मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
वटसावित्रीव्रत

द्वितीय परिच्छेद - वटसावित्रीव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


ज्येष्ठपौर्णमास्यांसावित्रीव्रतम् तदुक्तंस्कांदभविष्ययोः ज्येष्ठेमासिसितेपक्षेद्वादश्यांरजनीमुखेइत्युपक्रम्य व्रतंत्रिरात्रमुद्दिश्यदिवारात्रिंस्थिराभवेदिति अंतेप्युपसंह्रतम् ज्येष्ठेमासिसितेपक्षेपूर्णिमायांतथाव्रतम् चीर्णंपुरामहाभक्त्याकथितंतेमयानृपेति दाक्षिणात्याश्चैतदेवाद्रियंते एतच्चामावास्यायामप्युक्तंनिर्णयामृतेभविष्ये
अमायांचतथाज्येष्ठेवटमूलेमहासती त्रिरात्रोपोषितानारीविधिनानेनपूजयेत् मदनरत्नेत्विदंवाक्यं पंचदश्यांतथाज्येष्ठे इतिपठित्वाज्येष्ठपौर्णमास्यामुक्तं तथा अशक्तौतुत्रयोदश्यांनक्तंकुर्याज्जितेंद्रिया अयाचितंचतुर्दश्याममायांसमुपोषणमिति तत्तुपाश्चात्याआद्रियंते हेमाद्रिसमयोद्योतादिषुतुभाद्रपदपूर्णिमायामुक्तं तत्तुनेदानींप्रचरति गौडास्तु मेषेवावृषभेवापिसावित्रींतांविनिर्दिशेत् ज्येष्ठकृष्णचतुर्दश्यांसावित्रीमर्चयंतियाः वटमूलेसोपवासानतावैधव्यमाप्नुयु रितिपराशरोक्तेश्चतुर्दश्यांप्रदोषेव्रतं दिनद्वयेतव्द्याप्तौपरैवेत्याहुः तन्निर्मूलं ।


ज्येष्ठमासीं पौर्णिमेस वटसावित्रीव्रत, तें सांगतो - स्कांदांत भविष्यांत - “ ज्येष्ठमासीं शुक्लपक्षीं द्वादशीस प्रदोषकालीं ” असा उपक्रम करुन “ त्रिरात्रव्रताचा उद्देश करुन रात्रदिवस स्थिर व्हावें. ” असें सांगून अंतीं उपसंहार ( पूर्वोक्त विषयाचें या व्रताविषयीं पर्यवसान ) केला, तो असा - ‘ ज्येष्ठमासीं शुक्लपक्षीं पौर्णिमेस तसें व्रत पूर्वी महाभक्तीनें आचरण केलेलें असें हे राजा ! तुला मीं सांगितलें. ” दक्षिणदेशीय लोक हेंच ( या पौर्णिमेचे ठायींच ) व्रत करितात. हेंच व्रत अमावास्येसही सांगितलें आहे - निर्णयामृतांत भविष्यांत - “ ज्येष्ठमासीं अमावास्येस महासती स्त्रीनें त्रिरात्र उपोषण करुन यथाविधि वटमूलीं पूजा करावी. ” मदनरत्नांत तर हें वाक्य ‘ पंचदश्यां तथा ज्येष्ठे ’ असें पठन करुन हें व्रत ज्येष्ठपौर्णिमेस करण्याविषयीं सांगितलें आहे. तसेंच - “ त्रिरात्रउपोषणाविषयीं अशक्त असेल तर त्रयोदशीस नक्त करुन जितेंद्रिय होऊन चतुर्दशीस अयाचित व अमावास्येस उपोषण करुन व्रत करावें ” तें अमावास्येस व्रत पाश्चात्य ( पश्चिमेकडचे लोक ) करितात. हेमाद्री, समयोद्योत इत्यादि ग्रंथांत तर भाद्रपद पौर्णिमेस हें व्रत सांगितलें आहे तें तर सांप्रत काळीं प्रचारांत नाहीं. गौडग्रंथ तर “ मेष किंवा वृषभ या संक्रांतींत ती सावित्री समजावी, ज्येष्ठकृष्णचतुर्दशीस ज्या स्त्रिया उपोषण करुन वटमूलीं सावित्रीचें पूजन करितात, त्यांस वैधव्य प्राप्त होत नाहीं. ’’ ह्या पराशरवचनावरुन चतुर्दशीस प्रदोषीं व्रत करावें. ती चतुर्दशी दोन दिवशीं प्रदोषकाळीं असतां परदिवशींच व्रत करावें असें म्हणतात, तें निर्मूल होय.

अत्रपूर्णिमामावास्येपूर्वविद्धेग्राह्ये भूतविद्धानकर्तव्याअमावास्याचपूर्णिमा वर्जयित्वानरश्रेष्ठसावित्रीव्रतमुत्तममितिब्रह्मवैवर्तात्‍ स्कांदेपि भूतविद्धासिनीवालीनतुतत्रव्रतंचरेत् वर्जयित्वातुसावित्रीव्रतं तुशिखिवाहन इति मदनरत्नेब्रह्मवैवर्तेपि प्रतिपत्पंचमीभूतसावित्रीवटपूर्णिमा नवमीदशमीचैवनोपोष्याः परसंयुताइति यदात्वष्टादशघटिकाचतुर्दशीतदापराग्राह्या पूर्वविद्धैवसावित्रीव्रतेपंचदशीतिथिः नाड्योष्टादशभूतस्यस्युश्चेत्तच्चपरेऽहनीतिमाधवः वस्तुतस्तु भूतोऽष्टादशनाडीभिर्दूषयत्युत्तरांतिथिमित्यस्यव्रतांतरेसावकाशत्वाद्विशेषप्रवृत्तपूर्वविद्धाविधायकवचनेनतस्यबाधादष्टादशनाडीवेधेपिपूर्वैवेत्ययंपंथाः साधुः अत्रपूर्णिमानुरोधेनैवयथात्रिरात्रसंपत्तिर्भवतितथात्रयोदश्यादिग्राह्यं तस्याः प्रधानत्वात्‍ अयंनिर्णयोऽमायामपिज्ञेयः पारणंतुपूर्णिमांतेकार्यम् अत्रस्त्रीव्रतेषुविशेषाः परिभाषायामुक्ताः ।

ह्या व्रताविषयीं पौर्णिमा व अमावास्या पूर्वविद्धा ( चतुर्दशीयुक्त ) घ्यावी; कारण, “ अमावास्या व पौर्णिमा चतुर्दशीविद्धा घेऊं नये, हें सावित्रीव्रत वर्ज्य करुन समजावें, अर्थात्‍ सावित्रीव्रताविषयीं चतुर्दशीविद्धा घ्यावी ” असें ब्रह्मवैवर्तांत वचन आहे. स्कंदपुराणांतही - “ चतुर्दशीविद्ध अमावास्येस व्रत करुं नये, परंतु हें सावित्रीव्रतावांचून समजावें. ” मदनरत्नांत ब्रह्मवैवर्तांतही - “ प्रतिपदा, पंचमी, चतुर्दशी, सावित्री, वटपूर्णिमा, नवमी, दशमी, ह्या तिथि उपोषणाविषयीं परयुक्त घेऊं नयेत. ” ज्या वेळीं अठरा घटिका चतुर्दशी असेल तेव्हां परा घ्यावी. कारण, “ सावित्रीव्रताविषयीं पौर्णिमा पूर्वविद्धाच घ्यावी. जर चतुर्दशी १८ घटिका असेल तर दुसर्‍या दिवशीं करावी. ” असे माधव सांगतो. वास्तविक म्हटलें तर “ चतुर्दशी १८ घटिकांनीं उत्तरतिथीस दूषित करते ” असें जें वचन तें अन्यव्रतीं चरितार्थ असल्यामुळें विशेषेंकरुन प्रवृत्त झालेल्या ‘ पूर्वविद्धा घ्यावी ’ या वचनानें ‘ भूतोष्टादश ’ या वचनाचा बाध होत असल्यानें अठरा घटिका वेध असला तरी पूर्वाच घ्यावी, हाच मार्ग उत्तम होय. येथें पूर्णिमेच्या अनुरोधानेंच जसें त्रिरात्र व्रत होईल तशा त्रयोदश्यादि तिथि घ्याव्या. कारण, पौर्णिमा मुख्य आहे. हाच निर्णय अमावास्येविषयींही जाणावा. पारणा तर पौर्णिमांतीं करावी. येथें स्त्रियांच्या व्रताविषयीं विशेष निर्णय ( म्हणजे स्त्रीला रजस्वला इत्यादि दोष प्राप्त होईल तर पूजादिक ब्राह्मणाकडून करवावीं; उपोषण इत्यादिक स्वतां करावें असे स्त्रीव्रताचे विशेष निर्णय ) व्रतपरिभाषेंत ( प्रथमपरिच्छेदांत ) सांगितले आहेत ते जाणावे.

अत्रविशेषोभविष्ये गृहीत्वावालुकांपात्रेप्रस्थमात्रांयुधिष्ठिर ततोवंशमयेपात्रेवस्त्रयुग्मेनवेष्टिते सावित्रीप्रतिमांकुर्यात्सौवर्णींवापिमृन्मयीम्‍ सार्धंसत्यवतासाध्वींफलनैवेद्यदीपकैः रजन्याकंठसूत्रैश्चशुभैः कुंकुमकेशरैः पूजयेदितिशेषः रजनीहरिद्रा कंठसूत्रंसौभाग्यतंतुः सावित्र्याख्यानकंवापिवाचयीतद्विजोत्तमेः रात्रौजागरणंकृत्वाप्रभातेविमलेततः तामपिब्राह्मणेदत्वाप्रणिपत्यक्षमापयेत् मंत्रस्तु सावित्रीयंमयादत्तासहिरण्यामहासती ब्रह्मणः प्रीणनार्थायब्राह्मणप्रतिगृह्यताम् व्रतेनानेनराजेंद्रवैधव्यंनाप्नुयात्क्कचिदिति ।

या व्रताचे ठायीं विशेष विधि भविष्यपुराणांत सांगतो, तो असा - “ प्रस्थ ( शेर ) प्रमाण वाळू पात्रांत घेऊन नंतर दोन वस्त्रांनीं वेष्टित अशा वेळूच्या परडींत सुवर्णाची किंवा मृत्तिकेची सावित्रीची प्रतिमा करुन सत्यवानासहवर्तमान सावित्रीची पूजा फल, नैवेद्य, दीप, हळद, कंठसूत्र, कुंकुम, केशर, यांहींकरुन करावी. नंतर सावित्रीव्रतकथा ब्राह्मणाकडून वाचवावी. व रात्रीस जागरण करुन प्रातःकाळीं ती प्रतिमाही ब्राह्मणास देऊन नमस्कार करुन क्षमा मागावी. ” दानाचा मंत्र - “ सावित्रीयं मया दत्ता सहिरण्या महासती ॥ ब्रह्मणः प्रीणनार्थाय ब्राह्मण प्रतिगृह्यंता ” ॥ “ हें व्रत केलें असतां वैधव्य कधींही प्राप्त होणार नाहीं. ”

ज्येष्ठपौर्णमास्यांविशेष आदित्यपुराणे ज्येष्ठेमासितिलान्दद्यात्पौर्णमास्यांविशेषतः अश्वमेधस्ययत्पुण्यं तत्प्राप्नोतिनसंशयः विष्णुरपि ज्येष्ठीज्येष्ठायुताचेत्स्यात्तस्यांछत्रोपानत्प्रदानेननरोनराधिपत्यमाप्नोतीति हेमाद्रौज्योतिषे ऐंद्रेगुरुः शशीचैवप्राजापत्येरविस्तथा पूर्णिमाज्येष्ठमासस्यमहाज्येष्ठीप्रकीर्तितेति इयं मन्वादिरपि सापौर्वाह्णिकीग्राह्या विशेषस्तुचैत्रेउक्तः तथाऽपरार्केवामनपुराणे उदकुंभांबुदानंचतालवृंतं सचंदनम् त्रिविक्रमस्यप्रीत्यर्थंदातव्यंज्येष्ठमासित्विति इतिकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौज्येष्ठमासः समाप्तः ।

ज्येष्ठपौर्णमासीस विशेष सांगतो आदित्यपुराणांत - “ ज्येष्ठमासीं पौर्णिमेस विशेषेंकरुन तिळ द्यावे, तेणेंकरुन अश्वमेधाचें पुण्य प्राप्त होतें, यांत संशय नाहीं. ” विष्णुही “ ज्येष्ठी पौर्णिमा ज्येष्ठा नक्षत्रानें युक्त असतां तिचे ठायीं छत्र व उपानत्‍ ( चर्मींजोडा ) यांचें दान करावें, तेणेंकरुन पुरुषास राज्य मिळतें. ” हेमाद्रींत ज्योतिषांत - “ ज्येष्ठानक्षत्रीं गुरुं व चंद्र, रोहिणीस सूर्य अशी ज्येष्ठी पौर्णिमा असेल तर तिला महाज्येष्ठी म्हणतात. ” ही पौर्णिमा मन्वादिकही आहे, ती पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी. तिचा विशेष निर्णय चैत्रमासांत सांगितला आहे. तसेंच अपरार्कांत वामनपुराणांत - “ ज्येष्ठमासीं उदकुंभ, उदक, तालवृंत ( ताडाचा पंखा ), चंदन हीं त्रिविक्रमप्रीत्यर्थं द्यावीं. ” इति श्रीज्येष्ठमासाची महाराष्ट्र टीका समाप्त झाली.

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP