आतां त्रयोदशीश्राद्ध सांगतो .
अथत्रयोदशीश्राद्धं तत्रचंद्रिका त्रयोदशीभाद्रपदीकृष्णामुख्यापितृप्रिया तृप्यंतिपितरस्तस्यांस्वयंपंचशतंसमाः मघायुतायांतस्यांतुजलाद्यैरपितोषिताः तृप्यंतिपितरस्तद्वद्वर्षणामयुतायुतं प्रयोगपारिजातेशंखः प्रौष्ठपद्यामतीतायांमघायुक्तांत्रयोदशीम् प्राप्यश्राद्धंतुकर्तव्यंमधुनापायसेनच प्रजामिष्टांयशः स्वर्गमारोग्यंचधनंतथा नणांश्राद्धेसदाप्रीताः प्रयच्छंतिपितामहाः एतन्नित्यमपि पृथ्वीचंद्रोदयेविष्णुधर्मे प्रौष्ठपद्यामतीतायांतथाकृष्णात्रयोदशीत्युक्त्वा एतांस्तुश्राद्धकालान्वैनित्यानाहप्रजापतिः श्राद्धमेतेष्वकुर्वाणोनरकंप्रतिपद्यत इत्युक्तेः एतच्चविभक्तैरपिपृथक्कार्यं तथाचहेमाद्रौ विभक्तावाऽविभक्तावाकुर्युः श्राद्धंपृथक् सुताः मघासुचततोन्यत्रनाधिकारः पृथग्विनेति अपरार्केवायवीये हंसेहस्तस्थितेयातुमघायुक्तात्रयोदशी तिथिर्वैवस्वतीनामसाछायाकुंजरस्यतु अत्रच अपिनः सकुलेभूयाद्योनोदद्यात्रयोदशीम् पायसंमधुसर्पिर्भ्यांप्राक् छायेकुंजरस्यचेतिविष्णुमनुवचनेकेवलत्रयोदशीश्रुतेर्मघागुण इतिकल्पतरुः शूलपाणिस्तुकेवलवाक्यानामर्थवादत्वाद्विधौचमघायोगश्रुतेर्विधिलाघवात् विशिष्टमेवनिमित्तमित्याह वस्तुवस्तु मधुमांसैश्चशाकैश्चपयसापायसेनच एषनोदास्यतिश्राद्धंवर्षासुचमघासुचेतिवसिष्ठवचनेकेवलमघाश्रुतेर्विनिगमकाभावादुभयंभिन्ननिमित्तं पूर्वोक्तवचनाच्चयोगाधिक्येफलाधिक्यम् अतएवयाज्ञवल्क्यः तथावर्षात्रयोदश्यांमघासुचविशेषत इति त्रयोदशीश्राद्धंनित्यम् अन्यत्काम्यं अत्रत्रयोदश्यां बहुपुत्रायुवमारिणस्तुभवंतीत्यापस्तंबोक्तेर्युवमारित्वमपत्यदोषंसहिष्णोरपत्यमात्रार्थिनः स्मृत्यंतरोक्तधनार्थिनोवाधिकार इतिकल्पतरुः अपत्यनिंदयातदर्थिनोऽनधिकारात् फलांतरकामस्यैवाधिकार इतिहलायुधः एतत्पिंडरहितंकार्यं मघायुक्तत्रयोदश्यांपिंडनिर्वपणंद्विजः ससंतानोनैवकुर्यान्नित्यंतेकवयोविदुरितिबृहत्पराशरोक्तेः इदंमलमासेपिकार्यं मघात्रयोदशीश्राद्धंप्रत्युपस्थितिहेतुकम् अनन्यगतिकत्वेनकर्तव्यंस्यान्मलिम्लुचेइतिकाठकगृह्योक्तेः ।
त्याविषयीं चंद्रिका - " भाद्रपदाची कृष्णत्रयोदशी मुख्य व पितरांना प्रिय आहे . तिच्या ठिकाणीं श्राद्ध केलें असतां पांचशें वर्षैपर्यंत पितर तृप्त होतात . मघायुक्त त्या त्रयोदशीस उदकादिकांनीं देखील तुष्ट केलेले पितर लाखोंवर्षैंपर्यंत तसेच तृप्त होतात . " प्रयोगपारिजातांत शंख - " प्रौष्ठपदी पौर्णिमा अतिक्रांत झाल्यावर पुढें मघायुक्त त्रयोदशी प्राप्त असतां मधानें व पायसानें श्राद्ध करावें . श्राद्धाचे ठायीं संतुष्ट झालेले पितामह मनुष्याला अभीष्ट प्रजा , कीर्ति , स्वर्ग , आरोग्य आणि द्रव्य देतात . " हें श्राद्ध नित्यही आहे . कारण , पृथ्वीचंद्रोदयांत विष्णुधर्मांत - " तशीच प्रौष्ठपदी गेली असतां त्रयोदशी " असें सांगून " हे श्राद्धकाल नित्य आहेत , असें प्रजापति सांगतो . यांचे ठायीं श्राद्ध न करणारा नरकास जातो " असें सांगितलें आहे . हें श्राद्ध अविभक्तांनीं देखील वेगवेगळें करावें . तसेंच हेमाद्रींत - " विभक्त किंवा अविभक्त अशा पुत्रांनीं मघांचे ठायीं श्राद्ध पृथक् करावें , अन्यत्र ठिकाणीं पृथक् करण्याविषयीं विभक्तावांचून अधिकार नाहीं . " अपरार्कांत वायवीयांत - " सूर्य हस्तनक्षत्रास असतां जी मघायुक्त त्रयोदशी तिथि ती यमाची आहे , तिला गजच्छाया म्हणतात . " या ठिकाणीं " पितर अशी आशा करितात कीं , त्रयोदशीस गजच्छायेचे ठायीं मधुघृतानें युक्त पायस देणारा असा कोणी आमच्या कुलांत उत्पन्न होईल काय ? " ह्या मनुवचनांत व पूर्वोक्त विष्णुधर्मवचनांत केवळ त्रयोदशीचें श्रवण असल्यामुळें मघानक्षत्र हा गुण आहे , असें कल्पतरु सांगतो . शूलपाणि तर - केवळ त्रयोदशीचीं वाक्यें अर्थवाद असल्यामुळें ( शंख - हेमाद्यादि ) विधिवाक्यांत मघायोगश्रवण असल्यामुळें मघाविशिष्ट ( युक्त ) त्रयोदशीचा उद्देश करुन श्राद्धाचें विधान केल्यानें लाघव येत असल्यामुळें श्राद्धाविषयीं मघाविशिष्टच त्रयोदशी निमित्त आहे , असें सांगतो . वास्तविक म्हटलें तर - " मधु , मांस , शाक , दूध , पायस यांहींकरुन वर्षाऋतूंत आणि मघांवर हा ( पुत्र ) आह्मांस श्राद्ध देईल " असें पितर इच्छितात , ह्या वसिष्ठवचनांत केवळ ( त्रयोदशीशिवाय ) मघाश्रवण असल्यामुळें व पूर्वीच्या विष्णुधर्मवचनांत केवळ त्रयोदशीश्रवण असल्यामुळें त्रयोदशी किंवा मघा अमुकच निमित्त मानावें व अमुक मानूं नये , याविषयीं प्रमाण नसल्यामुळें दोन्ही वेगवेगळीं निमित्तें आहेत . आणि पूर्वीं सांगितलेल्या चंद्रिकादि वचनावरुन अधिक योग असतां अधिक फल होतें . म्हणूनच सांगतो याज्ञवल्क्य - " तसेंच वर्षाकालीं त्रयोदशीस श्राद्ध करावें . मघांवर विशेषेंकरुन फलदायक आहे . " त्रयोदशीश्राद्ध नित्य आहे . दुसरें ( मघांवरचें ) काम्य आहे . " ह्या त्रयोदशीस श्राद्ध केलें असतां तारुण्यावस्थेंत मरणारे असे बहुत पुत्र होतात " ह्या आपस्तंबवचनावरुन तारुण्यांत मरणरुप अपत्यदोष सहन करणारा व केवळ अपत्याचीच इच्छा करणारा अशाला ह्या त्रयोदशीश्राद्धाविषयीं अधिकार किंवा इतर स्मृतींत सांगितलेल्या धनाची इच्छा करणाराला ह्या श्राद्धाविषयीं अधिकार , असें कल्पतरु सांगतो . अपत्याची निंदा ( मरणरुप दोष ) सांगितल्यामुळें अपत्येच्छूला अधिकार नसल्यामुळें इतर फलेच्छूलाच अधिकार आहे , असें हलायुध सांगतो . हें श्राद्ध पिंडरहित करावें . कारण , " संतानयुक्त द्विजानें मघायुक्त त्रयोदशीस कधींही पिंडदान करुं नये , हें विद्वान् जाणतात . " असें बृहत्पराशरवचन आहे . हें श्राद्ध मलमासांतही करावें . कारण , " मघात्रयोदशीश्राद्ध हें घायुक्तत्रयोदशीप्राप्तिनिमित्तक असल्यामुळें दुसरी गति ( पुढच्या मासांत ) नसल्याकारणानें मलमासांत करावें . " असें काठकगृह्यवचन आहे .
यानितु अंगिराः त्रयोदश्यांकृष्णपक्षेयः श्राद्धंकुरुतेनरः पंचत्वंतस्यजानीयाज्जेष्ठपुत्रस्यनिश्चितम् वामनपुराणे त्रयोदश्यांतुवैश्राद्धंनकुर्यात्पुत्रवान् गृहीत्यादीनिवचनानितानिपुत्रवद्विषयाणिवामहालयस्थभिन्नत्रयोदशीविषयाणिवाकाम्यश्राद्धविषयाणिवासपिंडकश्राद्धविषयाणिवेति केचित् हेमाद्रिप्रमुखास्त्वेकवर्गश्राद्धविषयाणि श्राद्धंनैवैकवर्गस्यत्रयोदश्यामुपक्रमेत् नतृप्तास्तत्रयेयस्यप्रजाहिंसंतितस्यत इतिकार्ष्णाजिनिस्मृतेः यद्यपि पितरोयत्रपूज्यंतेतत्रमातामहाअपीतिधौम्योक्तेर्नकेवलपितृवर्गस्यप्राप्तिस्तथापिव्यामोहादिप्राप्तनिषेधोयमित्याहुः वयंतुपश्यामः पुत्रवद्विषयाण्येवेति असंतानस्तुयस्तस्यश्राद्धेप्रोक्तात्रयोदशी संतानयुक्तोयः कुर्यात्तस्यवंशक्षयोभवेदितिहेमाद्रौनागरखंडोक्तेः पूर्ववाक्यमप्यसंतानस्यैवैकवर्गनिषेधकमिति अत्रमघात्रयोदशीमहालययुगादिश्राद्धानांतंत्रेणप्रयोगः नतुप्रसंगसिद्धिरित्यन्यत्रविस्तरः ।
आतां जीं - अंगिरा - " त्रयोदशीस कृष्णपक्षांत जो मनुष्य श्राद्ध करितो , त्याचा ज्येष्ठ पुत्र निश्चयानें मरतो . " वामनपुराणांत - " त्रयोदशीस पुत्रवंत गृहस्थानें श्राद्ध करुं नये " इत्यादिक वचनें तीं पुत्रवंतविषयक किंवा महालयांतील त्रयोदशीवांचून इतर त्रयोदशीविषयक , अथवा काम्यश्राद्धविषयक , किंवा सपिंडकश्राद्धविषयक समजावीं , असें केचित् सांगतात . हेमाद्रिप्रमुख ग्रंथकार तर - एक वर्ग श्राद्ध विषयक तीं वचनें आहेत . कारण , " त्रयोदशीस एक वर्गाचें श्राद्ध करुं नयेच . कारण , त्या श्राद्धांत ज्याचे जे पितर तृप्त होत नाहींत ते पितर त्याच्या प्रजेचा नाश करितात . " अशी कार्ष्णाजिनिस्मृति आहे . जरी " ज्या ठिकाणीं पितरांची पूजा असते त्या ठिकाणीं मातामहांचीही पूजा करावी " ह्या धौम्यवचनावरुन केवळ पितृवर्गाचेंच श्राद्ध प्राप्त होत नाहीं , तरी व्यामोहादिकेंकरुन केवळ एक वर्गाचें श्राद्ध प्राप्त होईल त्याचा हा कार्ष्णाजिनिस्मृतीनें निषेध केला आहे , असें सांगतात . आम्हीं तर असें समजतों कीं , हीं वरील वचनें पुत्रवंतविषयकच आहेत . कारण , " जो संततिरहित असेल त्याला श्राद्धाविषयीं त्रयोदशी सांगितली आहे . जो संतानयुक्त मनुष्य त्या त्रयोदशीस श्राद्ध करील त्याचा वंशक्षय होईल " असें हेमाद्रींत नागरखंडवचन आहे . पूर्वींचें कार्ष्णाजिनिवाक्यही असंतानालाच एकवर्गश्राद्धाचें निषेधक आहे . येथें मघात्रयोदशीश्राद्ध , महालय , युगादिश्राद्ध ह्या तीन श्राद्धांचा तंत्रानें प्रयोग करावा . एकानें इतरांची प्रसंगसिद्धि होत नाहीं . ह्याचा अन्यग्रंथीं विस्तार केलेला आहे . इति त्रयोदशी ।