अत्रयमतर्पणमुक्तंमदनपारिजातेवृद्धमनुना दीपोत्सवचतुर्दश्यांकार्यंतुयमतर्पणम् मदनरत्नेब्राह्मे अपामार्गस्यपत्राणिभ्रामयेच्छिरसोपरि ततश्चतर्पणंकार्यंधर्मराजस्यनामभिः यमायधर्मराजायमृत्यवेचांतकायच वैवस्वतायकालायसर्वभूतक्षयायच औदुंबरायदध्नायनीलायपरमेष्ठिने वृकोदरायचित्रायचित्रगुप्तायवैनम इति तर्पणप्रकारस्तुहेमाद्रौ एकैकेनतिलैर्मिश्रान् दद्यात्रींस्त्रीन् जलांजलीन् संवत्सरकृतंपापंतत्क्षणादेवनश्यति तथामदनरत्नेस्कांदे दक्षिणाभिमुखोभूत्वातिलैः सव्यंसमाहितः देवतीर्थेनदेवत्वात्तिलैः प्रेताधिपोयतः तथा यज्ञोपवीतिनाकार्यंप्राचीनावीतिनाथवेति इदंजीवत्पितृकेणापिकार्यम् जीवत्पितापिकुर्वीततर्पणंयमभीष्मयोरितिपाद्मोक्तेः अत्रभीष्मतर्पणमप्युक्तंदिवोदासीये तत्प्रकारस्तुमाघेवक्ष्यते इतिनरकचतुर्दशी ।
या चतुर्दशीचे ठायीं यमतर्पण सांगतो मदनपारिजातांत वृद्धमनु - " दीपोत्सवचतुर्दशीचे ठायीं यमतर्पण करावें . " मदनरत्नांत ब्राह्मांत - " आघाड्याचीं पानें मस्तकावर फिरवावीं . नंतर ( स्नानानंतर ) यमाच्या नांवांनीं तर्पण करावें " तें असें - " यमाय नमः यमंतर्पयामि , धर्मराजाय नमः धर्मराजत० , मृत्यवेनमः मृत्युंत० , अंतकाय नमः अंतकंत० , वैवस्वताय तमः वैवस्वतंत० , कालाय नमः कालंत० , सर्वभूतक्षयाय नमः सर्वभूतक्षयंत० , औदुंबराय नमः औदुंबरंत० , दध्नाय नमः दध्नंत० , नीलाय नमः नीलंत० , परमेष्ठिने नमः परमेष्ठिनंत० , वृकोदराय नमः वृकोदरंत० , चित्राय नमः चित्रंत० , चित्रगुप्ताय नमः चित्रगुप्तंत० , याप्रमाणें तर्पण करावें . " तर्पणाचा प्रकार हेमाद्रींत सांगतो - " एकेक नाम घेऊन तिलांनीं मिश्र अशा तीन तीन जलांजली द्याव्या , म्हणजे वर्षपर्यंत केलेलें पाप त्याच क्षणीं नाश पावतें . " तसेंच मदनरत्नांत स्कांदांत - " दक्षिणाभिमुख होऊन सव्य करुन तिलसहिततर्पण करावें . यम हा देव असल्यामुळें देवतीर्थानें करावें . आणि तो प्रेताधिप असल्यामुळें तिलसहित करावें . " तसेंच " सव्यानें किंवा अपसव्यानें करावें . " हें यमतर्पण जीवत्पितृकानेंही करावें . कारण , " पिता जीवंत असतांही यम व भीष्म यांचें तर्पण करावें " असें पाद्मवचन आहे . या चतुर्दशीस भीष्मतर्पणही दिवोदासीयांत सांगितलें आहे . त्या भीष्मतर्पणाचा प्रकार माघमासप्रकरणीं पुढें सांगूं . इति नरकचतुर्दशी .
कार्तिकामावास्यायांप्रातरभ्यंगंकुर्यात् तदुक्तंकालादर्शे प्रत्यूष आश्वयुग्दर्शेकृताभ्यंगादिमंगलः भक्त्याप्रपूजयेद्देवीमलक्ष्मीविनिवृत्तये अस्यव्याख्यानेआदिशब्दात्पंचत्वगुदकस्नानादेरुपसंग्रहः तदुक्तंपुष्करपुराणे स्वातीस्थितेरवाविंदुर्यदिस्वातीगतोभवेत् पंचत्वगुदकस्नायीकृताभ्यंगविधिर्नरः नीराजितोमहालक्ष्मीमर्चयन्श्रियमश्नुते आश्वयुग्दर्श इतिदर्शशब्दः प्रत्यूषेस्वातियुक्ततिथिपरः तदुक्तंब्राह्मे ऊर्जेशुक्लद्वितीयांततिथिषुस्वातिऋक्षगे मानवोमंगलस्नायीनैवलक्ष्म्यावियुज्यते तत्रैव इषेभूतेचदर्शेचकार्तिकप्रथमेदिने यदास्वातीतदाभ्यंगस्नानंकुर्याद्दिनोदये कश्यपसंहितायांतुदीपावलिदर्शंप्रक्रम्य इंदुक्षयेपिसंक्रांतौरवौपातेदिनक्षये तत्राभ्यंगोनदोषायप्रातः पापापनुत्तय इतिस्वातियोगंविनाप्यभ्यंग उक्तः मात्स्ये दीपैर्नीराजनादत्रसैपादीपावलीस्मृता ।
कार्तिक अमावास्येस प्रातःकाळीं अभ्यंग करावा . तें सांगतो कालादर्शांत " आश्विनमासाचे अमावास्येचे ठायीं प्रातःकालीं अभ्यंगादि मंगल करुन अलक्ष्मी जाण्याकरतां भक्तीनें लक्ष्मीदेवीचें पूजन करावें . " या वचनाची व्याख्या करतेवेळीं ‘ अभ्यंगादि ’ यांतील आदिशब्दानें पंचवल्कलसहित उदकस्नानादिकांचा संग्रह करावा . तें पंचवल्कलसहित उदकस्नान पुष्करपुराणांत सांगतो - " स्वातीनक्षत्रीं सूर्य असतां जेव्हां चंद्र स्वातीनक्षत्रास असेल त्या दिवशीं अभ्यंगविधि करुन पंचत्वक् ( अश्वत्थ , उदुंबर , प्लक्ष , आम्र , वट यांच्या त्वचांनीं युक्त ) उदकानें स्नान करणारा व स्त्रियांनीं नीराजित होऊन महालक्ष्मीचें पूजन करणारा मनुष्य लक्ष्मीतें पावतो . " ‘ आश्वयुग्दर्शे ’ ह्या वचनांत जो दर्शशब्द तो प्रातःकालीं स्वाती नक्षत्रानें युक्त तिथीचा बोधक आहे . तेंच सांगतो - ब्राह्मांत " कार्तिकशुक्लद्वितीयापर्यंत तिथींमध्यें ज्या तिथीस स्वातीनक्षत्र असेल त्या तिथीचे ठायीं स्वातीनक्षत्रावर मंगलस्नान करणारा लक्ष्मीविरहित होतच नाहीं . " तेथेंच - " आश्विनमासाची चतुर्दशी व अमावास्या आणि कार्तिकशुक्लप्रतिपदा यांमध्यें जेव्हां स्वातीनक्षत्र असेल तेव्हां सूर्योदयीं अभ्यंगस्नान करावें . " कश्यपसंहितेंत तर दीपावली दर्शाचा उपक्रम करुन " अमावास्या , संक्रांति , रविवार , व्यतीपात , दिनक्षय हे असले तरी प्रातःकालीं अभ्यंग दोषाकारणें न होतां पाप दूर करणारा होतो . " असा स्वातियोगावांचूनही अभ्यंग सांगितला आहे . मत्स्यपुराणांत - " हे तीन दिवस दीपांनीं आरती करतात म्हणून ही दीपावली म्हटली आहे . "
अत्रविशेषोहेमाद्रौभविष्ये दिवातत्रनभोक्तव्यमृतेबालातुराज्जनात् प्रदोषसमयेलक्ष्मींपूजयित्वाततः क्रमात् दीपवृक्षाश्चदातव्याः शक्त्यादेवगृहेषुच तत्रैवाभ्यंगमभिधाय एवंप्रभातसमयेत्वमावास्यांनराधिप कृत्वातुपार्वणश्राद्धंदधिक्षीरघृतादिभिः दीपान्दत्वाप्रदोषेतुलक्ष्मींपूज्ययथाविधि स्वलंकृतेनभोक्तव्यंसितवस्त्रोपशोभिना अयंप्रदोषव्यापीग्राह्यः तुलासंस्थेसहस्रांशौप्रदोषेभूतदर्शयोः उल्काहस्तानराः कुर्युः पितृणांमार्गदर्शनमिति ज्योतिषोक्तेः दिनद्वयेसत्त्वेपरः दंडैकरजनीयोगेदर्शः स्यात्तुपरेहऽनि तदाविहायपूर्वेद्युः परेऽह्निसुखरात्रिकेइतितिथितत्त्वेज्योतिर्वचनात् दिवोदासीयेतुप्रदोषस्यकर्मकालत्वात् अर्धरात्रेभवत्येवलक्ष्मीराश्रयितुंगृहान् अतः स्वलंकृतालिप्तादीपैर्जाग्रज्जनोत्सवाः सुधाधवलिताः कार्याः पुष्पमालोपशोभिता इतिब्राह्मोक्तेश्च प्रदोषार्धरात्रव्यापिनीमुख्या एकैकव्याप्तौपरैव प्रदोषस्यमुख्यत्वादर्धरात्रेऽनुष्ठेयाभावाच्च यत्तु अपराह्णेप्रकर्तव्यश्राद्धंपितृपरायणैः प्रदोषसमयेराजन् कर्तव्यादीपमालिकेतिक्रमः स संपूर्णतिथावेवप्राप्तेरनुवादोनविधिः तत्तत्कर्मकालव्याप्तेर्बलवत्त्वात्संपूर्णतिथौप्राप्त्याखंडतिथावप्राप्त्याविध्यनुवादविरोधाच्चेत्युक्तं अत्रैवदर्शेऽपररात्रेऽलक्ष्मीनिः सारणमुक्तंमदनरत्नेभविष्ये एवंगतेनिशीथेतुजनेनिद्रार्धलोचने तावन्नगरनारीभिः शूर्पडिंडिमवादनैः निष्काश्यतेप्रह्रष्टाभिरलक्ष्मीः स्वगृहांगणात् ।
या अमावास्येचे ठायीं विशेष सांगतो हेमाद्रींत - भविष्यांत - " त्या आश्विन अमावास्येचे दिवशीं बाल व रोगी यांवांचून इतरांनीं दिवसा भोजन करुं नये . प्रदोषकालीं लक्ष्मीचें पूजन करुन नंतर क्रमानें देवालयामध्यें यथाशक्ति दीपवृक्ष लावावे . " त्याच ग्रंथांत अभ्यंग सांगून " याप्रमाणें अमावास्येचे ठायीं प्रातःकालीं दधि , दुग्ध , घृत , इत्यादिकेंकरुन पार्वण श्राद्ध करुन प्रदोषकालीं दीप लावून यथाविधि लक्ष्मीपूजन करुन श्वेतवस्त्रानें शोभित व उत्तम अलंकारयुक्त होऊन भोजन करावें . " ही अमावास्या प्रदोषव्यापिनी घ्यावी . कारण , " तुलाराशीस सूर्य असतां चतुर्दशी व अमावास्या ह्या दोन दिवशीं प्रदोषकालीं मनुष्यांनीं चूड हातांत घेऊन पितरांस मार्ग दाखवावा . " असें ज्योतिषग्रंथांत वचन आहे . दोन दिवशीं प्रदोषकालीं असेल तर परा करावी . कारण , " जर दुसर्या दिवशीं रात्रीं अमावास्या एक घटिका असेल तर पूर्व दिवस सोडून परदिवशीं सुखरात्रि ( लक्ष्मीपूजनादि ) करावी " असें तिथितत्त्वांत ज्योतिर्वचन आहे . दिवोदासीयांत तर - प्रदोषकाल हा कर्मकाल असल्यामुळें ; आणि " लक्ष्मी ही मध्यरात्रीं घरांत येऊन राहते म्हणून घरें स्वच्छ सारवून चुना लावून शुभ्र करावीं ; व त्यांस रंग देऊन पुष्पें , माला यांनीं सुशोभित करावीं ; दिवे लावावे . आणि मनुष्यांनीं जागृत राहून उत्सव करावा " , ह्या ब्राह्मवचनावरुन अर्धरात्रीं लक्ष्मी येत असल्यामुळें प्रदोष व अर्धरात्रव्यापिनी अमावास्या मुख्य आहे . म्हणजे वरील ज्योतिषवचनांनीं प्रदोष कर्मकाल सांगितल्यामुळें प्रदोषव्यापिनी असावी , आणि ब्राह्मवचनानें मध्यरात्रव्यापिनी असावी , असें आहे म्हणून दोन्हीं कालव्यापिनी मुख्य होय . एक एक कालीं व्याप्ति असतां पराच करावी . कारण , प्रदोषकाल मुख्य आहे . आणि मध्यरात्रीं कांहीं कर्तव्यही नाहीं . आतां जें " पितृभक्तांनीं अपराह्णीं श्राद्ध करावें . प्रदोषकाळीं दीपांची माला करावी " असा क्रम सांगितला आहे . वर सांगितल्याप्रमाणें प्रदोष व अर्धरात्रव्यापिनी पूर्व दिवशींची घेतली असतां पर दिवशीं अपराह्णव्यापिनींत श्राद्ध असल्यामुळें या क्रमाचा बाध आला , असें म्हणूं नये . कारण , संपूर्ण तिथीचे ठायींच त्या क्रमाची प्राप्ति असल्यामुळें त्याचा अनुवाद केला आहे . त्या क्रमाचा अपूर्वविधि नाहीं . कारण , ह्या क्रमविधायक वाक्यापेक्षां त्या त्या कर्मकालव्याप्तिशास्त्राला बलिष्ठत्व आहे . आणि जर हें वाक्य क्रमाचें विधायक म्हटलें तर संपूर्ण तिथि असतां क्रमप्राप्त असल्यामुळें त्याविषयीं अनुवादक म्हटलें पाहिजे , व खंड तिथीचे ठायीं अप्राप्त असल्यामुळें त्याविषयीं विधायक म्हटलें असतां जें विधिवाक्य तेंच अनुवादक झाल्यानें विधीचा व अनुवादाचा एकत्र
विरोधही येतो , असें सांगितलें आहे . ह्याच अमावास्येस अपररात्रीं अलक्ष्मीचें निःसारण सांगतो मदनरत्नांत भविष्यांत - " याप्रमाणें मध्यरात्र गेली असतां निद्रेनें लोकांचे अर्धे डोळे मिटले असतां त्या वेळीं नगरांतील स्त्रियांनीं सूप व डिंडिम ( दंवडी ) वाजवून मोठ्या आनंदानें आप आपल्या गृहांगणांतून अलक्ष्मी बाहेर घालवावी .