मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
श्रावणांत ओषधी

द्वितीय परिच्छेद - श्रावणांत ओषधी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


श्रावणेसस्यानुद्गमादौतुबह्वृचपरिशिष्टे अवृष्ट्यौषधयस्तस्मिन्मासेतुनभवंतिचेत्‍ तदाभाद्रपदेमासिश्रवणेनतदिष्यतेइति तत्राप्यनुद्गमेतु कुर्यादेवतद्वार्षिकमित्याचक्षतेइतिसूत्रात् वर्षर्तौभवंवार्षिकं एतच्चशुक्रास्तादावपिकार्यं उपाकर्मोत्सर्जनंचपवित्रदमनार्पणमितिदमनारोपेलिखितवचनात् नित्येनैमित्तिकेजप्येहोमे यज्ञक्रियासुच उपाकर्मणिचोत्सर्गेग्रहवेधोनविद्यत इति प्रयोगपारिजातेसंग्रहोक्तेः पर्वणिग्रहणेसतिपूर्वंत्रिरात्रादिवेधाभावंवक्तुमिदं तेनपर्वणिग्रहणेपिचतुर्दश्यांश्रवणेकार्यमितिहेमाद्रिः अस्तेप्रथमारंभस्तुनभवति गुरुभार्गवयोर्मौढ्येबाल्येवावार्धकेपिवा तथाधिमाससंसर्पमलमासादिषुद्विजे प्रथमोपाकृतिर्नस्यात्कृतंकर्मविनाशकृदितितत्रैवकश्यपोक्तेः अत्रप्रथमारंभेवृद्धिश्राद्धंकुर्यादितिनारायणवृत्तौ एतच्चाधिमासेनकार्यं उपाकर्मतथोत्सर्गः प्रसवाहोत्सवाष्टकाः मासवृद्धौपरेकार्यावर्जयित्वातुपैतृकमितिज्योतिः पराशरोक्तेः उत्कर्षः कालवृद्धौस्यादुपाकर्मादिकर्मणि अभिषेकादिवृद्धीनांनतूत्कर्षोयुगादिष्वितिकात्यायनोक्तेश्च यत्तु उपाकर्मणिचोत्सर्गेह्येतदिष्टंवृषादित इतिऋष्यशृंगवचनं तत्सामगविषयं तेषांसिंहार्के एवोक्तेः एतच्चापराह्णेकार्यं उपाकर्मापराह्णेस्यादुत्सर्गः प्रातरेवत्विति अध्यायानामुपाकर्मकुर्यात्कालेऽपराह्णिके पूर्वाह्णेतुविसर्गः स्यादितिवेदविदोविदुरितिचहेमाद्रौगोभिलिक्तेः वस्तुवस्तु भवेदुपाकृतिः पौर्णमास्यांपूर्वाह्णएवत्विति प्रचेतसोवचनात्‍ पूर्ववाक्यंसामगविषयं तेषामपराह्णएवोक्तेरित्यनुपदंवक्ष्यते दीपिकापि अस्यतुविधेः पूर्वाह्णकालः स्मृत इति ।

श्रावणांत ओषधी न झाल्यावर सांगतो - बह्वृचपरिशिष्टांत “ वृष्टि न झाल्यामुळें त्या मासांत ओषधि उत्पन्न न होतील तर त्या वेळीं भाद्रपदांत श्रवणावर तें उपाकर्म इष्ट आहे. ” त्या भाद्रपदांतही ओषधी न होतील तर “ तें वार्षिक म्हणजे वर्षाऋतूंत होणारें उपाकर्म करावेंच, असें सांगतात ” असें सूत्र आहे. हें उपाकर्म शुक्रास्तादिकांतही करावें. कारण, “ उपाकर्म, उत्सर्जन, पवित्रारोपण व दमनारोपण हें करावें ” असें दमनारोपणाचे प्रसंगीं लिहिलेलें वचन आहे. “ नित्य व नैमित्तिक कर्म, जप, होम, यज्ञकर्म, उपाकर्म, आणि उत्सर्जन यांविषयीं ग्रहवेध नाहीं. ” असें प्रयोगपारिजातांत संग्रहवचन आहे. पर्वाचे ठिकाणीं ग्रहण असतां पूर्वीं त्रिरात्रादिवेधाचा अभाव सांगण्याकरितां हें वचन आहे. तेणेंकरुन पर्वाचेठायीं ग्रहण असलें तरी चतुर्दशीस श्रवणावर करावें, असें हेमाद्रि सांगतो. गुरुशुक्रास्तांत प्रथमारंभ तर होत नाहीं कारण, “ गुरुशुक्रांचें अस्त, बाल्य किंवा वार्धक्य, अधिकमास, संसर्पमास, मलमास, इत्यादिकांत पहिलें उपाकर्म होत नाहीं. केलें तर तें नाश करणारें आहे ” असें तेथेंच कश्यपवचन आहे. उपाकर्माच्या प्रथमारंभीं वृद्धिश्राद्ध करावें, असें नारायणवृत्तींत सांगितलें आहे. हें उपाकर्म ( प्रथमारंभावांचूनही ) अधिकमासांत करुं नये. कारण, “ उपाकर्म, उत्सर्जन, वाढदिवस, अष्टकाश्राद्धें हीं अधिमास असतां पुढच्या मासांत करावीं. पित्र्यकर्म त्या मासांत ( अधिकांत ) करावें. ” असें ज्योतिःपराशरवचन आहे. आणि “ अधिकमास असतां उपाकर्मादिकर्माविषयीं व राजाभिषेकादि संबंधी वृद्धींचा उत्कर्ष ( पुढच्या मासांत नेणें ) करावा. युगादिश्राद्धांचा उत्कर्ष नाहीं ” असें कात्यायनवचनही आहे. आतां जें “ दशहरा, चार युगादि, उपाकर्म व उत्सर्ग यांविषयीं उत्कर्ष नाहीं. कारण, हें दशहरादि कर्म वृषादि संक्रांतींत ( सौरमासांत ) इष्ट आहे ” असें ऋष्यश्रृंगवचन तें सामवेदिविषयक आहे. कारण, त्यांचें उपाकर्म सिंहसंक्रांतींतच सांगितलें आहे. हें उपाकर्म अपराह्णीं करावें. कारण, “ उपाकर्म अपराह्णीं होतें व उत्सर्जन प्रातःकालींच होतें. वेदांचें उपाकर्म अपराह्णकालीं करावें. पूर्वाह्णीं उत्सर्जन करावें असें वेदवेत्ते जाणतात. ” असेंही हेमाद्रींत गोभिलवचन आहे. वास्तविक म्हटलें तर “ पौर्णिमासीस पूर्वाह्णींच उपाकरण होतें ” ह्या प्रचेतसाचे वचनावरुन पूर्वीचें ( अपराह्णबोधक ) वचन सामवेदिविषयक आहे. त्या सामगांना अपराह्णींच सांगितलें आहे, तें जवळच पुढें सांगूं. दीपिकाही - “ ह्या विधीचा ( उपाकर्माचा ) पूर्वाह्णकाल स्मृतींत उक्त आहे. ”

याजुषास्तुपर्वणिकुर्युः तच्चापस्तंबैरौदयिकंग्राह्यमन्यैस्तुपूर्वं पर्वण्यौदयिकेकुर्युः श्रावणंतैत्तिरीयकाः बह्वृचाः श्रवणेकुर्युर्ग्रहसंक्रांतिवर्जित इतिगार्ग्योक्तेः संप्राप्तवाञ्छ्रुतीर्ब्रह्मापर्वण्यौदयिकेपुनः अतोभूतदिनेतस्मिन्नोपाकरणमिष्यत इतिकालिकापुराणाच्च अथचेद्दोषसंयुक्तेपर्वणिस्यादुपाक्रिया दुःखशोकामयग्रस्ताराष्ट्रेतस्मिन्द्विजातय इति मदनरत्नहेमाद्र्यादौगार्ग्येणदोषोक्तः अत्रशिंगाभट्टीयेविशेषः श्रवणः श्रावणंपर्वसंगवस्पृग्यदाभवेत्‍ तदैवौदयिकंकार्यंनान्यदौदयिकंभवेत्‍ पराशरमाधवीयेपिगार्ग्यः श्रावणीपौर्णमासीतुसंगवात्परतोयदि तदैवौदयिकीग्राह्यानान्यदौदयिकीभवेत् ।

यजुर्वेद्यांनीं तर पर्वाचे ठायीं करावें. तें पर्व आपस्तंबांनीं उदयव्यापि घ्यावें. इतरांनीं पूर्वदिवशींचें घ्यावें. कारण, “ तैत्तिरीय शाख्यांनीं ग्रहणसंक्रांतिवर्जित अशा सूर्योदयव्यापि पर्वाचे ठायीं श्रावणी करावी. बह्वृचांनीं श्रवणावर करावी. ” असें गार्ग्यवचन आहे. आणि “ उदयव्यापि पर्वाचे ठायीं ब्रह्मदेवाला श्रुति प्राप्त झाल्या म्हणून चतुर्दशीयुक्त पूर्वदिवशीं उपाकरण इष्ट नाहीं ” असें कालिकापुराणवचनही आहे. “ आतां जर दोषयुक्त पर्वाचे ठायीं उपाकरण होईल तर त्या राष्ट्रांत ब्राह्मण दुःख, शोक व रोग यांनीं ग्रस्त होतील ” असा मदनरत्न - हेमाद्रि इत्यादिकांत गार्ग्यानें दोष सांगितला आहे. या ठिकाणीं शिंगाभट्टीयांत विशेष सांगतो - “ श्रवणनक्षत्र व श्रावणीपूर्णिमा ज्या वेळीं संगवकालीं असेल त्या वेळींच उदयकालव्यापि घ्यावी. अन्य म्हणजे संगवव्यापि नसतां उदयव्यापि घेऊं नये. ” पराशरमाधवीयांतही गार्ग्य - “ श्रावणी पौर्णमासी संगवकालाच्या पुढें जर असेल तर त्या वेळींच उदयव्यापि घ्यावी. इतर उदयव्यापि घेऊं नये. ”

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP