इदंचानुपनीतेनापिकार्यम् तदुक्तंश्राद्धशूलपाणौमात्स्ये अमावास्याष्टकाकृष्णपक्षपंचदशीषुचेत्यभिधाय एतच्चानुपनीतोपिकुर्यात्सर्वेषुपर्वसु श्राद्धंसाधारणंनामसर्वकामफलप्रदम् भार्याविरहितोप्येतत्प्रवासस्थोपिनित्यशः शूद्रोप्यमंत्रवत्कुर्यादनेनविधिनाबुध इति तेनसाग्नेरेवेदमितिपरास्तं अन्वष्टकातः पृथगेवेदंमातुः श्राद्धमित्यपिपरास्तं लाघवेनमूलैक्यादष्टकापदाविशेषाच्च तेनान्यत्रान्वष्टकाश्राद्धस्यांगस्याप्यत्रप्रधानत्वं वचनात् अवेष्टेरिवराजसूयांतर्गतायाएतयान्नाद्यकामंयाजयेदितिफलार्थत्वम् अत्राष्टकाऽन्वष्टका पूर्वानुरोधात् तथाग्निपुराणे अन्वष्टकासुवृद्धौचगयायांचक्षयेहनि अत्रमातुः पृथक् श्राद्धमन्यत्रपतिनासह आपस्तंबानांत्वष्टकासुचवृद्धौचेतिभाष्यकारैः पाठादष्टकायांमातृकाश्राद्धं छंदोगैस्त्वत्रमातृमातामहश्राद्धेनकार्येकिंतुत्रिपुरुषमेवनयोषिद्भ्यः पृथक् दद्यादवसानदिनादृते कर्षूसमन्वितंमुक्त्वातथाद्यंश्राद्धषोडशं प्रत्याद्बिकंचशेषेषुपिंडाः स्युः षडितिस्थितिरितिछंदोगपरिशिष्टात् अन्वष्टकासुतेषांकर्षूविधानादितिशूलपाणिः यत्तु तमिस्त्रपक्षेनवमीपुण्याभाद्रपदेहिया चत्वारः पार्वणाः कार्याः पितृपक्षेमनीषिभिरितितद्देशाचारतोव्यवस्थितंज्ञेयम् इदंजीवत्पितृकेणापिसपिंडंकार्यम् हेमाद्रौविष्णुधर्मोत्तरे अन्वष्टकासुचस्त्रीणांश्राद्धंकार्यंतथैवचेत्युपक्रम्य पिंडनिर्वपणंकार्यंतस्यामपिनृसत्तमेतिवचनंश्राद्धविधिनापिंडदानेप्राप्ते पुनस्तत्कीर्तनंयस्यजीवत्पित्रुकगर्भिणीपतित्वादिनापिंडदानंनिषिद्धंतस्यतत्प्राप्त्यर्थमितिश्रीतातचरणाः ।
हें नवमीश्राद्ध अनुपनीतानेंही करावें , तें सांगतो श्राद्धशूलपाणींत मात्स्यांत - " अमावास्या , अष्टका , कृष्णपक्षांतील पंधरा तिथि यांचे ठायीं श्राद्ध करावें . " असें सांगून " हें सर्व काम फल देणारें साधारण श्राद्ध अनुपनीतानेंही ( मौंजी न झालेल्यानेंही ) सर्व पर्वांचे ठायीं करावें . भार्याविरहित असला तरी , व प्रवासांत असला तरी त्यानें नित्य करावें . शूद्रानेंही ह्या सांगितलेल्या विधीनें अमंत्रक करावें , " यावरुन हें अन्वष्टकाश्राद्ध साग्निकालाच आहे , असें म्हणणें खंडित झालें . अन्वष्टकेहून हें मातृश्राद्ध वेगळेंच आहे , असें म्हणणें तेंही खंडित झालें . कारण , अन्वष्टका आणि नवमीश्राद्ध या दोघांचें मूलवचन एक आहे , असें म्हटलें असतां लाघव येतें . आणि ह्या वरील मात्स्यवचनांत ‘ अष्टका ’ पद सामान्य सांगितलें आहे , त्यावरुन नवमीश्राद्धही तेंच समजावें . तेणेंकरुन इतर ठिकाणीं अन्वष्टकाश्राद्ध अंग असलें तरी येथें वरील वचनावरुन प्रधान समजावें . जसा - राजसूययज्ञाच्या अंतर्गत अवेष्टीचा याग आहे , त्याला राजसूयांत अंगत्व असलें तरी ‘ एतया अन्नाद्यकामं याजयेत् ’ म्हणजे अन्नादिकांची इच्छा असेल त्याच्याकडून ह्या अवेष्टीचा याग करावा , या वचनावरुन फलाकरितां प्रधानत्व सांगितलें आहे . तसें इतर अष्टकाश्राद्धांत अन्वष्टकाश्राद्धाला अंगत्व असलें तरी एथें प्रधानत्व सजवावें . यावरील मात्स्यवचनांत पूर्वीच्या अनुरोधानें अष्टका म्हणजे अन्वष्टका समजावी . तसेंच - अग्निपुराणांत " अन्वष्टका , वृद्धिश्राद्ध , गया आणि मृतदिवस यांचे ठायीं मातेचें पृथक् श्राद्ध करावें . अन्यत्र ठिकाणीं पतीसह मातेचें श्राद्ध करावें . " आपस्तंबांचें तर " अष्टकांचे ठायीं , आणि वृद्धीचे ठायीं " असें भाष्यकारांनीं वचन पठित असल्यामुळें अष्टकेचे ठायीं मातृश्राद्ध करावें . छंदोगांनीं ( सामगांनीं ) तर येथें अष्टकांचे ठिकाणीं माता व मातामह यांचीं श्राद्धें करुं नयेत . तर पित्रादि तीन पुरुषांचेंच करावें . कारण , " मृतदिवसावांचून स्त्रियांना पृथक् श्राद्ध देऊं नये . कर्षूयुक्त श्राद्ध ( अन्वष्टक्य ), पहिल्या वर्षांतील षोडश श्राद्धें आणि प्रतिसांवत्सरिक हीं वर्ज्य करुन इतर श्राद्धांचे ठायीं सहा पिंड द्यावे , अशी शास्त्रमर्यादा आहे . असें छंदोगपरिशिष्ट आहे . त्यांच्या अन्वष्टकाश्राद्धांत कर्षूचें विधान आहे , म्हणून कर्षूयुक्त श्राद्ध म्हणजे अन्वष्टकाश्राद्ध समजावें असें शूलपाणी सांगतो . आतां जें " भाद्रपदांत कृष्णपक्षाची जी पुण्यकारकनवमी तिचे ठायीं विद्वानांनीं चार पार्वण करावे . " असें सांगितलें त्याची देशाचारावरुन व्यवस्था जाणावी . हें श्राद्ध जीवत्पितृकानें देखील सपिंडक करावें . कारण , हेमाद्रींत विष्णुधर्मोत्तरांत " अन्वष्टकांचे ठायीं स्त्रियांचें श्राद्ध तसेंच करावें " असा उपक्र्म करुन " त्या ठिकाणींही पिंडप्रदान करावें " असें सांगितलें आहे . श्राद्धविधीनें पिंडदान प्राप्त असतां हें पुनः पिंडदान सांगितलें अशाकरितां कीं , जीवत्पितृक , गर्भिणीपति इत्यादि कारणांनीं ज्याला पिंडदान निषिद्ध आहे , त्याला तें पिंडदान प्राप्त होण्याकरितां आहे , असें आमचे वडील ( रामकृष्णभट्ट ) सांगतात .
अत्रसुवासिनीभोजनमुक्तं मार्कंडेयपुराणे मातुः श्राद्धेतुसंप्राप्तेब्राह्मणैः सहभोजनम् सुवासिन्यैप्रदातव्यमितिशातातपोब्रवीत् भर्तुरग्रेमृतानारीसहदाहेनवामृता तस्याः स्थानेनियुंजीतविप्रैः सहसुवासिनीं तत्रैव मदालसावाक्यम् स्त्रीश्राद्धेपुत्रदेयाः स्युरलंकाराश्चयोषिते मंजरीमेखलादामकर्णिकाकंकणादय इति ।
येथें सुवासिनीभोजन सांगतो मार्केंडेयपुराणांत - " मातेचें श्राद्ध प्राप्त असतां ब्राह्मणांसह सुवासिनीला भोजन द्यावें , असें शातातप सांगता झाला . भर्त्याचे आधीं मृत झालेली स्त्री , किंवा पतीबरोबर सहगमनानें मृत झालेली स्त्री तिच्या स्थानीं ब्राह्मणांसह सुवासिनीची योजना करावी . " तेथेंच मदालसेचें वाक्य - " स्त्रीश्राद्धाचे ठायीं सुवासिनीला मंजरी , मेखला ( कमरपट्टा ), सर , कर्णिका , कांकणें इत्यादि अलंकार द्यावे . "
अत्राशक्तावनुकल्पमाहाश्वलायनः अनडुहोयवसमाहरेदग्निनावाकक्षमुपोषेदेषामेऽष्टकेतिनत्वेवानष्टकः स्यादिति हेमाद्रौपितामहः अमावास्याव्यतीपातपौर्णमास्यष्टकासुच विद्वान् श्राद्धमकुर्वाणोनरकंप्रतिपद्यते अकरणेचप्रायश्चित्तमुक्तमृग्विधाने एभिर्द्युभिर्जपेन्मंत्रंशतवारंतुतद्दिने आन्वष्टक्यंयदान्यूनंसंपूर्णंयातिसर्वथेति एतत्पक्षेद्वादश्यांविशेषः पृथिवीचंद्रोदयेवायवीये संन्यासिनोप्याब्दिकादिपुत्रः कुर्याद्यथाविधि महालयेतुयच्छ्राद्धंद्वादश्यांपार्वणंतुतदिति ।
अन्वष्टकाश्राद्धांविषयीं अशक्ति असेल तर अनुकल्प सांगतो आश्वलायन - " वृषभाला गवत घालावें , अथवा अग्नीनें गवत जाळावें , आणि ही माझी अष्टका असें म्हणावें . पण अष्टका केल्यावांचून राहूं नये . " हेमाद्रींत पितामह - " अमावास्या , व्यतीपात , पौर्णमासी , अष्टका यांचे ठायीं विद्वान् श्राद्ध न करणारा नरकास जातो . " अन्वष्टक्य न केलें असतां प्रायश्चित्त सांगतो ऋग्विधानांत - " त्या अन्वष्टक्यदिवशीं ‘ एभिर्द्युभि० ’ ह्या मंत्राचा शंभर वेळां जप करावा , म्हणजे अन्वष्टक्य झालें नसेल तर तें संपूर्ण सर्वथा होतें . " ह्या कृष्णपक्षांत द्वादशीस विशेष सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत वायवीयांत - " पुत्रानें संन्याशाचेंही सांवत्सरिकादिक श्राद्ध यथाविधि करावें . महालयांत जें संन्याशाचें श्राद्ध तें द्वादशीस पार्वण करावें . "