मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १

मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


मुक्तेश्वरांचे महाभारत
करवीरलक्ष्मी विष्णुभाजा । भैरव सुवर्णपुरीचा राजा ।
उभय कुळदेवतीं माझा । मस्तक पायें स्पर्शिला ॥
तेणें बळें परम सुखी । श्लाघ्यता पावलों उभय लोकीं ।
सदगुरुकृपामातृअंकीं । योग्य जालों बैसावया ॥ ( आदिपर्व )

नमूं करर्वारनिवासिनी । जे महालक्ष्मी विश्वजननी ।
जीचा कृपानुग्रहतरणी । नाशी भवतमातें ॥
जे चिदादित्याची चित्कळा । दरिद्रवनप्रलयज्वाळा ।
दासवत्सातें स्नेहाळा । कामधेनू कृपेची ॥
तीचा लाहोनि वरदहस्त । संतसभेशीं जालों स्वस्थ ।
जैसा सिंहाश्रयें बस्त । कुंजरमाथां मिरवतु ॥
वंदूं सोनारी भैरव । तेणें दिधला हा गौरव ।
प्रेमें जालें मन कैरव । पदनखचंद्रीं जयाच्या ॥ ( सभापर्व )
==
मुक्तेश्वरांच्या आरतीतील पदे
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापक रूपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ध्रु.॥

करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरवरवरदायिनि मुरहरप्रियकांता ॥
कमलाकारें जठरीं जन्मविला धाता ।
सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ॥१॥

मातुलिंग गदायुत खेटक रविकिरणी ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥२॥

तारा सुगतागमीं, शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं ॥
गायत्री निजबीजा निगमागम सारीं ।
प्रगटे पद्मावती जिनधर्माचारीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP