मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
कुमारींची पूजा

द्वितीय परिच्छेद - कुमारींची पूजा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथपूजाविधिः साचजंयतीमंत्रेणनवाक्षरेणवाकार्या तदुक्तंदुर्गाभक्तितरंगिण्यांदेवीपुराणे कुर्याद्देव्यास्तुमंत्रेणपूजांक्षीरघृतादिभिरित्युक्त्वा जयंतीमंगलाकालीभद्रकालीकपालिनी दुर्गाक्षमाशिवाधात्रीस्वधास्वाहानमोस्तुते अनेनैवतुमंत्रेणजपहोमौतुकारयेदिति ॐ दुर्गेदुर्गेरक्षिणिस्वाहेतिनवाक्षरः तत्रप्रतिपदिप्रातरभ्यंगंकृत्वादेशकालौसंकीर्त्य ममेहजन्मनिदुर्गाप्रीतिद्वारासर्वापच्छांतिपूर्वकदीर्घायुर्विपुलधनपुत्रपौत्राद्यनवच्छिन्नसंततिवृद्धिस्थिरलक्ष्मीकीर्तिलाभशत्रुपराजयसदभीष्टसिद्ध्यर्थंशारदनवरात्रप्रतिपदिविहितकलशस्थापनदुर्गापूजाकुमारीपूजादिकरिष्येइतिसंकल्प्य महीद्यौरितिभूमिंस्पृष्ट्वा ओषधयः समितियवान्निक्षिप्य आकलशेष्वितिकुंभंसंस्थाप्य इमंमेगंगेइतिजलेनापूर्य गंधद्वारामितिगंधं याओषधीरितिसर्वौषधीः कांडात्कांडादितिदूर्वाः अश्वत्थेव इतिपंचपल्लवान् ‍ स्योनापृथिवीतिसप्तमृदः याः फलिनीरितिफलम् ‍ सहिरत्नानीतिपंचरत्नानि हिरण्यंचक्षिप्त्वायुवासुवासाइतिवस्त्रेणावेष्ट्यपूर्णादर्वीतिपूर्णपात्रंनिधायतत्रवरुणंसंपूज्यजीर्णायांनूतनायांवाप्रतिमायांदुर्गामावाह्यपूजयेत् ‍ तद्यथा पूर्वोक्तंमंत्रमुक्त्वा आगच्छवरदेदेविदैत्यदर्पनिषूदनि पूजांगृहाणसुमुखिनमस्तेशंकरप्रिये सर्वतीर्थमयंवारिसर्वदेवसमन्वितं इमंघटंसमागच्छतिष्ठदेवगणैः सह दुर्गेदेविसमागच्छसान्निध्यमिहकल्पय बलिंपूजांगृहाणत्वमष्टाभिः शक्तिभिः सहेत्यावाह्यपूर्वोक्तमंत्रेणषोडशोपचारैः पूजयित्वा माषभक्तबलिंकूष्मांडादिबलिंवानिवेदयेत् ‍ ।

आतां पूजाविधि सांगतो - ती पूजा जयंतीमंत्रानें किंवा नवाक्षरानें करावी . तो प्रकार दुर्गाभक्तितरंगिणींत - देवीपुराणांत सांगतो - " देवीची पूजा देवीच्या मंत्रानें क्षीरघृतादिक उपचारांनीं करावी . " असें सांगून , मंत्र सांगतो - " जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी ॥ दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तु ते " ॥ याच मंत्रानें जप व होम करावे . " ॐदुर्गेदुर्गेरक्षिणिस्वाहा . " हा नवाक्षरमंत्र . तेथें प्रतिपदेस प्रातःकाळीं अभ्यंगस्नान करुन देशकालांचा उच्चार करुन संकल्प करावा . तो असा - " ममेहजन्मनि दुर्गाप्रीतिद्वारा सर्वापच्छांतिपूर्वकदीर्घायुर्विपुलधनपुत्रपौत्राद्यनवच्छिन्नसंततिवृद्धिस्थिरलक्ष्मीकीर्तिलाभशत्रुपराजयसदभीष्टसिद्ध्यर्थं

शारदनवरात्रप्रतिपदि विहितकलशस्थापनदुर्गापूजाकुमारीपूजादिकरिष्ये " असा संकल्प करुन " महीद्यौ० " या मंत्रानें भूमीला स्पर्श करुन , तीवर " ओषधयः सं० " या मंत्रानें यव पेरुन " आकलशेषु० " या मंत्रानें कुंभ स्थापून " इमंमेगंगे० ’’ ह्या मंत्रानें उदक कलशांत भरावें . ‘ गंधद्वारां० " गंध , " याओषधी० " सर्वौषधी घालून , " कांडात्कांडा० " दूर्वा , " अश्वत्थेव० " पंचपल्लव , " स्योनापृथिवि० " सप्तमृत्तिका , " याःफलिनी० " फल , " सहिरत्नानि० " पंचरत्नें व हिरण्य घालून " युवासुवासा० " यानें वस्त्रानें वेष्टन करुन " पूर्णादर्वि० " यानें पूर्णपात्र ठेऊन तेथें वरुणाची पूजा करावी . त्यावर जीर्ण किंवा नवीन प्रतिमा ठेऊन दुर्गादेवीचें आवाहन करुन पूजन करावें . तें असें - वरील मंत्र उच्चारुन - " आगच्छ वरदे देवि दैत्यदर्पनिषूदनि । पूजां गृहाण सुमुखि नमस्ते शंकरप्रिये । सर्वतीर्थमयं वारि सर्वदेवसमन्वितं । इमं घटं समागच्छ तिष्ठ देवगणैः सह । दुर्गे देवि समागच्छ सान्निध्यमिह कल्पय । बलिं पूजां गृहाण त्वमष्टाभिः शक्तिभिः सह " या मंत्रांनीं आवाहन करुन पूर्वोक्त मंत्रानें षोडशोपचारांनीं पूजा करुन माषभक्तबलि किंवा कूष्मांडादिबलि निवेदन करावा .

ततः कुमारीपूजा तदुक्तंहेमाद्रौस्कांदे एकैकांपूजयेत्कन्यामेकवृद्ध्यातथैवच द्विगुणंत्रिगुणंवापिप्रत्येकं नवकंतुवा तथा नवभिर्लभतेभूमिमैश्वर्यंद्विगुणेनतु एकवृद्ध्यालभेत्क्षेममेकैकेनश्रियंलभेत् ‍ एकवर्षातुयाकन्यापूजार्थेतांविवर्जयेत् ‍ गंधपुष्पफलादीनांप्रीतिस्तस्यानविद्यते तेनद्विवर्षामारभ्यदशवर्षापर्यंताएवपूज्याः नत्वन्याः तासांचक्रमेण कुमारिकात्रिमूर्तिः कल्याणीरोहिणीकालीचंडिकाशांभवीदुर्गासुभद्रेतिनामभिः पूजाकार्या आसांचप्रत्येकंपूजामंत्राः फलविशेषाश्चतत्रैवज्ञेयाः सामान्यतस्तु मंत्राक्षरमयींलक्ष्मींमातृणांरुपधारिणीम् ‍ नवदुर्गात्मिकांसाक्षात्कन्यामावाहयाम्यहम् ‍ एवमभ्यर्चनंकुर्यात्कुमारीणांप्रयत्नतः कंचुकैश्चैववस्त्रैश्चगंधपुष्पाक्षतादिभिः नानाविधैर्भक्ष्यभोज्यैर्भोजयेत्पायसादिभिः तथा ग्रंथिस्फुटितशीर्ष्णांगींरक्तपूयव्रणांकिताम् ‍ जात्यंधांकेकरांकाणींकुरुपांतनुरोमशाम् ‍ संत्यजेद्रोगिणींकन्यांदासीगर्भसमुद्भवाम् ‍ तथा ब्राह्मणींसर्वकार्येषुजयार्थेनृपवंशजाम् ‍ लाभार्थेवैश्यवंशोत्थांसुतार्थेशूद्रवंशजाम् ‍ दारुणेचांत्यजातानांपूजयेद्विधिनानरइति ।

नंतर कुमारींची पूजा करावी . तो प्रकार सांगतो - हेमाद्रींत - स्कांदांत - " प्रतिदिवशीं एकेक कन्या पुजावी . अथवा एक वृद्धीनें , किंवा दोन अथवा तीन वृद्धीनें किंवा प्रतिदिवशीं नऊ अशा पुजाव्या . " तसेंच " प्रतिदिवशीं नवांनींभूमि प्राप्त होते . दोन वृद्धीनें ऐश्वर्य मिळतें . एक वृद्धीनें कल्याण प्राप्त होतें . प्रतिदिवशीं एकेक पुजली असतां लक्ष्मी प्राप्त होते . एक वर्षाची जी कन्या ती पूजेस वर्ज्य करावी . कारण , तिला गंध , पुष्प , फळ इत्यादिक पदार्थसेवनाची प्रीति नाहीं . " म्हणून दोन वर्षांपासून दहा वर्षांपर्यंतच कन्या पुजाव्या . अन्य पुजूं नयेत . त्या कुमारिकांचीं अनुक्रमानें नांवें - १ द्विवर्षा ती कुमारिका २ त्रिवर्षा ती त्रिमूर्ति ३ चतुर्वर्षा ती कल्याणी ४ पंचवर्षा ती रोहिणी ५ षड्वर्षा ती काली ६ सप्तवर्षा ती चंडिका ७ अष्टवर्षा ती शांभवी ८ नववर्षा ती दुर्गा ९ दशवर्षा ती सुभद्रा या नामांनीं पूजा करावी . या कुमारिकांचे प्रत्येक पूजामंत्र व विशेष फलें हीं हेमाद्रींतच पाहावीं . सामान्यतः मंत्र तर हा - " मंत्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रुपधारिणीम् ‍ । नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्यामावाहयाम्यहम् ‍. " " या मंत्रानें कुमारीचें प्रयत्नानें कंचुक ( चोळ्या ), वस्त्रें , गंध , पुष्प , अक्षता इत्यादिकांनीं पूजन करावें . नानाप्रकारचे भक्ष्य , भोज्य , पायस इत्यादि पदार्थांनीं भोजन घालावें . " तसेंच " जिचें अंग ग्रंथियुक्त किंवा फुटलेलें आहे ती ; मस्तक फुटलेली ; रक्त , पू , व्रण यांतें वाहणारी ; जन्मांध ; केकरा ; काणी ; कुरुपा ; शरीरावर केश अल्प किंवा बहुत असलेली ; रोगिणी ; दासीगर्भोत्पन्ना अशी कन्या पूजेविषयीं वर्ज्य होय . " तसेंच " सर्व कार्यांविषयीं ब्राह्मणी पुजावी . जयाकरितां क्षत्रियवंशांतील पुजावी . लाभाकरितां वैश्यवंशोत्पन्ना पुजावी . पुत्राकरितां शूद्रवंशजा पुजावी . दारुणकर्माविषयीं अंत्यजापासून उत्पन्न अशा कन्येचें पूजन मनुष्यानें विधीनें करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP