देवीमूर्तिस्थापनेविशेषोदुर्गाभक्तितरंगिण्यांदेवीपुराणे याम्यास्याशुभदादुर्गापूर्वास्याजयवर्धिनी पश्चिमाभिमुखीनित्यंनस्थाप्यासौम्यदिड्मुखी प्रतिमाभावेविशेषस्तत्रैव हैमराजतमृद्धातुशैलचित्रार्पितापिवा खड्गेशूलेर्चितादेवीसर्वकामफलप्रदा यद्यद्यस्यायुधंप्रोक्तंतस्मिंस्तांप्रतिपूजयेत् देवीभक्त्यार्चितापुंसांराज्यायुः सुतसौख्यदा कृत्यतत्त्वार्णवेकालिकापुराणे लिंगस्थांपूजयेद्देवींमंडलस्थांतथैवच पुस्तकस्थांमहादेवींपावकेप्रतिमासुच चित्रेचत्रिशिखेखड्गेजलस्थांवापिपूजयेत् बिल्वपत्रैर्यजेद्देवींतथाजातीप्रसूनकैः नानापिष्टकनैवेद्यैर्धूपदीपैर्मनोहरैः भगलिंगाभिधानैश्चभगलिंगप्रगीतकैः भगलिंगक्रियाभिश्चप्रीणयेद्वरचंडिकाम् परैर्नाक्षिप्यतेयस्तुयः परान्नाक्षिपत्यपि तस्यक्रुद्धाभगवतीशापंदद्यात्सुदारुणम् चित्रमृन्मयादौस्नानाद्यसंभवेतत्रैवोक्तम् अंतिकेस्थापितेखड्गे स्नापयेद्दर्पणेथवेति ।
देवीचे मूर्तिस्थापनाविषयीं विशेष सांगतो दुर्गाभक्तितरंगिणींत - देवीपुराणांत - “ दुर्गादक्षिणाभिमुख स्थापिली असतां शुभ देणारी होते. पूर्वाभिमुख जयवर्धिनी होते. पश्चिमाभिमुख व उत्तराभिमुख देवी स्थापूं नये. ” प्रतिमेच्या अभावीं. विशेष सांगतो - तेथेंच “ सुवर्ण, रजत, मृत्तिका, धातु, शिला, चित्र, यांची केलेली अथवा खड्ग व शूल यांचे ठायीं पूजलेली देवी सर्व मनोरथ देणारी होते. जें जें जिचें आयुध सांगितलें त्याचे ठायीं तिचें पूजन करावें. भक्तीनें देवीची पूजा केली असतां ती देवी पुरुषांस राज्य, आयुष्य, पुत्र, सौख्य देणारी होते. ” कृत्यतत्त्वार्णवांत कालिकापुराणांत - “ लिंगाचे ठायीं देवीचें पूजन करावें. तसेंच स्थंडिल, पुस्तक, अग्नि, प्रतिमा, चित्र, त्रिशूल, किंवा खड्ग अथवा उदक यांचे ठायींही पूजन करावें. बिल्वपत्रांनीं देवीचें यजन ( पूजन ) करावें. तसेंच जाईच्या पुष्पांनीं, नानाप्रकारच्या पिठाच्या पदार्थांच्या नैवेद्यांनीं, सुंदर धूपदीपांनीं, पूजा करावी. आणि भग व लिंग यांच्या नामांनीं, भगलिंगगायनांनीं, आणि भगलिंगक्रियांनीं श्रेष्ठ चंडिकेला संतुष्ट करावी. दुसर्यांनीं ज्याचा आक्षेप केला नाहीं व जो दुसर्याला आक्षेप ( निंदा ) करीत नाहीं त्यास भगवती क्रुद्ध होऊन भयंकर शाप देते. ” चित्र किंवा मातीची वगैरे मूर्ति असतां स्नानादिकांचा असंभव असेल तर तेथेंच सांगतो - “ देवीच्या जवळ स्थापन केलेल्या खड्गाला किंवा दर्पणाला स्नानादि उपचार करावे. ”