मार्गादिरविवारेषुकाम्यंव्रतमुक्तंहेमाद्रौ तत्रभक्ष्याण्युक्तानिसंग्रहेसौरधर्मे पत्रत्रित्वंतुलस्यास्त्रिपलमथघृतंमार्गशीर्षादिभक्ष्यंमुष्टीनांत्रिस्तिलानांत्रिपलदधितथादुग्धकंगोमयंच त्रित्वंतोयांजलीनांत्रिमरिचकमथोत्रिः पलाः सक्तवः स्युर्गोमूत्रंशर्करासद्धविरितिविधिनाभानुवारेक्रमेणेति इतिश्रीकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौद्वितीयपरिच्छेदेमार्गशीर्षमासः समाप्तः ॥
मार्गशीर्षापासून बारा महिन्यांच्या रविवारांचे ठायीं काम्यव्रत हेमाद्रींत सांगितलें आहे. त्या व्रताचे ठायीं भक्ष्य पदार्थ सांगतो - संग्रहांत सौरधर्मांत - “ मार्गशीर्षांत रविवारीं तुळशीचीं तीन पत्रें भक्षण करावीं. पौषांत तीनपलें घृत. माघांत तीन मुष्टि तीळ. फाल्गुनांत तीन पलें दहीं. चैत्रांत तीन पलें दूध. वैशाखांत तीन पलें गोमय. ज्येष्ठांत तीन उदकांजलि. आषाढांत तीन मिरीं. श्रावणांत तीन पल सातू. भाद्रपदांत गोमूत्र. आश्विनांत शर्करा. आणि कार्तिकांत उत्तम हवि. याप्रमाणें रविवारीं भक्षण करावीं. ” इति मार्गशीर्षमासनिर्णय समाप्त झाला.