भाद्रशुक्लषष्ठीसूर्यषष्ठी सासप्तमीयुतैवेतिदिवोदासः शुक्लेभाद्रपदेषष्ठ्यांस्नानंभास्करपूजनं प्राशनंपंचगव्यस्य अश्वमेघफलाधिकमितिवचनात् कल्पतरौभविष्ये येयंभाद्रपदेमासिषष्ठीस्याद्भरतर्षभ योस्यांपश्यातिगांगेयंदक्षिणापथवासिनं ब्रह्महत्यादिपापैस्तुमुच्यतेनात्रसंशयः गांगेयः स्वामिकार्तिकेयः भाद्रपदशुक्लसप्तम्यांमुक्ताभरणव्रतं तत्रसप्तमीपूर्वायुताग्राह्या षण्मुन्योरितियुग्मवाक्यात् ।
भाद्रपदशुक्लषष्ठी सूर्यषष्ठी . ती सप्तमीयुक्तच घ्यावी , असें दिवोदास सांगतो . कारण , " भाद्रपदशुक्लषष्ठीस स्नान , सूर्यपूजन , आणि पंचगव्याचें प्राशन केल्यानें अश्वमेधाहून अधिक फल होतें " असें वचन आहे . कल्पतरुंत भविष्यांत - " भाद्रपदमासीं जी षष्ठी प्राप्त होते तिचे ठायीं जो मनुष्य गांगेय ( गंगापुत्र ) दक्षिणदिशेस राहणारा अशा कार्तिकस्वामीचें दर्शन घेतो तो ब्रह्महत्यादि पापांपासून मुक्त होतो , यांत संशय नाहीं . " भाद्रपदशुक्लसप्तमीस मुक्ताभरणव्रत . त्या व्रताविषयीं सप्तमी षष्ठीयुक्त घ्यावी . कारण , " षष्ठी व सप्तमी यांचें युग्म " असें युग्मवाक्य ( प्रथमपरिच्छेदांत ) उक्त आहे .