मिथुनसंक्रांतौपराः षोडशघटिकाः पुण्यकालः रात्रौतुप्रागेवोक्तम् आषाढशुक्लद्वितीयायांरथोत्सवः तदुक्तं तिथितत्त्वेस्कांदे आषाढस्यसितेपक्षेद्वितीयापुष्यसंयुता तस्यांरथेसमारोप्यरामंवैभद्रयासह यात्रोत्सवं प्रवर्त्याथप्रीणयेतद्विजान्बहून् तथा ऋक्षाभावेतिथौकार्यायात्रासौममपुण्यदा आषाढशुक्लदशमीपौर्णमासीचमन्वादिः साचपूर्वाह्णव्यापिनीग्राह्येतिप्रागुक्तं आषाढशुक्लद्वादश्यामनुराधायोगरहितायांपारणंकुर्यात् तदुक्तं भविष्ये आभाकासितपक्षेषुमैत्रश्रवणरेवती संगमेनहिभोक्तव्यंद्वादशद्वादशीर्हरेत् अस्यार्थः आषाढभाद्रपदकार्तिकशुक्लद्वादशीष्वनुराधाश्रवणरेवतीयोगेपारणंनकुर्यादिति अत्रयद्यप्येतावदेवोक्तं तथाप्यनुराधाप्रथमपादएववर्ज्यः तदुक्तंविष्णुधर्मे मैत्राद्यपादेस्वपितीहविष्णुः पौष्णांत्यपादेप्रतिबोधमेति श्रुतेश्चमध्येपरिवर्तमेति सुप्तिप्रबोधपरिवर्तनमेववर्ज्यमिति वस्तुतस्तुपूर्ववचनमिदंचनिर्मूलम् ।
आतां आषाढमास - मिथुनसंक्रांतीच्या पुढील सोळा घटिका पुण्यकाळ होय. रात्रीं संक्रांत झाली असतां पुण्यकाळ निर्णय पूर्वीच ( प्रथम परिच्छेदांत ) सांगितला आहे. आषाढशुक्ल द्वितीयेचे ठायीं श्रीरामाचा रथोत्सव करावा. तो सांगतो तिथितत्त्वांत स्कंदपुराणांत - “ आषाढाच्या शुक्लपक्षीं पुष्य नक्षत्रयुक्त द्वितीयेस भद्रेसहित रामाला रथावर बसवून यात्रोत्सव करुन ( द्रव्यादिकानें ) बहुत ब्राह्मणांस संतुष्ट करावें. ” तसेंच “ माझी पुण्यकारक यात्रा पुष्यनक्षत्र नसतांही ह्या तिथीस करावी, असें राम सांगतो. ” आषाढशुक्ल दशमी व पौर्णिमा ह्या मन्वादि होत. त्या पूर्वाह्णव्यापिनी घ्याव्या असें पूर्वीच ( चैत्रांत ) सांगितलें आहे. आषाढशुक्ल द्वादशी अनुराधा नक्षत्ररहित असतां एकादशीची पारणा करावी. तें सांगतो भविष्यांत - “ आषाढ, भाद्रपद, कार्तिक यांच्या शुक्लपक्षांतील द्वादशी अनुक्रमानें अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांनीं युक्त असतां भोजन करुं नये, केलें तर बारा द्वादशींचें पुण्य व्यर्थ होतें. ” ह्या वचनांत सर्व नक्षत्रांचा योग जरी निषिद्ध सांगितला आहे तथापि अनुराधांचा पहिला चरणच वर्ज्य करावा. तें सांगतो विष्णुधर्मांत - “ अनुराधांच्या
पहिल्या चरणीं विष्णु निद्रा करितो. रेवतीच्या अंत्यचरणीं जागृत होतो. श्रवणाच्या मध्यभागीं कुशीस वळतो. यास्तव निजणें, जागृत होणें, व कुशीस वळणें हें ज्या भागांवर होतें ते भाग मात्र वर्ज्य करावे. ” वास्तविक म्हटलें तर पूर्ववचन व हें वचन हीं दोनही निर्मूल होत. ( कारण, महानिबंधांत हीं वचनें आढळत नाहींत. )
अत्रैवविष्णुशयनोत्सव उक्तोहेमाद्रौब्राह्मे एकादश्यांतुशुक्लायामाषाढेभगवानहरिः भुजंगशयनेशेते क्षीरार्णवजलेसदेति कल्पतरौयमः क्षीराब्धौशेषपर्यंकेआषाढ्यांसंविशेद्धरिः निद्रांत्यजतिकार्तिक्यांतयोः संपूजयेत्सदा ब्रह्महत्यादिकंपापंक्षिप्रमेवंव्यपोहति हिंसात्मकैस्तुकिंतस्ययज्ञैः कार्यंमहात्मनः प्रस्वापेचप्रबोधेचपूजितोयेनकेशवः टोडरानंदेपिस्कांदे आषाढशुक्लैकादश्यांकुर्यात्स्वप्नमहोत्सवं अयंद्वादश्यामप्युक्तः आभाकासितपक्षेषुमैत्रश्रवणरेवती आदिमध्यावसानेषुप्रस्वापावर्तनोत्सवाः निशिस्वापोदिवोत्थानंसंध्यायां परिवर्तनम् अन्यत्रपादयोगेपिद्वादश्यामेवकारयेत् आभाकाद्येषुमासेषुमिथुनेमाधवस्यच द्वादश्यांशुक्लपक्षेच प्रस्वापावर्तनोत्सवाइतिभविष्योक्तेः द्वादश्यांसंधिसमयेनक्षत्राणामसंभवे आभाकासितपक्षेषुशयनावर्तनादिकमितिवाराहोक्तेश्च द्वादश्यामित्यत्रापिपारणाहोमात्रंविवक्षितं पारणाहेपूर्वरात्रेघंटादीन्वादयन्मुहुरितिरामार्चनचंद्रिकोक्तेः अत्रैकादशीद्वादश्योर्देशभेदेनव्यवस्था ।
ह्या एकादशीसच विष्णुशयनोत्सव सांगतो हेमाद्रींत ब्राह्मांत - “ आषाढशुक्ल एकादशीस भगवान् हरी क्षीरसमुद्राच्या उदकामध्यें शेषशयनावर निद्रा करतो. ” कल्पतरुंत यम - “ आषाढ शुक्ल एकादशीस क्षीरसमुद्रांत शेषपर्यंकीं हरि निजतो व कार्तिक शुक्ल एकादशीस जागृत होतो, यास्तव या तिथींस हरीचें पूजन केलें असतां ब्रह्महत्यादि पापें तत्काळ जातात. ज्यानें निद्राकालीं व प्रबोधकाळीं हरीची पूजा केली त्या महात्म्याचें हिंसात्मक यज्ञांनीं काय करावयाचें आहे. यज्ञांपेक्षांही हें अधिक होय. ” टोडरानंदांतही स्कांदांत - “ आषाढ शुक्ल एकादशीस निद्रामहोत्सव करावा. ” हा निद्रामहोत्सव द्वादशीसही सांगितला आहे - “ आषाढ, भाद्रपद, कार्तिक यांच्या शुक्ल पक्षीं अनुक्रमानें अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांच्या पहिल्या, मधल्या व शेवटच्या भागांवर निद्रा, परिवर्तन व जागर यांचे उत्साह करावे. रात्रीं निद्रा, दिवसा उत्थापन, संध्यासमयीं परिवर्तन अशीं होतात. अनुराधा, श्रवण, रेवती यांचे प्रथमादिपाद अन्य तिथींस असले तरी द्वादशीसच निद्रादि उत्सव करावे. कारण, आषाढ, भाद्रपद, कार्तिक या मासांत शुक्ल पक्षांच्या द्वादशींस अनुक्रमें भगवंताचे प्रस्वाप, परिवर्तन, व प्रबोध हे उत्सव होतात ” असें भविष्यवचन आहे. आणि “ आषाढ, भाद्रपद, कार्तिक, या महिन्यांत शुक्लपक्षीं द्वादशीस संध्यासमयीं नक्षत्रें नसतांही शयन, परिवर्तन इत्यादि उत्सव होतात ” असें वाराहपुराणवचनही आहे. ‘ द्वादशीस उत्सव करावा ’ असें जें सांगितलें तेथें पारणादिवस मात्र विवक्षित आहे; कारण, “ पारणादिवशीं पूर्वरात्रीं वारंवार घंटादि वाजवीत उत्सव करावे ” असें रामार्चनचंद्रिकेंत वचन आहे. येथें एकादशी व द्वादशी या दोन तिथींस उत्साह सांगितला त्याची व्यवस्था देशभेदानें जाणावी.
इदंचमलमासेनकार्यं ईशानस्यबलिर्विष्णोः शयनंपरिवर्तनमितिकालादर्शेनिषेधात् यदपि एकादश्यांतु गृह्णीयात्संक्रांतौकर्कटस्यच आषाढ्यांवानरोभक्त्याचातुर्मास्यव्रतक्रियामितिहेमाद्रौब्रह्मवैवर्तं तदपिमलमासेसतिद्रष्टव्यम् मिथुनस्थोयदाभानुरमावास्याद्वयंस्पृशेत् द्विराषाढः सविज्ञेयोविष्णुः स्वपितिकर्कट इतितत्रैव मोहचूलोत्तरोक्तेः ।
हा विष्णुशयनोत्सव मलमासांत करुं नये. कारण, “ ईशानबलि, विष्णूचें शयन व परिवर्तन मलमासांत करुं नये, असा कालादर्शांत निषेध आहे. आतां जें “ कर्कसंक्रांतींत एकादशीस किंवा आषाढी पौर्णिमेस मनुष्यानें भक्तियुक्त होऊन चातुर्मास्यव्रतकर्म करावें ” असें हेमाद्रींत ब्रह्मवैवर्तवचन तेंही मलमास असतां जाणावें. कारण, “ ज्या काळीं मिथुनाचा सूर्य दोन अमावास्यांना स्पर्श करील त्या काळीं दोन आषाढ होतात, व तेव्हां कर्कसंक्रांतींत विष्णु निद्रा करतो. ” असें तेथेंच मोहचूलोत्तराचें वचन आहे.