मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची काव्ये भाग ३

सत्कवींची काव्ये भाग ३

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


आद्य स्थान तुझें करविरपुर माते ।
प्रसन्नवदनें वससी माये, मन रमते ॥
सुरवर किन्नर पूजिति ध्याती स्थिरचित्तें ।
महिमा न कळे तुझा, गाती भावार्थें ॥१॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
आरति करितां तूं हरिसी अवलक्ष्मी ॥ध्रु.॥

दक्षिणभागीं तूझ्या कालीचें स्थान ।
सरस्वतीचें सव्यभागीं तें ठाण ॥
तुझ्या सन्मुख शोभे गजवदन ।
काशीतुल्या महिमा गाती मुनिजन ॥२॥

महिषासुरनिर्दळण प्रथम केलेंसी ।
शुंभ रक्तबीज तेही वधिलेसी ॥
सर्वहि असुरां मर्दुनि स्वस्थ जाहलीसी ।
सुराधिकारीं इंद्रा तूं स्थापियलेंसी ॥३॥
भजन करितां तूझें मुक्ती पै देसी ।
इहलोकीं सुखभोग भक्तां ओपीसी ॥
जनार्दन वदला परमभावेंसी ।
वरदहस्त माथां ठेवी भक्तांसी ॥४॥

कोल्हापुरीं देवी, तूं रहिवास केला ।
मारुनि दैत्यदानव धर्म स्थापीला ॥
देवां सुरवरां आनंद जाहला ।
सकळहि मिळुनि येती तुझ्या भेटीला ॥१॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
आरती ओवाळूं, शरण आहे मी ॥ध्रु.॥

चौसष्ट योगिनी रात्रीं सेवेसी ।
अडुसष्ट तीथें तीं आलीं महिमेंसी ॥
मानव सकळिक येती तेथें स्नानासी ।
त्यांचीं सकळहि पापें जातीं भंगासी ॥२॥
अवतार पूर्ण तो धरिला देवीनें ।
त्रिकाळ पूजा अर्चन होत सन्मानें ॥
पृथ्वीवरी वार्ता गेली महिमेनें ।
कृष्णसुत चरण धरितो भावानें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP