशीं प्रतिपदा सायाह्नव्यापिनी असून दुसर्या दिवशीं चंद्रदर्शनाचा संभव असतां जाणावा . कारण , " ज्या दिवशीं गोक्रीडा त्या दिवशीं रात्रौ चंद्रदर्शन होईल तर सोमराजा पशूंचा व गोपूजन कर्त्यांचा नाश करितो " असें पुराणसमुच्चयवचन आहे . दोन दिवशीं प्रतिपदेची सायाह्नकालव्याप्ति असेल तर पराच घ्यावी . कारण , " वाढणारी तिथि असतां जेव्हां प्रतिपदा साडेतीन प्रहर असेल तेव्हां द्वितीया वृद्धिगामिनी असल्यामुळें परा सांगितली आहे . " तसेंच - " तिथि वाढल्या असतां तीन प्रहरपर्यंत जर अमावास्या असेल तर दुसर्या दिवशीं प्रतिपदा साडेतीन प्रहर असेल तर त्या तिथि दीपोत्सवाविषयीं मुनींनीं सांगितल्या आहेत . अशा नसतील तर पूर्वयुक्त घ्याव्या " असें पुराणसमुच्चयवचन आहे , असें निर्णयामृतकार सांगतो . ‘ प्रतिपदा साडेतीन प्रहर ’ असें सांगितल्यावरुन चंद्रदर्शनाचा अभाव सांगितला आहे . कारण , दिनमानाचे पांच भाग करुन त्याच्या चवथ्या भागीं अपराह्णीं द्वितीयेची व्याप्ति असतांच चंद्रदर्शनाचा संभव असतो . आम्हीं ( कमलाकरभट्ट ) तर हीं दोन वचनें पूर्वविद्धेचा असंभव असतां जाणावीं असें सांगतों . दोन दिवशीं प्रतिपदेची सायाह्नव्याप्ति नसेल तर पूर्वाच करावी . कारण , रात्रीं बलिपूजा सांगितल्यामुळें पूर्वदिवशीं कर्मकालव्यापिनी आहे . आणि परदिवशीं चंद्रोदय असल्यामुळें गोपूजनाचा वगैरे निषेध आहे . ही दिशा दाखविली आहे .
मदनरत्नेतुपूर्वविद्धायांगोक्रीडा नीराजनमंगलमालिकेतूत्तरत्रकार्ये कार्तिकेशुक्लपक्षेतुविधानद्वितयंभवेत् नारीनीराजनंप्रातः सायंमंगलमालिका यदाचप्रतिपत्स्वल्पानारीनीराजनंभवेत् द्वितीयायांतदाकुर्यात्सायंमंगलमालिकामितिब्राह्मोक्तेः लभ्यतेयदिवाप्रातः प्रतिपद्धटिकाद्वयम् तस्यांनीराजनंकार्यंसायंमंगलमालिकेतिभविष्योक्तेः प्रातर्वायदिलभ्येतप्रतिपद्धटिकाशुभा द्वितीयायांतदाकुर्यात्सायंमंगलमालिकाम् कार्तिकेशुक्लपक्षादौत्वमावास्याघटीद्वयम् देशभंगभयान्नैवकुर्यान्मंगलमालिकामितिदेवीपुराणाच्चेत्युक्तम् ।
मदनरत्नांत तर - पूर्वविद्ध प्रतिपदेचे ठायीं गोक्रीडा आणि नीराजन ( दिवे ओवाळणें ) व मंगलमालिका हीं कृत्यें तर परदिवशीं करावीं . कारण , " कार्तिकशुक्लपक्षांत दोन कृत्यें आहेत तीं अशीं :- प्रातःकालीं स्त्रियांनीं करावयाचा नीराजनविधि व सायंकालीं मंगलमालिका हीं होत . जेव्हां प्रतिपदा स्वल्प असून स्त्रियांचा नीराजनविधि प्रातःकालीं होईल तेव्हां द्वितीयेंत सायंकालीं मंगलमालिका करावी . " असें ब्राह्मवचन आहे . आणि " प्रातःकालीं जर दोन घटिका प्रतिपदा मिळेल तर तिचे ठायीं नीराजनविधि करुन सायंकालीं मंगलमालिका करावी . " असें भविष्यवचन आहे . व " अथवा प्रातःकालीं जर प्रतिपदा एक घटिका चांगली असेल , तर द्वितीयेमध्यें सायंकालीं मंगलमालिका करावी . कार्तिकशुक्लपक्षाच्या प्रतिपदेचे दिवशीं दोन घटिका जर अमावास्या असेल तर देशभंगाच्या भीतीनें त्यादिवशीं मंगलमालिका करुंच नये . " असें देवीपुराणवचनही आहे , असें सांगितलें आहे .