अत्रविशेषोहेमाद्रौब्राह्मे बलिप्रतिपदंप्रकम्य तस्माद् द्यूतंप्रकर्तव्यंप्रभातेतत्रमानवैः तस्मिन्द्यूतेजयोयस्यतस्यसंवत्सरंजयः पराजयोविरुद्धश्चलाभनाशकरोभवेत् दयिताभिश्चसहितैर्नेयासाचभवेन्निशेति अत्रगोवर्धनपूजादिमार्गपालीबंधनादिचोक्तंहेमाद्रौनिर्णयामृतेचस्कांदे प्रातर्गोवर्धनंपूज्यद्यूतंचापिसमाचरेत् भूषणीयास्तथागावः पूज्याश्चावाहदोहनाः गोवर्धनश्चगोमयेनकार्यश्चित्रेणवा मंत्रस्तु गोवर्धनधराधारगोकुलत्राणकारण विष्णुबाहुकृतच्छायगवांकोटिप्रदोभव गोमंत्रस्तु लक्ष्मीर्यालोकपालानांधेनुरुपेणसंस्थिता घृतंवहतियज्ञार्थेममपापंव्यपोहतु तत्रैवस्कांदे ततोऽपराह्णसमयेपूर्वस्यांदिशिभारत मार्गपालींप्रबध्नीयात्तुंगेस्तंभेथपादपे कुशकाशमयींदिव्यांलंबकैर्बहुभिर्मुने दर्शयित्वागजानश्वान्सायमस्यास्तलेनयेत् कृतेहोमेद्विजेंद्रैस्तुबध्नीयान्मार्गपालिकाम् नमस्कारंततः कुर्यान्मंत्रेणानेनसुव्रत मार्गपालिनमस्तेस्तुसर्वलोकसुखप्रदे विधेयैः पुत्रदाराद्यैः पुनरेहिव्रतस्यमे नीराजनंचतत्रैवकार्यंराष्ट्रजयप्रदं राजानोराजपुत्राश्चब्राह्मणाः शूद्रजातयः मार्गपालींसमुल्लंघ्यनीरुजः स्युः सुखान्विताः तत्रैवादित्यपुराणे कुशकाशमयींकुर्याद्वष्टिकांसुदृढांनवाम् तामेकतोराजपुत्राहीनवर्णास्तथान्यतः गृहीत्वाकर्षयेयुस्तांयथासारंमुहुर्मुहुः जयेऽत्रहीनजातीनांजयोराज्ञस्तुवत्सरमिति ।
या प्रतिपदेचे ठायीं विशेष हेमाद्रींत ब्राह्मांत बलिप्रतिपदेचा उपक्रम करुन सांगतो - " तस्मात् प्रतिपदेचे दिवशीं प्रातःकालीं मनुष्यांनीं द्यूत करावें , त्या द्यूतामध्यें ज्याचा जय होईल त्याचा वर्षपर्यंत जय होईल . व पराजय झाला असतां तो लाभाचा नाश करणारा होईल . ती रात्र स्त्रियांसहित मोठ्या आनंदांत घालवावी . " या प्रतिपदेचे ठायीं गोवर्धनपूजा , द्यूत इत्यादिक व मार्गपालीबंधन वगैरे कृत्यें सांगतो - हेमाद्रींत व निर्णयामृतांत स्कांदांत - " प्रातःकालीं गोवर्धनाची पूजा करुन द्यूतही करावें . तसेंच गाईला व वृषभांला अलंकार घालून त्यांची पूजा करावी . आणि त्या दिवशीं दूध काढणें व भार वाहविणें वर्ज्य करावें . " गोवर्धन पर्वत गोमयानें करावा किंवा रंगानें लिहावा . पूजेचा मंत्रः - " गोवर्धन धराधार गोकुलत्राणकारण ॥ विष्णुबाहुकृतच्छाय गवां कोटिप्रदो भव ." गोपूजनमंत्रः - " लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरुपेण संस्थिता ॥ घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु . " तेथेंच स्कांदांत - " नंतर अपराह्णकालीं कुशांची व काशतृणांची सुंदर मार्गपाली नांवाची रज्जु बहुत लंबकांनीं युक्त करुन ती उच्च स्तंभास व वृक्षास बांधावी . सायंकालीं तिच्या खालून हत्ती घोडे न्यावे . ब्राह्मणांनीं होम केल्यावर ती मार्गपालिका ( कुशकाशमय दोरी ) पूर्वीं सांगिल्याप्रमाणें बांधावी . नंतर या पुढील मंत्रानें तिला नमस्कार करावा . मंत्रः - मार्गपालि नमस्तेस्तु सर्वलोकसुखप्रदे ॥ विधेयैः पुत्रदाराद्यैः पुनरेहि व्रतस्य मे ॥ राज्यास जय देणारा असा नीराजनविधिही तेथेंच करावा . राजे , राजपुत्र , ब्राह्मण व शूद्रजाति हे सारे मार्गपालीचें उल्लंघन करुन गेले असतां निरोगी व सुखी होतात . " तेथेंच आदित्यपुराणांत - " कुश व काशतृण यांची नवी घट्ट अशी वष्टिकानांवाची दोरी करुन ती , एकीकडे राजपुत्र व दुसरीकडे हीनजातीचे लोक यांनीं धरुन तिचें आपल्या वलाप्रमाणें वारंवार आकर्षण करावें . त्यांत हीनजातींचा जय झाला असतां वर्षभरपर्यंत राजाचा जय होईल , असें समजावें . "
यमद्वितीयातुप्रतिपद्युताग्राह्येत्युक्तंनिर्णयामृतादौ यमद्वितीयामध्याह्नव्यापिनीपूर्वविद्धाचेतिहेमाद्रिः अत्रविशेषोहेमाद्रौस्कांदे ऊर्जेशुक्लद्वितीयायामपराह्णेऽर्चयेद्यमम् स्नानंकृत्वाभानुजायांयमलोकंनपश्यतीति ऊर्जेशुक्लेद्वितीयायांपूजितस्तर्पितोयमः वेष्टितः किन्नरैर्ह्रष्टैस्तस्मैयच्छतिवांछितम् तथाभविष्ये प्रथमाश्रावणेमासितथाभाद्रपदेपरा तृतीयाश्वयुजेमासिचतुर्थीकार्तिकेभवेत् श्रावणेकलुषानामतथाभाद्रेचगीर्मला आश्विनेप्रेतसंचाराकार्तिकेयाम्यकामतेत्युक्त्वा प्रथमायांव्रतंद्वितीयायांसरस्वतीपूजातृतीयायांश्राद्धमुक्त्वा चतुर्थ्यामुक्तम् कार्तिकेशुक्लपक्षस्यद्वितीयायांयुधिष्ठिर यमोयमुनयापूर्वंभोजितः स्वगृहेऽर्चितः अतोयमद्वितीयेयंत्रिषुलोकेषुविश्रुता अस्यांनिजगृहेविप्रनभोक्तव्यंततोनरैः स्नेहेनभगिनीहस्ताद्भोक्तव्यंपुष्टिवर्धनम् दानानिचप्रदेयानिभगिनीभ्योविधानतः स्वर्णालंकारवस्त्रान्नपूजासत्कारभोजनैः सर्वाभगिन्यः संपूज्याअभावेप्रतिपन्नकाः प्रतिपन्नाः मताभगिन्य इतिहेमाद्रिः पितृव्यभगिनीहस्तात्प्रथमायांयुधिष्ठिर मातुलस्यसुताहस्ताद्दितीयायांतथानृप पितुर्मातुः स्वसुः कन्येतृतीयायांतयोः करात् भोक्तव्यंसहजायाश्चभगिन्याहस्ततः परम् सर्वासुभगिनीहस्ताद्भोक्तव्यंबलवर्धनं यस्यांतिथौयमुनयायमराजदेवः संभोजितः प्रतिजगत्स्वसृसौह्रदेन तस्यांस्वसुः करतलादिहयोभुनक्तिप्राप्नोतिरत्नसुखधान्यमनुत्तमंसः गौडास्तु यमंचचित्रगुप्तंचयमदूतांश्चपूजयेत् अर्घ्यश्चात्रप्रदातव्योयमायसहजद्वयैः मंत्रः एह्येहिमार्तंडजपाशहस्तयमांतकालोकधरामरेश भ्रातृद्वितीयाकृतदेवपूजांगृहाणचाऽर्घ्यंभगवन्नमस्ते भ्रातस्तवानुजाताहंभुंक्ष्वभक्तमिदंशुभं प्रीतयेयमराजस्ययमुनायांविशेषतः ज्येष्ठाग्रजातेतिवदेदितिस्मार्ताः इत्यन्नदानमित्यप्याहुः ब्रह्मांडपुराणेपि यातुभोजयतेनारीभ्रातरंयुग्मकेतिथौ अर्चयेच्चापितांबूलैर्नसावैधव्यमाप्नुयात् भ्रातुरायुः क्षयोराजन्नभवेत्तत्रकर्हिचिदिति ।
यमद्वितीया तर प्रतिपदायुक्त घ्यावी , असें निर्णयामृतादिकांत सांगितलें आहे . यमद्वितीया मध्याह्नव्यापिनी व पूर्वविद्धा ( प्रतिपदाविद्धा ) घ्यावी , असें हेमाद्रि सांगतो . या यमद्वितीयेचे ठायीं विशेष सांगतो - हेमाद्रींत स्कांदांत - " कार्तिकशुक्लद्वितीयेचे ठायीं अपराह्णीं यमुनेमध्यें स्नान करुन यमाचें पूजन करणारा यमलोक पहात नाहीं . " कार्तिकशुक्ल द्वितीयेचे ठायीं पूजा करुन तृप्त केलेला असा यम आनंदित किन्नरांनीं वेष्टित होऊन पूजाकर्त्यास इच्छित फल देतो . " तसेंच भविष्यांत - " पहिली श्रावणांतील द्वितीया ; दुसरी भाद्रपदांतील द्वितीया ; तिसरी आश्विनांतील द्वितीया ; आणि चवथीं कार्तिकांतील द्वितीया आहे . श्रावणांतील द्वितीया कलुषा नांवाची होय . भाद्रपदांतील गीर्मला . आश्विनांतील प्रेतसंचारा . आणि कार्तिकांतील याम्यका होय . " असें सांगून पहिलीस व्रत , दुसरीस सरस्वतीपूजा , तिसरीस श्राद्ध सांगून चवथीस सांगतो - " पूर्वीं कार्तिकशुक्ल द्वितीयेचे ठायीं यमुनेनें आपल्या घरीं यमाचें पूजन करुन भोजन घातलें , म्हणून ही यमद्वितीया तीन लोकांमध्यें प्रसिद्ध झाली , या कारणास्तव या द्वितीयेचे ठायीं आपल्या घरीं पुरुषांनीं भोजन करुं नये . प्रीतीनें भगिनीच्या हातचें पुष्टिकारक भोजन करावें . आणि भगिनीला यथाशास्त्र दानेंही द्यावीं ; सोन्याचे दागिने , वस्त्रें , अन्न , पूजा ,
सत्कार व भोजन यांहींकरुन सर्व भगिनींचें पूजन करावें . भगिनी नसतील तर प्रतिपन्न ( मानलेल्या ) भगिनींचें पूजन करावें . "
प्रतिपन्न म्हणजे मानलेल्या भगिनी , असें हेमाद्रि सांगतो . " पहिल्या ( श्रावणांतल्या ) द्वितीयेस चुलतबहिणीच्या हातचें जेवावें . दुसर्या द्वितीयेस मातुलकन्येच्या हातचें जेवावें . तिसर्या द्वितीयेस आत्याच्या व मावशीच्या कन्येच्या हातचें भोजन करावें . चवथ्या ( कार्तिक ) द्वितीयेस सोदरभगिनीच्या हातचें जेवावें . वर सांगितलेल्या चारही द्वितीयांचे ठायीं भगिनींच्या हातचें भोजन करावें , तें बलवर्धक आहे . प्रत्येक जगांत ज्या तिथीचे ठायीं यमुनेनें भगिनी पणाच्या मैत्रीनें देव यमराजाला भोजन घातलें त्या तिथीचे ठायीं या लोकीं जो मनुष्य भगिनीच्या हातचें भोजन करितो त्याला रत्नें , सुख , धान्यें हीं उत्तम प्राप्त होतात . " गौड तर - " यम , चित्रगुप्त , यमदूत यांचें पूजन करुन सहजद्वय ( भ्राता व बहीण ) यांनीं या द्वितीयेचे ठायीं यमाला अर्घ्यही द्यावें . " मंत्रः - " एह्येहि मार्तंडज पाशहस्त यमांत कालोकधरामरेश ॥ भ्रातृद्वितीयाकृतदेवपूजां गृहाण चार्घ्यं भगवन्नमस्ते " ॥ " भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भक्तमिदं शुभं ॥ प्रीयते यमराजस्य यमुनाया विशेषतः " ॥ वडील भगिनीनें ‘ भ्रातस्तवाग्रजाताऽहं ’ असें म्हणावें असें स्मार्त सांगतात . या मंत्रानें अन्नदान करावें असेंही ( गौड ) सांगतात . ब्रह्मांडपुराणांतही " जी स्त्री द्वितीयेचे ठायीं भ्रात्याला भोजन देते व तांबूलादिकानें पूजन करिते तिला वैधव्य प्राप्त होत नाहीं , व तसें केल्यानें भ्रात्याच्या आयुष्याचा क्षय कधींही होत नाहीं . "