अथागस्त्यार्घ्यः तत्कालोव्रतहेमाद्रौभविष्ये कन्यायामागतेसूर्येअर्वाग्वैसप्तमेदिने कन्यायांसमनुप्राप्तेह्यर्घकालोनिवर्तते तेन उदयोत्तरमपिसप्तदिनमध्येइत्यर्थः यत्पाद्मे आसप्तरात्रादुदयाद्यमस्यदातव्यमेतत्सकलंनरेण यावत्समाः सप्तदशाथवास्युरथोर्ध्वमप्यत्रवदंतिकेचित् यमस्यागस्त्यस्य उदयकालश्चदिवोदासीयेउक्तः उदेतियाम्यांहरिसंक्रमाद्रवेरेकाधिकेविंशतिमेह्यगस्त्यः ससप्तमेस्तंवृषसंक्रमाच्चप्रयातिगर्गादिभिरप्यभाणि ।
आतां अगस्त्यार्घ्य सांगतो - त्याचा काल व्रतहेमाद्रींत भविष्यांत - " कन्याराशीस सूर्य जाण्याचे पूर्वीं सातव्या दिवशीं अगस्त्याचा अर्घ्यकाल प्राप्त आहे . कन्येस सूर्य गेला असतां अर्घ्यकाल निवृत्त होतो . " या वचनावरुन उदयोत्तरही सातदिवसांमध्यें अर्घ्य द्यावा , असा अर्थ . कारण , पाद्मांत सांगतो - " अगस्त्याच्या उदयापासून सातदिवसपर्यंत हें अगस्तीला अर्घ्य सकल मनुष्यांनीं द्यावें . याप्रमाणें सतरावर्षेंपर्यंत करावें . अथवा सतरावर्षांनंतरही ह्या काळीं हें अर्घ्यदानादि करावें , असें केचित् म्हणतात . " उदयकाल दिवोदासीयांत सांगतो - " सूर्याच्या सिंहसंक्रांतीपासून एकवीस दिवसांनीं दक्षिणेस अगस्ति उदय पावतो , आणि वृषसंक्रांतीपासून सातवे दिवशीं अगस्तीचें अस्त होतें , असें गर्गादिकांनीं सांगितलें आहे . "
अत्रविधिर्विष्णुरहस्ये काशपुष्पमयींरम्यांकृत्वामूर्तिंतुवारुणेः प्रदोषेविन्यसेत्तांतुपूर्णकुंभेस्वलंकृताम् कुंभस्थांपूजयेत्तांतुपुष्पधूपविलेपनैः दध्यक्षतबलिंदद्याद्रात्रौकुर्यात्प्रजागरं पूजाचवक्ष्यमाणार्घ्यमंत्रेणकार्या प्रभातेतांसमादाययायात्पुण्यंजलाशयं निशावसानेतांपश्यन् जलांतेप्रतिमांमुनेः अर्घ्यंदद्यादगस्त्यायभक्त्यासम्यगुपोषितः मात्स्येतु अंगुष्ठमात्रंपुरुषंतथैवसौवर्णमत्यायतबाहुदंडं पूर्वंकाशमयीत्वमशक्तौ चतुर्भुजंकुंभमुखेनिधायधान्यानिसप्तांकुरसंयुतानि सकाशपुष्पाक्षतशुक्तियुक्तमंत्रेणदद्याद्दिजपुंगवाय धेनुंबहुक्षीरवतींचदद्यात्सवस्त्रघंटाभरणांद्विजाय भविष्ये विरुढैः सप्तधान्यैश्चवंशपात्रनिधापितैः सौवर्णरुप्यपात्रेणताम्रवंशमयेनवा मूर्ध्निस्थितेननम्रेणजानुभ्यांधरणींगतः विष्णुरहस्ये अगस्त्यः खनमानेतिपठन्मंत्रमिमंमुनेः अर्घ्यंदद्यादगस्त्यायशूद्रेमंत्रविधिस्त्वयं काशपुष्पप्रतीकाशवह्निमारुतसंभव मित्रावरुणयोः पुत्रकुंभयोनेनमोस्तुते विंध्यवृद्धिक्षयकरमेघतोयविषापह रत्नवल्लभदेवेशलंकावासनमोस्तुते वातापीभक्षितोयेनसमुद्रः शोषितः पुरा लोपामुद्रापतिः श्रीमान्योसौतस्मैनमोनमः येनोदितेनपापानिविलयंयांतिव्याधयः तस्मैनमोस्त्वगस्त्यायसशिष्यायचपुत्रिणे अगस्त्यः खनमानेतिविप्रोर्घ्यंविनिवेदयेत् राजपुत्रिमहाभागेऋषिपत्निवरानने लोपामुद्रेनमस्तुभ्यमर्घ्यंमेप्रतिगृह्यतां दत्वैवमर्घ्यंकौरव्यप्रणिपत्यविसर्जयेत् अर्चितस्त्वंयथाशक्त्यानमोगस्त्यमहर्षये
ऐहिकामुष्मिकींदत्वाकार्यसिद्धिंव्रजस्वमे विसर्जयित्वागस्त्यंतंविप्रायप्रतिपादयेत् अगस्त्योमेमनस्थोस्तुअगस्त्योस्मिन्घटेस्थितः आगस्त्योद्विजरुपेणप्रतिगृह्णातुसत्कृतः दानमंत्रः अगस्त्यः सप्तजन्माघंनाशयत्वावयोरयम् अतुलंविमलंसौख्यंप्रयच्छत्वंमहामुने प्रतिग्रहमंत्रः विष्णुरहस्ये त्यजेदगस्त्यमुद्दिश्यधान्यमेकंफलंरसम् होमंकृत्वाततः पश्चाद्वर्जयेन्मानवः फलम् होमश्चार्घ्यमंत्रेणाज्येन भविष्ये दत्वार्घ्यंसप्तवर्षाणिक्रमेणानेनपांडव ब्राह्मणः स्याच्चतुर्वेदः क्षत्रियः पृथिवीपतिः वैश्येचधान्यनिष्पत्तिः शूद्रश्चधनवान्भवेत् यावदायुश्चयः कुर्यात्सपरंब्रह्मगच्छति इत्यगस्त्यार्घ्यः ।
अगस्त्यार्घ्याचा विधि विष्णुरहस्यांत - " अगस्त्याची मूर्ति काशतृण , पुष्पें यांनीं सुंदर करुन तिला अलंकार घालून प्रदोषकालीं पूर्णकुंभावर ठेवावी आणि कुंभावर ठेविलेली ती मूर्ति पुष्प , धूप , गंध , यांहींकरुन पुजावी . दधियुक्त अक्षतांचा बलि द्यावा , व रात्रीस जागरण करावें . " पूजा तर पुढें सांगितलेल्या अर्घ्यमंत्रानें करावी . " प्रातःकालीं ती मूर्ति घेऊन पुण्य अशा उदकाजवळ जावें . चांगलें उपोषण करुन रात्र गेल्यानंतर उदकाच्या समीप त्या मुनीच्या प्रतिमेतें पाहात होत्साता भक्तीनें अगस्त्यास अर्घ्य द्यावें . मत्स्यपुराणांत तर " सुवर्णाचा अंगुष्ठप्रमाण पुरुष करावा , त्याचे बाहुदंड फार लांब असावे . पूर्वी काशतृणाची मूर्ति करावी , म्हणून सांगितलें तें शक्ति नसतां समजावें . अंकुर आलेलीं सप्तधान्यें , काशपुष्पें , अक्षता , शिंप यांनीं सहित चतुर्भुज अशी प्रतिमा कुंभाच्या मुखावर ठेऊन ब्राह्मणश्रेष्ठाला द्यावी व बहुतदुधाची गाय वस्त्र , घंटा , अलंकार यांनीं सहित ब्राह्मणास द्यावी . भविष्यांत " बांबूचे पात्रांत ठेवून रुजलेल्या सप्तधान्यांनीं युक्त सोन्याचें , रुप्याचें , तांब्याचें अथवा बांबूचें पात्र मस्तकीं ठेऊन नम्र होऊन गुडघ्यांनीं भूमीला स्पर्श करावा . " विष्णुरहस्यांत " अगस्त्यः खनमानः " हा मंत्र म्हणून अगस्त्यास अर्घ्य द्यावें . शूद्राविषयीं हा पुढें सांगितलेला मंत्र - काशपुष्पप्रतीकाश वह्निमारुतसंभव ॥ मित्रावरुणयोः पुत्र कुंभयोने नमोस्तु ते ॥ विध्यंवृद्धिक्षयकर मेघतोयविषापह ॥ रत्नवल्लभदेवेश लंकावास नमोऽस्तु ते ॥ वातापी भक्षितो येन समुद्रः शोषितः पुरा ॥ लोपामुद्रापतिः श्रीमान् योऽसौ तस्मै नमो नमः ॥ येनोदितेन पापानि विलयं यांति व्याधयः ॥ तस्मै नमोस्त्वगस्त्याय सशिष्याय च पुत्रिणे ॥ ‘ अगस्त्यः खनमानः ’ ह्या मंत्रेंकरुन ब्राह्मणानें अर्घ्य द्यावें . नंतर अगस्त्याचे पत्नीस अर्घ्य द्यावें . त्याचा मंत्र - राजपुत्रि महाभागे ऋषिपत्नि वरानने ॥ लोपामुद्रे नमस्तुभ्यमर्घ्यं मे प्रतिगृह्यतां असें अर्घ्य देऊन नमस्कार करुन विसर्जन करावें . विसर्जनाचा मंत्र - अर्चितस्त्वं यथाशक्त्या नमोगस्त्य महर्षये ॥ ऐहिकामुष्मिकीं दत्वा कार्यसिद्धिं व्रजस्व मे ॥ याप्रमाणें अगस्त्याचें विसर्जन करुन तो अगस्त्य ब्राह्मणाला द्यावा . दानाचा मंत्र - अगस्त्यो मे मनस्थोस्तु अगस्त्योस्मिन् घटे स्थितः ॥ अगस्त्यो द्विजरुपेण प्रतिगृह्णातु सत्कृतः ॥ प्रतिग्रहाचा मंत्र - अगस्त्यः सप्तजन्माघं नाशयत्वावयोरयं ॥ अतुलं विमलं सौख्यं प्रयच्छ त्वं महामुने ॥ " विष्णुरहस्यांत - " अगस्त्याच्या उद्देशानें एक धान्य , एक फल , एक रस , हीं सोडावीं . नंतर होम करुन मनुष्यानें फल वर्ज्य करावें . " होमही अर्घ्योक्त मंत्रानें आज्याचा करावा . भविष्यांत - " हे पांडवा ! या क्रमानें सात वर्षैं अर्घ्य दिलें असतां ब्राह्मण चतुर्वेदवेत्ता होतो . क्षत्रिय पृथिवीपति होतो . वैश्यास धान्यप्राप्ति , व शूद्र धनवान् होतो . आयुष्य आहे तोंपर्यंत जो अगस्त्याला अर्घ्यदान करितो तो परब्रह्मपदास जातो . " ॥ इत्यगस्त्यार्घ्यः ॥
भाद्रपौर्णमास्यांप्रपितामहात्परांस्त्रीनुद्दिश्यश्राद्धंकार्यं तदुक्तंहेमाद्रौब्राह्ममार्कंडेययोः नांदीमुखानां प्रत्यब्दंकन्याराशिगतेरवौ पौर्णमास्यांतुकर्तव्यवराहवचनंयथेति नांदीमुखत्वंचोक्तंब्राह्मे पितापितामहश्चैव तथैवप्रपितामहः त्रयोह्यश्रुमुखाह्येतेपितरः परिकीर्तिताः तेभ्यः पूर्वतरायेचप्रजावंतः सुखैधिताः तेतुनांदीमुखानांदीसमृद्धिरितिकथ्यते एतच्चप्रत्यब्दमित्युक्तेः पक्षश्राद्धपक्षेसकृन्महालयपक्षेचावश्यकमितिप्रयोगपारिजाते अत्रमातामहाअपिकार्याः पितरोयत्रपूज्यंतेतत्रमातामहाअपीतिधौम्योक्तेः पितृशब्दस्यचजनकपरत्वेबहुवचनविरोधेनपितृभावापन्नपरत्वात् वार्षिकेतुवचनान्निवृत्तिः नचजीवत्पितृकस्यान्वष्टकायांमातृश्राद्धेतदापत्तिः इष्टापत्तेः अतएवस उक्तश्राद्धेषुस्वमातृमातामहयोर्दद्यादितिमदनरत्नकालादर्शौ एतज्जीवत्पितृकश्राद्धेवक्ष्यामः केचित्तुअजहल्लक्षणयापित्रादयोयत्रतत्रमातामहास्तेनात्रनेत्याहुः नचात्रनाम्नानांदीश्राद्धधर्मातिदेशः वैष्णवादिशब्दवद्देवतापरस्यकर्मनामत्वाभावात् नापिनांदीमुखत्वंपितृविशेषणंपारिभाषिकत्वादितिदिक् तथानिर्णयदीपेगार्ग्यः पौर्णमासीषुसर्वासुनिषिद्धंपिंडपातनम् वर्जयित्वाप्रौष्ठपदींयथादर्शस्तथैवसेति इतिश्रीमीमांसकरामकृष्णभट्टात्मजभट्टकमलाकरकृतेनिर्णयसिंधौभाद्रपदमासः ।
भाद्रपदपौर्णिमेचे ठायीं प्रपितामहाच्या पूर्वींचे जे तीन पुरुष त्यांच्या उद्देशेंकरुन श्राद्ध करावें . तें सांगतो हेमाद्रींत ब्राह्मांत व मार्केंडेयांत - " कन्याराशीस सूर्य गेला असतां पौर्णमासीस प्रतिवर्षीं नांदीमुखांचें श्राद्ध करावें , असें वराहवचन आहे . " नांदीमुख कोणते ते सांगतो ब्राह्मांत - " पिता , पितामह , प्रपितामाह हे तीन पितर अश्रुमुख होत ; त्यांहून पूर्वींचे ( पलीकडचे ) जे प्रजावंत सुखानें वाढलेले ते नांदीमुख होत . नांदी म्हणजे समृद्धि म्हटली आहे . " हें श्राद्ध प्रतिवर्षीं करावें असें सांगितल्यावरुन महालयश्राद्ध पंधरा दिवस करावयाचें ह्या पक्षीं व सकृन्महालयपक्षींही आवश्यक होय , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . ह्या श्राद्धांत मातामहही घ्यावे ; कारण , " पितरांची जेथें पूजा करावयाची , तेथें मातामहांचीही करावी " असें धौम्यवचन आहे . या ठिकाणीं पिता इत्यादिक पितर नसून वृद्धप्रपितामहादिक असल्यामुळें ‘ पितरो यत्र पूज्यंते ’ ह्या धौम्यवचनाची प्रवृत्ति कशी ? असें कोणी म्हणेल तर , ‘ पितृ ’ हा शब्द
जनकपित्याचा वाचक मानला तर बहुवचनाचा विरोध येत असल्यामुळें ज्यांना पितृत्व प्राप्त झालें आहे त्यांचा वाचक ( बोधक ) पितृ शब्द आहे . प्रतिवार्षिक श्राद्धांत मातामह कां येत नाहींत असें म्हटलें तर त्या ठिकाणीं मातामहश्राद्ध करुं नये , अशा वचनावरुन मातामहांची निवृत्ति होते . आतां असें म्हटलें तर जीवत्पितृकाचे अन्वष्टकाचे ठायीं मातृश्राद्धांत मातामह प्राप्त होतील ? तर ते इष्ट आहेत . मातृश्राद्धांत मातामह इष्ट आहेत म्हणूनच " त्यानें , उक्त श्राद्धांत आपल्या मातेला व मातामहाला द्यावें " असें मदनरत्न व कालादर्श सांगतात . हा प्रकार जीवत्पितृकश्राद्धप्रकरणीं ( तृतीयपरिच्छेदाच्या उत्तरार्धांत ) पुढें सांगूं . केचित् तर - ‘ पितृ ’ या शब्दाची पिता व पित्याचे पूर्वींचे ह्यांच्यावर अजहल्लक्षणा करुन पिता धरुन पूर्वींचे जेथें असतील तेथें मातामह पुजावे , असा अर्थ करावा . तेणेंकरुन येथें ( या प्रौष्ठपदीश्राधांत ) पिता नसल्यामुळें मातामह नाहींत , असें सांगतात . आतां असें म्हणूं कीं , ह्या वृद्धप्रपितामहादिकांना नांदीमुख असें नांव असल्यामुळें नांदीश्राद्धाचे धर्म या श्राद्धांत येतील ? असें म्हणतां येत नाहीं . कारण , जसे वैष्णव इत्यादिक शब्द देवताबोधक आहेत , तसा येथें नांदीमुख हा शब्द या श्राद्धांत जे पितर देवता त्यांचा बोधक आहे , म्हणून या श्राद्धरुप कर्माचा बोधक तो शब्द नाहीं . ह्या श्राद्धांतील पितरांना नांदीमुख हें विशेषणही नाहीं . ते पितर नांदीमुख आहेत , इतकाच संकेत आहे . ही दिशा समजावी . तसें निर्णयदीपांत गार्ग्य - " सार्या पौर्णिमेचे ठायीं पिंडदान निषिद्ध आहे . प्रौष्ठपदी पौर्णिमा वर्ज्य करुन हें समजावें . कारण , जसा दर्श तशीच ती प्रौष्ठपदी आहे . " इतिभाद्रपदमासः ॥