मार्गशीर्षशुक्लषष्ठी चंपाषष्ठीतिमहाराष्ट्रेषुप्रसिद्धा सोत्तरयुताग्राह्या षण्मुन्योरितियुग्मवाक्यात् पूर्वाह्णेदैविकंकुर्यादितिवचनादस्यचदैवकर्मत्वात् इयमेवयोगविशेषेणचंपेत्युच्यते तदुक्तंब्रह्मांडपुराणेमल्लारिमाहात्म्ये मार्गेभाद्रपदेशुक्लाषष्ठीवैधृतिसंयुता रविवारेणसंयुक्तासाचंपेतीहकीर्तितेति विशाखाभौमयोगेनसाचंपेतीहकीर्तितेतिमदनरत्नेपाठः मार्गशीर्षेऽमलेपक्षेषष्ठ्यांवारेंऽशुमालिनः शततारागतेचंद्रेलिंगंस्यादृष्टिगोचरमिति इयंचयोगवशेनपूर्वापरावाकार्या चंपाषष्ठीसप्तमीयुतेतिदिवोदासः इयमेवस्कंदषष्ठी सापूर्वयुता कृष्णाष्टमीस्कंदषष्ठीशिवरात्रिश्चतुर्दशी एताः पूर्वयुताः कार्यास्तिथ्यंतेपारणंभवेदितिभृगूक्तेः परेऽह्निरात्रावाद्ययाममध्येपारणासंभवेइदम् अन्यथोत्तरैवेतिदिवोदासः अब्दपर्यंतंषष्ठीषु सेनाविदारकस्कंदमहासेनमहाबल रुद्रोमाग्निजषड्वक्रगंगागर्भनमोस्तुते इतिराजतंस्कंदंसंपूज्यविप्रायदद्यादितिदिवोदासः ।
मार्गशीर्षशुक्लषष्ठी ही चंपाषष्ठी, म्हणून महाराष्ट्रदेशांत प्रसिद्ध आहे. ती सप्तमीयुक्त घ्यावी. कारण, “ षष्ठी व सप्तमी यांचें युग्म ” असें युग्मवाक्य प्रथमपरिच्छेदांत सांगितलें आहे. आणि “ पूर्वाह्णीं देवांचें कर्म करावें ” असें वचन आहे, व हें देवकर्म आहे. हीच षष्ठी विशेषयोगानें चंपा अशी म्हटली आहे. तें सांगतो ब्रह्मांडपुराणांत मल्लारिमाहा त्म्यांत - “ मार्गशीर्षांतील व भाद्रपदांतील शुक्लषष्ठी वैधृतियोग व रविवार यांनीं युक्त असतां चंपा अशी म्हटली आहे. ” ‘ रविवारेण संयुक्ता ’ यास्थानीं ‘ विशाखाभौमयोगेन ’ असा मदनरत्नांत पाठ आहे. अर्थ - “ विशाखानक्षत्र व भौमवार यांच्या योगानें ही चंपा अशी प्रसिद्ध आहे. ” “ मार्गशीर्षशुक्लषष्ठीस रविवार असून शततारकानक्षत्रीं चंद्र असतां लिंगदर्शन होतें. ” ही षष्ठी अधिक योग मिळतील तशी पूर्वा किंवा परा करावी. ( म्हणजे ही चंपाषष्ठी दोन दिवस असेल तर रविवार, भौमवार, शततारकानक्षत्र, वैधृतियोग यांतून अधिकांचा योग ज्या दिवशीं येईल ती त्रिमुहूर्तव्यापिनी पूर्वदिवसाची किंवा दुसर्या दिवसाची घ्यावी. दोनही दिवशीं पूर्वीं सांगितलेला योग नसेल तर सहा घटिकाव्यापिनी अशी दुसर्या दिवसाचीच घ्यावी. असें धर्मसिंधुसारांत आहे. ) चंपाषष्ठी सप्तमीयुक्त करावी असें दिवोदास सांगतो. हीच स्कंदषष्ठी होय. ती पंचमीयुक्त घ्यावी. कारण, “ कृष्णजन्माष्टमी, स्कंदषष्ठी आणि शिवरात्रि चतुर्दशी ह्या तिथि पूर्वयुक्त कराव्या व तिथीचे अंतीं पारणा करावी. ” असें भृगुवचन आहे. दुसरे दिवशीं रात्रीच्या पहिल्या प्रहराच्या आंत पारणेचा संभव असतां हें वचन जाणावें. रात्रीच्या प्रथम प्रहरीं पारणासंभव ( तिथीचा अंत ) नसतां पराच घ्यावी, असें दिवोदास सांगतो. वर्षपर्यंत प्रत्येक मासाचे षष्ठीस “ सेनाविदारक स्कंद महासेन महाबल ॥ रुद्रोमाग्निज षड्वक गंगागर्भ नमोस्तु ते ॥ ” या मंत्रानें रुप्याच्या स्कंदप्रतिमेची पूजा करुन शेवटीं ती प्रतिमा ब्राह्मणाला द्यावी, असें दिवोदास सांगतो.