वृश्चिकेपूर्वाः षोडशघटिकाः पुण्याः शेषंप्राग्वत् मार्गशीर्षकृष्णाष्टमीकालाष्टमी साचरात्रिव्यापिनीग्राह्या मार्गशीर्षासिताष्टम्यांकालभैरवसन्निधौ उपोष्यजागरंकुर्वन्सर्वपापैः प्रमुच्यते इतिकाशीखंडात् रात्रिव्रतत्वावगतेः रुद्रव्रतेषुसर्वेषुकर्तव्यासंमुखीतिथिरितिब्रह्मवैवर्ताच्च दिनद्वयेंऽशतोरात्रिव्याप्तावुत्तरैव भैरवोत्पत्तेः प्रदोषकालीनत्वादितिकेचित् तन्न शिवरहस्येमध्याह्नेभैरवोत्पत्तेः श्रवणात् तथाचतत्रैव नित्ययात्रादिकंकृत्वामध्याह्नेसंस्थितेरवावित्युपक्रम्यब्रह्मणारुद्रेवज्ञातेउक्तम् तदोग्ररुपादनवद्यान्मत्तः श्रीकालभैरवः आविरासीत्तदालोकान्भीषयन्नखिलानपीति अत्रोपवासएवप्रधानमित्युक्तंतत्रैव उपोषणस्यांगभूतमर्घ्यदानमिहस्मृतम् तथाजागरणंरात्रौपूजायामचतुष्टये संध्यायामपिपूजैवोक्ता तेनमध्याह्नव्यापिनीयुक्ता दिनद्वयेंऽशतः संपूर्णायांवातव्द्याप्तौपूर्वैव पूर्वोक्तवचनात् पारणातुप्रातरेव यामत्रयोर्ध्वगामिन्यांप्रातरेवहिपारणेतिवचनात् अत्रचकालभैरवपूजोक्तात्रिस्थलीसेतौ कृत्वाचविविधांपूजांमहासंभारविस्तरैः नरोमार्गासिताष्टम्यांवार्षिकंविघ्नमुत्सृजेत् तथा तीर्थेकालोदकेस्नात्वाकृत्वातर्पणमत्वरः विलोक्यकालराजानंनिरयादुद्धरेत्पितृनिति इयंचकार्तिक्यनंतरागौणचांद्राभिप्रायेण ।
वृश्चिकसंक्रांतीच्या पहिल्या सोळा घटिका पुण्यकाल होय. इतर निर्णय पूर्वीसारखा जाणावा. मार्गशीर्षकृष्ण अष्टमी ही कालाष्टमी होय. ती रात्रिव्यापिनी घ्यावी. कारण, “ मार्गशीर्षकृष्ण अष्टमीचे ठायीं कालभैरवाच्या संनिध उपोषण करुन जागरण करणारा मनुष्य सर्वपापांपासून मुक्त होतो. ” ह्या काशीखंडस्थ वचनावरुन हें कालाष्टमीव्रत रात्रिव्रत असें बोधित होतें. आणि “ सार्या रुद्रव्रतांचे ठायीं संमुखी ( पुढें येणारी ) तिथि करावी. ” असें ब्रह्मवैवर्तवचनही आहे. दोन दिवशीं अंशानें रात्रिव्याप्ति असतां पराच करावी. कारण, भैरवाची उत्पत्ति प्रदोषकालीं आहे, असें केचित् सांगतात. तें बरोबर नाहीं. कारण, शिवरहस्यांत मध्याह्नीं भैरवाची उत्पत्ति श्रुत आहे. तसेंच तेथेंच सांगतो - “ नित्ययात्रादिक करुन मध्याह्नीं सूर्य आला असतां ” असा उपक्रम करुन ब्रह्मदेवानें रुद्राचा अपमान केला असतां सांगतो. - “ त्या काळीं उग्रस्वरुप धरणारा व दोषरहित अशा मजपासून श्रीकालभैरव सर्वलोकांस भय करणारा प्रगट झाला. ” ह्या कालाष्टमीव्रताचे ठायीं उपवासच प्रधान असें तेथेंच सांगितलें आहे - “ उपोषणाचें अंगभूत अर्घ्यदान येथें सांगितलें आहे. तसेंच रात्रीं जागरण व चार प्रहरांचे ठायीं पूजा सांगितली आहे. ” संध्यासमयींही पूजाच सांगितली आहे. यावरुन ( कालभैरवाची मध्याह्नीं उत्पत्ति असल्यावरुन ) मध्याह्नव्यापिनी अष्टमी घ्यावी, हें युक्त होय. दोन दिवशीं अंशानें किंवा संपूर्ण. मध्याह्नव्यापिनी असतां पूर्वाच घ्यावी. कारण, त्याविषयीं पूर्वीं सांगितलेलें ब्रह्मवैवर्तवचन आहे. पारणा तर प्रातःकालींच करावी. कारण, “ तीन प्रहर होऊन गेलेल्या तिथींत प्रातःकालींच पारणा करावी ” असें वचन आहे. या अष्टमीचे ठायीं कालभैरवाची पूजा सांगतो - त्रिस्थलीसेतूंत - “ मार्गशीर्षकृष्ण अष्टमीचे ठायीं मोठ्या सामग्रीच्या विस्तारांनीं अनेकप्रकारची कालभैरवाची पूजा मनुष्यानें केली असतां त्याचें वर्षांत उत्पन्न होणारें विघ्न दूर होतें. ” तसेंच - “ कालोदकतीर्थांत स्नान करुन तर्पण करुन कालभैरवाचें दर्शन घेईल तो तत्काल पितरांचा नरकापासून उद्धार करील. ” ही अष्टमी कार्तिकी पौर्णिमेच्या पुढची जाणावी. गौण ( पौर्णिमांत ) चांद्रमासानें मार्गशीर्षकृष्ण अष्टमी असें सांगितलें आहे.