मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
ज्येष्ठमास

द्वितीय परिच्छेद - ज्येष्ठमास

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


वृषसंक्रांतौपूर्वाः षोडशघटिकाः पुण्यकालः रात्रौसंक्रमेसतिप्रागेवोक्तं ज्येष्ठशुक्लतृतीयायांरंभाव्रतमुक्तं माधवीयेभविष्ये भद्रेकुरुष्वयत्नेनरंभाख्यंव्रतमुत्तमं ज्येष्ठशुक्लतृतीयायांस्नातानियमतत्परेति सापूर्वविद्धाग्राह्या बृहत्तपातथारंभासावित्रीवटपैतृकी कृष्णाष्टमीचभूताचकर्तव्यासंमुखीतिथिरितिस्कांदोक्तेः ।

वृषभसंक्रांतीच्या पहिल्या सोळा घटिका पुण्यकाळ होय. रात्रीं संक्रांति झाली तर त्याचा निर्णय पूर्वीच ( प्रथमपरिच्छेदांत ) सांगितला आहे. ज्येष्ठशुक्ल तृतीयेचे ठायीं रंभा ( कदली ) व्रत सांगतो माधवीयांत भविष्यांत - “ हे भद्रे, ज्येष्ठशुक्ल तृतीयेस स्नान करुन नियमतत्पर होऊन यत्नानें उत्तम रंभाव्रत कर. ” त्या व्रताविषयीं तृतीया पूर्वविद्धा घ्यावी. कारण, “ बृहत्तपा ( श्रावणकृष्ण द्वितीया ) रंभा, वटसावित्री ( वटपौर्णिमा ), वटपैतृकी ( सावित्रीव्रतसंबंधी अमावास्या ) कृष्ण पक्षांतली अष्टमी व चतुर्दशी, ह्या तिथि संमुख ( पूर्वविद्धा ) कराव्या ” असें स्कंदपुराणवचन आहे.

ज्येष्ठशुक्लदशमीदशहरा तदुक्तंहेमाद्रौब्राह्मे ज्येष्ठेमासिसितेपक्षेदशमीहस्तसंयुता हरतेदशपापानि तस्माद्दशहरास्मृतेति वाराहेपि दशमीशुक्लपक्षेतुज्येष्ठेमासिकुजेहनि अवतीर्णायतः स्वर्गाद्धस्तर्क्षेचसरिद्वरा हरतेदशपापानितस्माद्दशहरास्मृतेति स्कांदेतुदशयोगाउक्ताः तथा ज्येष्ठेमासिसितेपक्षेदशम्यांबुधहस्तयोः व्यतीपातेगरानंदेकन्याचंद्रेवृषेरवौ दशयोगेनरः स्नात्वासर्वपापैः प्रमुच्यत इति अत्रबुधभौमयोः कल्पभेदेन व्यवस्था इयंचयत्रैवयोगबाहुल्यंसैवग्राह्या योगाधिक्येफलाधिक्यात्‍ ज्येष्ठेमलमासेसतितत्रैवदशहराकार्या नतुशुद्धे दशहरासुनोत्कर्षश्चतुर्ष्वपियुगादिष्वितिहेमाद्रौऋष्यश्रृंगोक्तेः तथास्कांदे यांकांचित्सरितंप्राप्यदद्यादर्घ्यंतिलोदकं मुच्यतेदशभिः पापैः समहापातकोपमैः ।

ज्येष्ठशुक्ल दशमी ही दशहरा होय. तें सांगतो हेमाद्रींत ब्रह्मपुराणांत - “ ज्येष्ठमासीं शुक्लपक्षीं हस्तनक्षत्रयुक्त दशमी दहा* पापें हरण करिते म्हणून ती दशहरा होय. ” वराहपुराणांतही सांगतो - “ ज्येष्ठमासीं शुक्लपक्षीं भौमवारीं दशमीस हस्तनक्षत्रावर स्वर्गापासून भागीरथी अवतीर्ण झाली, ती त्या तिथीस स्नान करणारांचीं दहा पापें हरण करिते म्हणून ती दशहरा म्हटली आहे. ” स्कंदपुराणांत तर - दहा योग सांगितले आहेत - ते हे - “ ज्येष्ठमास १, शुक्लपक्ष २, दशमी ३, बुधवार ४, हस्तनक्षत्र ५, व्यतीपात ६, गरकरण ७, आनंदाख्ययोग ८, कन्येस चंद्र ९, वृषभास सूर्य १०, हे दहा योग असतां मनुष्यानें गंगेंत स्नान केलें तर तो सर्व पापांपासून मुक्त होतो. ” येथें वरील वचनांत भौमवार व या वचनांत बुधवार सांगितला त्यांची कल्पभेदानें व्यवस्था समजावी. ही दशमी ज्या दिवशीं बहुत योग असतील त्या दिवशींचीच घ्यावी; कारण, योग अधिक असतां अधिक फलप्राप्ति होते. ज्येष्ठ मलमास असेल तर मलमासांतच दशहरा दशमी करावी. शुद्ध मासांत करुं नये. कारण, “ दशहरा, चार युगादि तिथि ह्यांविषयीं उत्कर्ष ( पुढील मासीं नेणें ) नाहीं ” असें हेमाद्रींत ऋष्यश्रृंगवचन आहे. तसेंच स्कंदपुराणांत - “ कोणत्याही नदींत स्नान करुन या दशमीस अर्घ्य तिलोदक
देईल तर तो महापातकांसारख्या दहा पातकांपासून मुक्त होतो. ”

अत्रविशेषः काशीखंडे ज्येष्ठेमासिसितेपक्षेप्राप्यप्रतिपदंतिथिं दशाश्वमेधकेस्नात्वामुच्यतेसर्वपातकैः एवंसर्वासुतिथिषुक्रमस्नायीनरोत्तमः आशुक्लपक्षदशमींप्रतिजन्माघमुत्सृजेत् तथा लिंगंदशाश्वमेधेशंदृष्ट्वादशहरातिथौ दशजन्मार्जितैः पापैस्त्यज्यतेनात्रसंशयः तथाचभविष्योत्तरकाशीखंडयोः निशायां जागरंकृत्वासमुपोष्यचभक्तितः पुष्पैर्गंधैश्चनैवेद्यैः फलैश्चदशसंख्यया तथादीपैश्चतांबूलैः पूजयेच्छ्रद्धयान्वितः स्नात्वाभक्त्यातुजाह्नव्यांदशकृत्वोविधानतः दशप्रसृतिकृष्णांश्चतिलान् सर्पिश्चवैजले सक्तुपिंडान् गुडपिंडान् दद्याच्चदशसंख्यया ततोगंगातटेरम्येहेम्नारुप्येणवातथा गंगायाः प्रतिमांकृत्वावक्ष्यमाणस्वरुपिणीं संस्थाप्यपूजयेद्देवींतदलाभेमृदापिच अथतत्राप्यशक्तश्चेल्लिखेत्पिष्टेनवैभुवि वक्ष्यमाणेनमंत्रेणकुर्यात्पूजांविशेषतः नारायणंमहेशंचब्रह्माणंभास्करंतथा भगीरथंचनृपतिंहिमवंतंनगेश्वरं गंधपुष्पादिभिः सम्यग्यथाशक्तिप्रपूजयेत् दशप्रस्थांस्तिलान् दद्याद्दशविप्रेभ्यएवच दशप्रस्थान्यवान् दद्याद्दशसंख्यगवीस्तथा प्रस्थः षोडशपलानि पलंतु मुष्टिमात्रंपलंस्मृतमितिमहार्णवेउक्तं मत्स्यकच्छपमंडूकमकरादिजलेचरान् हंसकारंडवबकचक्रटिट्टिभसारसान् कारयित्वायथाशक्तिस्वर्णेनरजतेनवा तदलाभेपिष्टमयानभ्यर्च्यकुसुमादिभिः गंगायांप्रक्षिपेदाज्यदीपांश्चैवप्रवाहयेत् पुष्पाद्यैः पूजयेद्गंगांमंत्रेणानेनभक्तितः ॐनमः शिवायैनारायण्यैदशहरायैगंगायैनमो नमः इतिमंत्रंतुयोमर्त्योदिनेतस्मिन् दिवानिशं जपेत्पंचसहस्राणिदशधर्मफलंलभेत् काशीखंडेत्वन्योमंत्र उक्तः नमः शिवायैप्रथमंनारायण्यैपदंततः दशहरायैपदमितिगंगायैमंत्रएषवै स्वाहांतः प्रणवादिश्चभवेद्विंशाक्षरोमनुः पूजादानंजपोहोमस्तेनैवमनुनास्मृतमिति ।

येथें विशेष सांगतो - काशीखंडांत - “ ज्येष्ठमासीं शुक्लपक्षीं प्रतिपदा तिथीस दशाश्वमेघतीर्थांत स्नान केलें असतां सर्व पापांपासून मुक्त होतो. या प्रकारें प्रतिपदेपासून दशमीपर्यंत क्रमानें स्नान करणार्‍या मनुष्याचें सर्व जन्मांचें पाप जातें. ” तसेंच “ दशहरा तिथीस दशाश्वमेधलिंगाचें दर्शन केलें तर दशजन्मार्जित पापें जातात, यांत संशय नाहीं. ” तसेंच भविष्योत्तरांत व काशीखंडांत - “ रात्रीस जागरण व उपोषण करुन पुष्प, गंध, नैवेद्य, दहा फलें, तसेंच दीप, तांबूल यांहींकरुन भक्तीनें गंगेची पूजा करावी. भक्तीनें भागीरथीमध्यें यथाविधि दहा वेळ स्नान करुन दहा पळें काळे तीळ, घृत, सक्तुपिंड, गुडपिंड हे दहा दहा उदकामध्यें द्यावे. नंतर गंगेच्या तीरीं सुवर्णाची अथवा रुप्याची गंगेची प्रतिमा पुढें सांगितलेल्या स्वरुपाची स्थापन करुन पूजा करावी. सुवर्णादिकांची नसेल तर मृत्तिकेची मूर्ति करुन पूजा करावी. तशी मूर्ति करण्यास अशक्त असेल तर पिठानें भूमीवर मूर्ति लिहून पुढें सांगितलेल्या मंत्रानें पूजा करावी. तसेंच विष्णु, शिव, ब्रह्मा, सूर्य, राजाभगीरथ, पर्वतश्रेष्ठ हिमालय, यांची गंधपुष्पादिकांनीं चांगली पूजा करुन दहा प्रस्थ ( शेर ) तिल दहा ब्राह्मणांस द्यावे. व दहा प्रस्थ यव आणि दहा गाई द्याव्या. ” सोळा पळें म्हणजे एकप्रस्थ आणि एक मूठ म्हणजे एक पल, असें महार्णवांत उक्त आहे. “ मत्स्य, कच्छप, बेडूक, मगर, इत्यादि जलचर व हंस, कारंडव, बक, चक्रवाक, टिट्टिभ, सारस हे पक्षी यथाशक्ति सुवर्णानें किंवा रुप्यानें करावे. सुवर्णरुप्याचे अभावीं पिठानें करुन पुष्पादिकांनीं पुजून गंगेमध्यें सोडावे आणि घृतदीपही गंगेंत सोडावे आणि पुष्पादिकांनीं गंगेचें पूजन पुढें सांगितलेल्या मंत्रानें भक्तियुक्त होत्साता करावें. तो मंत्र असा - “ ॐनमः शिवायै नारायण्यै दशहरायै गंगायै नमोनमः ” या मंत्राचा जो मनुष्य त्या दिवशीं अहोरात्रीं पांच हजार जप करितो तो दशधर्माचें फल पावतो. ” काशीखंडांत तर दुसरा मंत्र सांगितला आहे - तो असा - “ नमः शिवायै ” हें प्रथम पद, नंतर “ नारायण्यै ” हें दुसरें; पुढें “ दशहरायै ” नंतर “ गंगायै ” यांच्या अंतीं ‘ स्वाहा ’ शब्द व प्रथमारंभीं ‘ ॐ ’ असा वीस अक्षरांचा मंत्र होय. पूजा, दान, जप, होम हे या मंत्रानेंच करावे असें समजावें. ”

अत्रगंगास्तोत्रपाठमपिदशवारंकुर्यात् तदुक्तंभविष्ये तस्यांदशम्यामेतच्चस्तोत्रंगंगाजलेस्थितः यः पठेद्दशकृत्वस्तुदरिद्रोवापिचाक्षमः सोपितत्फलमाप्नोतिगंगांसंपूज्ययत्नतइति स्तोत्रंचप्रतिपदादिदशमीपर्यंतंदिनवृद्धिसंख्ययापठनीयमितिशिष्टाः अत्रचसर्वोपिविस्तरः स्तोत्रादिचभट्टकृतत्रिस्थलीसेतोरवधेयः विस्तरभीतेस्तुनलिख्यते एवंकुर्वतः फलमुक्तंकाशीखंडे एवंकृत्वाविधानेनवित्तशाठ्यविवर्जितः उपवासीवक्ष्यमाणैर्दशपापैः प्रमुच्यते सर्वान् कामानवाप्नोतिप्रेत्यब्रह्मणिलीयत इतिच अस्यांसेतुबंधरामेश्वरस्यप्रतिष्ठादिनत्वाद्विशेषेणपूजाकार्या तदुक्तंस्कांदेसेतुमाहात्म्ये ज्येष्ठेमासेसितेपक्षेदशम्यांबुधहस्तयोः गरानंदेव्यतीपातेकन्याचंद्रेवृषेरवौ दशयोगेसेतुमध्येलिंगरुपधरंहरम् रामोवैस्थापयामासशिवलिंगमनुत्तममिति इतिदशहरा ।

येथें गंगास्तोत्राचा पाठही दहा वेळ करावा, तें सांगतो. भविष्यांत - “ जो दरिद्री किंवा पूर्वोक्त विधि करण्यास असमर्थ असेल त्यानें त्या दशमीस उदकांत उभें राहून दहा वेळ गंगास्तोत्राचा पाठ करावा म्हणजे त्यालाही पूर्वोक्त उत्तम फल प्राप्त होतें. ” प्रतिपदादि दशमीपर्यंत स्तोत्रपाठही दिनवृद्धिसंख्येनें ( पहिल्या दिवशीं एक पाठ, दुसर्‍या दिवशीं दोन पाठ असा ) करावा, असें शिष्ट म्हणतात. याविषयीं सर्व विस्तार व स्तोत्रादिक हें सर्व, नारायणभट्टांनीं केलेल्या त्रिस्थली सेतूंत पहावें. येथें ग्रंथविस्तारभयानें लिहीत नाहीं. असें हें पूर्वोक्त व्रत करणारास फल सांगतो - काशीखंडांत - “ जो मनुष्य उपवास करुन द्रव्याचें कार्पण्य न करितां पूर्वोक्त विधीनें व्रत करील तो पुढें सांगितलेल्या दहा पापांपासून मुक्त होऊन सर्व मनोरथांतें पावतो, व मरणानंतर ब्रह्मस्वरुपीं लीन होतो. ” ही दशमी सेतुबंधरामेश्वराचा प्रतिष्ठादिवस आहे, यास्तव ह्या दशमीस विशेषेंकरुन सेतुबंधरामेश्वराची पूजा करावी. तें सांगतो - स्कंदपुराणांत सेतुमाहात्म्यांत - “ ज्येष्ठमास, शुक्लपक्ष, दशमी, बुधवार, हस्तनक्षत्र, गरकरण, आनंदयोग, व्यतीपात, कन्येस चंद्र व वृषभास सूर्य हे दहा योग असतां रामानें सेतूमध्यें उत्तम शिवलिंगाची स्थापना केली. ” इति दशहरा.

ज्येष्ठशुक्लैकादशीनिर्जला तत्रनिर्जलमुपोष्यविप्रेभ्योजलकुंभान् दद्यादितिनिर्णयामृतेउक्तम्‍ मदनरत्नेस्कांदे ज्येष्ठेमासिनृपश्रेष्ठ्याशुक्लैकादशीशुभा निर्जलंसमुपोष्यात्रजलकुंभान् सशर्करान्‍ प्रदायविप्रमुख्येभ्यो मोदतेविष्णुसन्निधौ ।

ज्येष्ठशुक्ल एकादशी ही निर्जलासंज्ञक होय. ह्या एकादशीस उदकप्राशनावांचून उपोषण करुन ब्राह्मणांस उदककुंभ द्यावे असें निर्णयामृतांत सांगितलें आहे. मदनरत्नांत स्कंदपुराणांत सांगतो - “ ज्येष्ठमासीं शुक्लपक्षीं जी एकादशी तिचे ठायीं जलरहित उपोषण करुन शर्करासहित उदककुंभ श्रेष्ठ ब्राह्मणांस द्यावे म्हणजे विष्णूजवळ आनंद पावतो. ”

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP